Skip to main content

(एका वृद्धाचे मनोगत)

लेखक चतुरंग
Published on शुक्रवार, 08/05/2009
वृद्धांच्या समस्यांचे चित्रण करणारी 'एका वृद्धाचे मनोगत' ही जागु ह्यांची कविता वाचली आणि आमच्या डोळ्यासमोर काही बेरकी म्हातारे तरळले! म्हटलं ताणलेल्या मनाला जरा विसावा देऊयात! ;) 'साठी बुद्धी नाठी' व्रत घेतले आहे कांगाव्याने आजाराच्या भंडावले आहे जेवणापेक्षा चटकमटक पोट भरत आहे सल्ले कुणाला देऊ? मन उसासत आहे जेष्ठ नागरीक म्हणून उच्छाद मांडला आहे टीका करत तरुणाईला पुरा कांडला आहे सौभाग्यवती बोटं मोडून करवादते आहे 'हिरवट मेले, नजर कशी भिरभिरते आहे!' योगापेक्षा भोग मोठे मन गर्जत आहे मुंबई-पुणे प्रवासात वड्याचं कर्जत आहे! मुलं-सुना कंटाळून पुरते आटले आहेत 'इस्टेटीत वाटा नको' म्हणत सुटले आहेत! 'मृत्युपत्र, करुन ठेवलंय' सारखा कण्हतो आहे 'जरा शांत बसाल का?' जो तो म्हणतो आहे! माझा अनुभव, पिकले केस वाद घालीत आहे सगळे गप्प म्हातार्‍याच्या हाती कोलीत आहे! चतुरंग
लेखनविषय:

वाचन संख्या 4423
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

हा हा हा =)) योगापेक्षा भोग मोठे मन गर्जत आहे असेच म्हणणारा एक म्हातारा आमच्या परिचयात आहे बर का ! ;) --अवलिया

मुलं-सुना कंटाळून पुरते आटले आहेत 'इस्टेटीत वाटा नको' म्हणत सुटले आहेत! =)) कविता फारच वस्तूस्थिती दाखवणारी आहे. 'मृत्युपत्र, करुन ठेवलंय' सारखा कण्हतो आहे 'जरा शांत बसाल का?' जो तो म्हणतो आहे! :) जोरदार विडंबन.. लैच भारी... झकास ! -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

>> योगापेक्षा भोग मोठे मन गर्जत आहे मुंबई-पुणे प्रवासात वड्याचं कर्जत आहे! असे काही नमुने पाहिले आहेत !

अजुन विडंबन कसे आले नाही हाच विचार करत होतो. मस्त!!!

माझा अनुभव, पिकले केस वाद घालीत आहे सगळे गप्प म्हातार्‍याच्या हाती कोलीत आहे! मस्त ! :)

यांचि शांत करा...हा म्हतारा मेल्यावर खविस होवुन घरच्यांना त्रास देणार..

हाहाहा.. मस्तच! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सगळे गप्प म्हातार्‍याच्या हाती कोलीत आहे! जबर्‍याच ! एकदम सणसणीत ;) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य