Skip to main content

सलामतानः जावा चालीरीतीप्रमाणे करायची पूजा (चित्रे चढविण्यात अखेर यशस्वी)

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 17/09/2009 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
काही केल्या चित्रं चढत नव्हती. पण चतुरंग यांच्या चतुर सल्ल्यामुळे अखेर "गंगेत घोडं न्हालं" सलामतान (जो जावा लोकांच्य़ा रूढीतला एक समारंभ आहे व ज्याला मी गमतीने जावानीज स्टाईलची "सत्यनारायण पूजा" म्हणतो) हा एक निमधार्मिक विधी आहे. तो साधारणपणे देवाचे आभार मानण्यासाठी किंवा देवाचे आशिर्वाद किंवा अनुग्रह मागण्यासाठी केला जातो.

आणि मी डीझायनर झालो!

लेखक विनायक पाचलग यांनी गुरुवार, 17/09/2009 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या संस्थळाच्या ओपनिंगच्या निमित्ताने माझ्या ब्लॉगवर लिहिलेला हा लेख.... जसाच्या तसा इथे! स्वतःची वेबसाईट असावी अशी प्रत्येकाची इच्छा असती, माझीदेखील होती,त्यामुळे ११वीत गेल्यावर जेव्हा घरी संगणक आला तेव्हा साईट कशी करता येईल हाच विचार मनात होता. मात्र ,मी १६ वर्षाचा असल्याने आणि कमाईचा कोणताही मार्ग नसल्याने जे काही करायचे ते फु़कटच करावे लागणार होते. अशातच मग हुडकाहुडकी सुरु झाली आणि एक साईट सापडली ,मग काय माझ्या परीक्षेसाठी बनवलेल्या फाईलमध्ये त्या साईटचे नाव दिमाखात विराजमान झाले.

पूर्वाध - ऊत्तरार्ध

लेखक प्रभो यांनी गुरुवार, 17/09/2009 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
डिसक्लेमर : मला कविता, मुक्तक , विडंबन ही फक्त नावे माहीत आहेत. त्या कशाशी खातात मला माहीत नाही. तर त्यामुळे खालील लेख (????) सॉरी...कविता स्वतःच्या जबाबदारीवर वाचावी.
काव्यरस

मालवून टाक दीप

लेखक अन्वय यांनी गुरुवार, 17/09/2009 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
भूप म्हणजेच भूपाली. हा राग रात्रीच्या वेळी गायला जातो, असं म्हणतात. परंतु आपल्याकडे असंख्य भूपाळ्या आहेत. त्या याच रागातल्या. त्यामुळे हा राग रात्रीचा की पहाटेचा हा वादाचा विषय आहे. --- उत्तर रात्र उलटून गेलीय. पक्षांचा किलबिलाटही अद्याप सुरू व्हायचा आहे. काही वेळानंतर झुंजूमुजू होणार आहे. अशा धीरगंभीर वातावरणात भूपाळ्यांचे स्वर मनप्रसन्न करतात. या वातावरणातील शांत आणि गंभीर पण प्रसन्नभाव भूपमध्ये ओतप्रोत भरलेला आहे. हीच भूपची नादप्रवृत्ती असावी. सा रे ग प ध सा हे सहा स्वर असलेला हा राग त्यामुळेच उत्तररात्रीनंतर पहाटपर्यंत गायला जात असावा, असे वाटते. असो.

..युरेका युरेका..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी गुरुवार, 17/09/2009 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
युरेका युरेका --------------------------------------------------- अता युद्ध होईल नक्की निकाली, युरेका युरेका.. उरलीत शस्त्रे तुटल्यात ढाली, युरेका युरेका.. मला पाहुनी ती अशी लाजली की तुम्हा काय सांगू.. अभंगातुनी मज स्फुरली कवाली, युरेका युरेका.. तिचे सज्जनांशी होतेच तंटे कळता मला अन.. जमले मला ते बनणे मवाली, युरेका युरेका.. नवे दु:ख येता निवार्यास माझ्या म्हणालो स्वतःशी.. सुन्या जिंदगानीत नवी जान आली, युरेका युरेका.. जुन्या त्या लढ्याला हुतात्मा मिळाला अखेरीस कोणी.. चला क्रांतीला ह्या सुरवात झाली युरेका युरेका.. तिच्या नेत्रडोहातल्या त्या सुनामीत फसलो असा मी.. पुरी जिंदगानीच अख्खी ब

इतकेच मला जाताना

लेखक मिल्या यांनी गुरुवार, 17/09/2009 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : गुरुवर्य सुरेश भटांची गझल इतकेच मला जाताना सरणावर कळले होते इतकेच मला जाताना परदेशी कळले होते 'माय नेम इज खान' म्हणूनच गोर्‍याने छळले होते ही मिडिया हपापलेली फुकटात बरळली नाही मी बहर इथे पैशांचे भरपूर उधळले होते मी लबाड इतका आहे हे सांग कुणा कळले का? मी पैसे 'कोल्ह्याकडुनी' आधीच उकळले होते त्या माजी राष्ट्रपतींची मी उगाच नक्कल केली लावून दिवे अंबर का हे कधी उजळले होते? स्टंट नव्हे तर प्रथाच ही चंदेरी दुनियेमधली अफवांच्या शिळ्या कढीला मी फक्त उकळले होते माघारी आल्यावरती मी शब्द फिरविले सारे करणार काय लोकांचे जर पित्त
काव्यरस

७.४७

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 17/09/2009 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
७.४७ ची दादर कल्याण लोकल. तोच ठराविक डबा. तोच नेहेमीचा ६ जणांचा ग्रुप. अर्थात मला कधी बसायला मिळाले नाही. गाडी प्लॅटफॉर्म मधे शिरता शिरता घुसायचे प्रयोग सध्या करत नाही. डब्यात शिरल्यावर डाव्या बाजुच्या ठराविक सहा आसने ह्याना दरदिवशी मिळतात. दिवसभर गांजलेले हे महापुरुष ह्या एक तासाचा रिचार्जिंग साठी उपयोग करतात. मैत्री, असुया संवाद, विसंवाद सर्व काही. कधी आवरणातले, कधी अगदी मोकळे. आजुबाजुचे काय म्हणतील ह्याची अजिबात पर्वा नाही. पत्ते खेळत नाहीत, भजन म्हणत नाहीत. सुख दु:खाच्या मोकळ्या गप्पा. सर्व जण ४५ ते ५० चे कित्येक वर्षाचे 'लोकल नाते' गेले जवळ जवळ महीनाभर दादरवरुन येताना मी हीच लोकल पकडतो. _

दयाशील असणं ही एक प्रकारची देणगी आहे.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 17/09/2009 07:01 या दिवशी प्रकाशित केले.
"जेव्हा दयाशीलता आणि प्रेम ह्या मधली संदिग्धता जास्त स्पष्ट होत जाते तेव्हा त्या मधली बारकाई पाहून मी बराच प्रभावित होतो." कमलाकर धारणकर हा माझा शाळकरी दोस्त.आपल्या आईवडीलांचा एकूलता एक मुलगा.म्हणून लाडावलेला नव्हता. लहानपणापासूनच तो हुशार आणि शिस्त बाळगून होता.हे गुण त्याच्या अंगात उपजतच आले होते.कधी कधी आम्ही भेटलो की बालपणाच्या आठवणी काढून गप्पा मारतो.आणि आता ह्या वयावर त्यावेळच्या मनावर बिंबवून गेलेल्या आठवणीत ठेवण्यासारख्या घटनांचं चर्वीचरण करून एखाद्या तरी निर्णयाला येतो.कमलाकर मनाने अळकूळा होता.जरा मन दुखलं की रडायचा. "तू लहानपणी खूपच भावनाप्रधान होतास.तसाच आता आहेस का?