Skip to main content

दान

लेखक Himanshu Dabir यांनी शुक्रवार, 11/09/2009 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
परवा वर्तमानपत्रांतून बातम्या वाचल्या, मिरज गावात उभारलेल्या "अफजल वधाच्या" देखाव्यांवरून म्हणे आपले मुसलमान बांधव पेटून उठले! दगडफेक, जाळपोळ, मारामार्‍या, दंगल यांसारख्या मग 'सोयीस्कर' आणि नित्यनेमाच्या गोष्टी कशा अगदी निरलसपणे पार पडल्या! शूरवीर पोलिसांनी मग अश्रूधूराच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवण्याचे काम किरकोळीत केले! आपल्या देशात असे राजरोसपणे चालू असते मग का लक्ष द्या या गोष्टीकडे? पण नाही, हिच प्रवृत्ती घातक ठरत आहे आपल्याला! आपले अलिप्त राहणे हे आजच्या समाजकारण्यांचे आणि राजकारण्यांचे बालेकिल्ले बनले आहेत! त्यांना जाब विचारणे तर दूर, त्यांच्यामागे आपण आंधळ्यासारखे चालत राहतो!

बतावणी!

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 11/09/2009 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
स्थ्ळ - वैकुंठ शीन - हातात 'मादक आणी जहाल'चा मग सहजच घेऊन महालात श्री विष्णू पहुडले आहेत ६० इंची एल्सीडीवर प्रोग्रॅम सुरु आहे जोरजोरात हसण्याचे आवाज येताहेत! (महालात प्रवेश करत) नारद : "नारायण, नारायण!" विष्णूंचं लक्ष नाही असं पाहून पुन्हा एकदा मोठ्याने "नाऽऽरायण! नाऽऽरायण!!" टीवीवरची नजर ढळू न देता विष्णू एका हातानेच थांबायची खूण करतात! एवढ्यात कार्यक्रमाचे प्रायोजक 'मिपाकर स्वयंभोचक संघाची' अ‍ॅड सुरु होते आणी विष्णू टीवी म्यूट करतात. "हा हा हा! मेलो मेलो!! कॉकटेल उडाली ..ठ्यॉ!! बसा बसा मुनिवर!!" "काय हे देवा?

मंजूर नाही

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 11/09/2009 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
नको बंधने, जाच मंजूर नाही नदीला किनाराच मंजूर नाही ! कशी साथ द्यावी तुझ्या कीर्तनाला? मृदंगास ठेकाच मंजूर नाही ! तुला शिंपडावे सुखाच्या सरींनी, तुझ्या श्रावणालाच मंजूर नाही हसू तेच ओठी, खळी तीच गाली, कशी आज ही लाच मंजूर नाही ? तुझ्या सांगण्यानेच मी का फुलावे? वसंता, तुझा जाच मंजूर नाही ! मिळेना तुझ्या साक्षिने न्याय येथे, दिलेला पुरावाच मंजूर नाही लपेटून घ्यावे तुला मी, मला तू, दुरावा कुणालाच मंजूर नाही ! अरे, त्या 'उद्या'ला कुणी आज सांगा, 'तुझी भेट आताच मंजूर नाही '

शब्दसंभ्रम...

लेखक हृषीकेश पतकी यांनी शुक्रवार, 11/09/2009 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
घसा जरा जास्तच ओला झाला की.... फुटपाथ वरच्या रस्त्याने, अगदी सावकाश चालत यावे | खिडकीचे दार उघडून ,कुलूप हळूच ढकलून द्यावे || आपलाच पाय आत ठेवावा, पाटीवरचे दार पाहात | समजेल की आपल्याच घरात, तुम्ही वाट चुकला आहात || कळेल जेव्हा मनावरचा ताबा ,इतका सुटला आहे | आरशात पाहून म्हणाल ,हा अनोळखी माणूस कुठला आहे? ओल्या गोष्टी उशीराच वाळतात ,त्यात तुमची चूक नाही | पण अशा वेळी मात्र ,झोपेसारखं दुसरं सुख नाही || म्हणून उशीवर चादर टाकून ,गादीची छान सोय करावी | पायांवरती पडून जरा ,पाठ लांबवर पसरावी || स्वप्नात डोळे करता करता ,विचारांची उघडझाप होते | रात्रीच्या आठवणीतच ,आख्खी बाटली निघून जाते || काट्य
काव्यरस

मट्णाचे लोणचे

लेखक स्वाती राजेश यांनी शुक्रवार, 11/09/2009 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
फोटो नाही म्हणून रेसिपी वाचू नये...असे करू नये... आता तुम्ही रेसिपी करून फोटो टाकावा ही अपेक्षा.

चारोळ्या...

लेखक अशोक गोडबोले यांनी शुक्रवार, 11/09/2009 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
मुक्ती कुंडीमुक्त लगेच जाहले कचरामुक्त कधी होणार? पदपथावरी अनंत वस्तू कुठल्या नियमाने हरणार? फुले काटे मजला गुलाब तिजला कितीक वर्षे असेल चाले आता अमुची मुलेच देती बाईंना शाळेत फुले॥ परी दिसलीस तू, हसलीस तू रूसलीस तू, रडलीस तू रागावलीस, फसलीस तू माझी परी झालीस तू॥ पट्टी मी पट्टीचा ठार आंधळा बांधून तू पट्टी डोळ्यावर पातिव्रत्याचे हे फळ का? जन्म दिला कौरवांस शंभर॥ संभ्रम झाडामागून बाण मारुनी वाली वधिला, कुठे पराक्रम? रघुकुलरित अशी का असते न्यायनीतीला पडला संभ्रम॥ सिंधू "एकच प्याला" मध

धो-धो पावसात ठाणाळ्याहून तेलबैला...

लेखक विमुक्त यांनी शुक्रवार, 11/09/2009 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
"हँलो आई, मी पालीला आलोय... आता बल्लाळेश्वराचं दर्शन घेऊन भटकायला जाणार आहे" मी. "अरे, पण तू तर साताऱ्याला जाणार होतास ना आज?" आई. "हो, पण अजित आणि सरांचा आज भटकायला जायचा बेत होता... मग मला राहवलं नाही... उद्या जातो साताऱ्याला" मी. "बर..." आई. असं अचानकच अजित आणि सरांसोबत मी भटकायला निघालो. ठाणाळ्याहून वाघजाई घाटानं चढून तेलबैलाला पोचायचा बेत होता. गर्दी नसल्यामुळे बल्लाळेश्वराचं दर्शन निवांत झालं. सकाळी पुण्याहून उपाशी पोटीच निघालो होतो, मग देवळा जवळच एका हॉटेल मधे खाऊन घेतलं. हॉटेल मधे चौकशी केल्यावर कळालं, की डायरेक्ट ठाणाळ्याला बस जात नाही. "पालीहून नाडसूरला जा आणि तिथून २-३ कि.मी.

विकास यांची एक प्रतिक्रिया

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शुक्रवार, 11/09/2009 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
विकास यांचे रा स्व संघाच्या धाग्यात डिस्क्लेमर वाचले. मला स्वतःला विकास यांचे लेखनापेक्षा प्रतिक्रियाच अधिक विचारार्ह वाटतात. त्या पटणे न पटणे भाग वेगळा आहे. विकास यांच्या प्रतिक्रियांच आउटसोर्सिंग विकी यांचे कडे दिले आहे असे मिभो म्हणतात. विकास आपल्या डिस्क्लेमर मधे म्हणतात. "इतके दिवस गांधीचे मारेकरी असे बोंबलत त्यांच्या विरोधकांनी स्वतःचे (चुकीचे) शस्त्र बोथट केले, परीणामी आता जनतेला त्याचा काही फरक पडत नाही. याचा अर्थ सर्व स्वयंसेवक झाले अथवा संघाचे झाले असा नसून साम्यवादी आणि तथाकथीत समाजवादी यांची खरी प्रतिमा आता जनतेला समजून चुकू लागली आहे.

अंगात चांगूलपणा सहजासहजी येत नसतो.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 11/09/2009 07:54 या दिवशी प्रकाशित केले.
"मी माझ्या लेखनात नेहमी, स्वातंत्र्य,कायद्याची अंमलबजावणी,ईश्वराचं महत्व आणि धर्मातून ईश्वराकडे पोहोचणं ह्या विषयावर लिहित असते." कमला पेंडसे यांचे बरेचसे लेख मी काही मासिकात वाचले आहेत.निरनीराळ्या विषयावरचे त्यांचे लेख वाचायला मला आवडतं.कधी तरी त्यांना प्रत्यक्ष भेटून हे विषय त्यांना कसे सुचतात म्हणून विचारावं असं माझ्या मनात नेहमी यायचं. माझा मित्र नाना पेंडसे ह्याला मी एक दिवस सहज विचारलं, "काय रे नाना, ही कमला पेंडसे जी लेखिका म्हणून प्रसिद्ध आहे ती तुझी आडनांव-भगीनी आहे का, की तुझं तिच्याशी खरंच नातं आहे.?" आश्चर्याची गोष्ट म्हणजे नाना म्हणाला, "अरे ती माझी सख्खी चुलत बहिण आहे.दादरला गो