प्रभाती किरण नवे, रात्री चांदण्यांचे दिवे
पुसता तू, 'काय हवे?' मीच सांज स्वीकारली!
उषा रम्य लावण्याची, निशा धुंद तारुण्याची
उदासीन, कारुण्याची, मीच सांज स्वीकारली!
उषा भूपाळीचे सूर, निशा अंगाई मधूर
मनी जागवी काहूर, मीच सांज स्वीकारली!
उषा प्रभूच्या कटाक्षी, निशा मीलनाची साक्षी
उभी एकली गवाक्षी, मीच सांज स्वीकारली!
उषा किलबिलणारी, निशा दरवळणारी
मागे घुटमळणारी, मीच सांज स्वीकारली!
उषा भैरव वहाते, निशा मालकौंस गाते,
माझे मारव्याशी नाते, मीच सांज स्वीकारली!
नको किरण कोवळे, नको चांदणसोहळे
माझे आभाळ वेगळे, मीच सांज स्वीकारली!
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4416
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुफान कविता आहे.
क्या बात है !!
फारच सुरेख
चांदणसोहळे हा शब्द
+ १ असेच म्हणतो
In reply to चांदणसोहळे हा शब्द by बेसनलाडू
सुंदर!!
खुप सुंदर
कल्पक मांडणी
संध्याकाळ करुणच (असावी) का?
In reply to कल्पक मांडणी by धनंजय
माझी अत्यंत आवडती वेळ!
In reply to संध्याकाळ करुणच (असावी) का? by बेसनलाडू
"असे कारुण्य का?"
In reply to कल्पक मांडणी by धनंजय
सुंदर!
सुरेख आहे
अप्रतिम
मीच सांज स्वीकारली
सहसा कविता
अप्रतिम...
आवडली कविता !
सुंदर..
हेच
In reply to सुंदर.. by स्वाती दिनेश
छान!
सुंदर कल्पना ..
क्या बात
सुरेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
वा!