Skip to main content

शब्दसंभ्रम...

लेखक हृषीकेश पतकी यांनी शुक्रवार, 11/09/2009 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
घसा जरा जास्तच ओला झाला की.... फुटपाथ वरच्या रस्त्याने, अगदी सावकाश चालत यावे | खिडकीचे दार उघडून ,कुलूप हळूच ढकलून द्यावे || आपलाच पाय आत ठेवावा, पाटीवरचे दार पाहात | समजेल की आपल्याच घरात, तुम्ही वाट चुकला आहात || कळेल जेव्हा मनावरचा ताबा ,इतका सुटला आहे | आरशात पाहून म्हणाल ,हा अनोळखी माणूस कुठला आहे? ओल्या गोष्टी उशीराच वाळतात ,त्यात तुमची चूक नाही | पण अशा वेळी मात्र ,झोपेसारखं दुसरं सुख नाही || म्हणून उशीवर चादर टाकून ,गादीची छान सोय करावी | पायांवरती पडून जरा ,पाठ लांबवर पसरावी || स्वप्नात डोळे करता करता ,विचारांची उघडझाप होते | रात्रीच्या आठवणीतच ,आख्खी बाटली निघून जाते || काट्यांमधून घड्याळ फिरताना ,मंतरलेला काळ सरेल | घश्यामधला रंग जाऊन ,डोळ्यात फक्त ओल उरेल || आता फक्त काही ग्लास काढायचे ,तोवर पुढचा तास येतोच आहे | कोंबडा उगवला एकदाचा ,सूर्य बांग देतोच आहे ||
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2109
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

काट्यांमधून घड्याळ फिरताना ,मंतरलेला काळ सरेल | घश्यामधला रंग जाऊन ,डोळ्यात फक्त ओल उरेल || सॉलिट्ट्ट्ट... :) मदनबाण..... पाकडे + चीनी = भाई-भाई.

हृष्या, लेका हे धंदे कधीपासून रे? कविता भन्नाटच. तुझ्या आधीच्या कविता एकदम गंभीर इ. इ. होत्या. ही एकदम जीवनाला स्पर्श वगैरे करून जाणारी ... ;) मस्तच. बिपिन कार्यकर्ते

पिंप ओले करुन नाही, घशात बसूनच लिहीले आहे वाटते. गुगली वाचनात पहिल्या पडला _______________________ बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराजकी जय

कोंबडा उगवला एकदाचा ,सूर्य बांग देतोच आहे =)) वा! मस्त!! राघव

काट्यांमधून घड्याळ फिरताना ,मंतरलेला काळ सरेल | घश्यामधला रंग जाऊन ,डोळ्यात फक्त ओल उरेल | अरे वा ! काय भारी ओळी उतरल्या आहेत.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हाहाहा.. आवडली कविता.. मस्त जमली आहे. "पिताना मी कधी रिस्क घेत नाही" ची आठवण झाली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सलाम.. कविता भन्नाट.. घसा ओला करुनच लिहलि असनार :-) --टुकुल

सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद... :) आपला हृषी !!