न्यायशास्त्रभ्यासासंबंधी एक प्रश्न.
न्यायशास्त्रभ्यासासंबंधी एक प्रश्न.
नमस्कार,
श्री. अमर्त्य सेन ह्यांनी अलिकडेच 'ऐडिआ आफ् जस्टिस्' नामक एक पुस्तक लिहिले आहे. त्यासंबंधीची मराठीभाषिक वृत्तपत्रांतील परीक्षणे अभ्यासतांना एका वृत्तपत्रांत श्री. अमर्त्य ह्यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेचा वृत्तांत वाचनांत आला. ह्या पत्रकार परिषदेमध्ये श्री. अमर्त्यांनी पत्रकारमित्रांस एक प्रश्न केला, आणि त्याची सकारण समर्पक उत्तरे मागविली. त्या प्रश्नासंबंधी चर्चा होणे मला येथे अपेक्षित आहे.
श्री. अमर्त्य ह्यांचा प्रश्न असा :
अ, ब, क ह्या तीन स्वतंत्र व्यक्ती आहेत. ह्या तिघांमध्ये आत्ता ह्या क्षणी काही वाद-तंटा चालू आहे. तो तंटा त्यांच्यासमोर खाली पडलेल्या एका बासरीविषयी आहे.
- अ चे म्हणणे असे आहे : बांबूपासून बासरी कशी तयार करतांत ह्या गोष्टीचे ज्ञान केवळ आणि केवळ मलांच आहे, हे ज्ञान इतरांस नाही. ही बासरी मी स्वत: बनविलेली आहे आणि त्यामुळे ही बासरी मलाच मिळावी. ती इतर कोणासही मिळाल्यास माझ्यावर घोर अन्याय होईल.
- ब चे म्हणणे असे आहे : बासरीचे वादन कसे करतांत ह्या गोष्टीचे ज्ञान केवळ आणि केवळ मलांच आहे. मी सोडून अन्य कोणांसही ती सुमधुररीत्या अथवा कशीही वाजवितां येतच नाही, त्यामुळे ही बासरी मलाच मिळावी. ती इतर कोणासही मिळाल्यास माझ्यावर घोर अन्याय होईल.
- क चे म्हणणे असे आहे : मला माझ्या बालपणापासून कधीही कोणतीही गोष्ट खेळावयांस मिळाली नाही. मला बासरी मिळाल्यास मला तिचा खेळणे म्हणून उपयोग होईल. माझ्याकरिता तिचे अत्यंत महत्त्व आहे, आणि माझ्याशिवाय ते इतर कोणीही जाणू शकत नाही, त्यामुळे ही बासरी मलाच मिळावी. ती इतर कोणासही मिळाल्यास माझ्यावर घोर अन्याय होईल.
- वाचकांनी न्यायाधीशाच्या भूमिकेत शिरून बासरी कोणास द्यावी हे ठरवावे.
- असे करतांना त्यातल्यात्यांत सर्वमान्य न्याय होणे आवश्यक आहे हे ध्यानांत घ्यावे.
- तिघांनीही आपापली विधाने पुराव्याने सिद्ध केलेली आहेत. तथापि दिलेली माहिती ही सत्य आहे हे समजून न्याय करावा.
- दिलेल्या माहितीव्यतिरिक्त अन्य माहिती नाही हे जाणावे.
- आपण केलेला निर्णय हा न्याय कसा ठरतो ह्याचे सकारण समर्पक आणि शक्य झाल्यास सोदाहरण स्पष्टीकरण थोडक्यात करावे.
- ह्यासर्वांउपर एक गोष्ट ध्यानांत घ्यावी ती अशी की श्री. अमर्त्यांस ह्या प्रश्नाचे उत्तर समाजशास्त्रीय दृष्टीकोणातून देणे अपेक्षित असल्यामुळे अमुक एक उत्तर तेवढेच सत्य आणि इतर सारी उत्तरे असत्य असे कदापि म्हणतां येणार नाही. त्यामुळे इतरांनी दिलेल्या उत्तरांचे शक्यतो खंडन करू नये.
- उत्तरे खरडवही/व्यनि इत्यादिने न देता येथेच द्यावीत.
वाचने
15572
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
ती बासरी क
In reply to ती बासरी क by अवलिया
+१ सहमत..
न्यायाधीश
अवांतर :
बासरी "अ"
अ ने ती
In reply to अ ने ती by युयुत्सु
युयुत्सु
** एक छोटी बासरी !
अ ची
तसे असेल तर ..
मूळ प्रश्न.
In reply to मूळ प्रश्न. by हैयो हैयैयो
तरीही
In reply to तरीही by युयुत्सु
येथील प्रश्नासंदर्भात
ब ला ति
मला वाटते...
अ ने
न्याय
होय.
- बासरी = मुंबई
- अ = राज ठाकरे आणि त्यांचे समर्थक. मराठी माणसाचा मुंबईवर पहिला अधिकार इत्यादि इत्यादि.
- ब = अमराठी उद्योजक आणि त्यांचे समर्थक, ज्यांनी मुंबईच्या जडणघडणीत मोठा वाटा उचलला. ह्यांना कमी काय म्हणून लेखावे?
- क = अन्यभाषिक. ज्यांना विकास म्हणजे काय हे अद्यापपावेतो माहिती नाही. विकास म्हणजे काय हे समजल्यास विकासात योगदान देवू शकू असा आत्मविश्वास बाळगणारे असे.
हे एक उदाहरण हे केवळ सुज्ञ वाचकांस श्री. अमर्त्यांचा मूळ प्रश्न अधिक सोप्यारीतिने कळावा म्हणून घेतले आहे. अशी अनेक उदाहरणे ह्यात बसविता येतील. तर, मूळ प्रश्नांविषयी विस्तारीत दृष्टीकोनातून चर्चा व्हावी. मूळ प्रश्न न्याय कसा करता येईल हा आहे. धन्यवाद. -- तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु! हैयो हैयैयो!In reply to होय. by हैयो हैयैयो
अमान्य....
In reply to अमान्य.... by प्रभाकर पेठकर
पेठकरांशी
बासरी
निकाल
In reply to निकाल by ऋषिकेश
सही
बासरी,
माझे उत्तर
सामाजिक प्रश्नाची उत्तम मांडणी
In reply to सामाजिक प्रश्नाची उत्तम मांडणी by धनंजय
२. 'ब' कूळ
समाधान
आमचं उत्तर
In reply to आमचं उत्तर by विसोबा खेचर
डोळ्यासमो
बासरीचे उपयोग
न्याय आणि अन्याय
- अ ने स्वत: बासरी बनविली असली तरी प्रत्येकच वेळी प्रत्येक परिस्थितीत तीवर स्वत:चेच स्वामित्त्व गाजविणे शक्य होणार नाही असे मान्य केल्यास आणि आपण दुसरीही बासरी बनवू शकू असे जाणल्यास (पक्षी : तडजोड) त्याच्यापुरता प्रश्नच संपू शकेल.
- ब ने केवळ आपणांसच बासरी वाजविता येते म्हणून केवळ आपणांस हीच बासरी हवी आहे असा हट्ट सोडल्यास आणि आपणांस दुसरी बासरी मिळू शकेल असे जाणल्यास (पक्षी : तडजोड) त्याच्यापुरता प्रश्नच संपू शकेल.
- क ने आपणांस बासरी बनविताही येत नाही आणि वाजवितांही येत नाही आणि खेळणी ही दुसरीही मिळू शकतील, हे जाणून घेवून स्वत:चा हट्ट सोडल्यास (पक्षी : तडजोड) त्याच्यापुरता प्रश्नच संपू शकेल.
एकदा का समस्यापूर्तीसाठी तडजोड करावयाची असे ठरले की तडजोडीचे इतर अनेक मुद्दे सापडतील. परंतु तडजोड असे म्हटले की येथेच व्यक्तिवादाचा उगम होतो. मीच काय म्हणून माघार घ्यावी अशी एक भूमिका निर्माण होण्याची शक्यता असते. ही भूमिका निर्माण तशी निर्माण होतेच, आणि तेच बर्याचशा वादाचे मूळ असते. (ह्या ठिकाणी तीनही वादींना श्री. नितिन म्हणतांत तसा कर्माचा सिद्धांत सांगता येईल, परंतु तो भाग येथे निराळा आहे.) व्यक्तिवादी अभ्यासकांचे सर्वसाधारण म्हणणे असे की एकदा कां तडजोड झाली की (समस्येचे समाधान होत असले तरीही) तो न्याय होणार नाही. त्यांच्या युक्तिवादाप्रमाणे सार्वत्रिक असमतेचा नाश होणे हे न्यायास अपेक्षित असते आणि तसे होत नसेल तर ’सामाजिक न्याय’ ही संकल्पनाच मुळांत एक myth आहे. (श्री. युयुत्सु सरांनीही असे वाचल्याचे स्मरते आहे असे कळविले आहे.) श्री. अमर्त्यांच्या विचारामुळे जी खळबळ उडाली आहे, तिचे कारण असे, की ’सामाजिक न्याय’ ह्या संकल्पनेचे अस्तित्त्व अमान्य करावयाचे झाल्यास, ज्या न्यायाने ते अस्तित्त्व अमान्य करावयाचे त्याच न्यायाने ’सामाजिक अन्याय’ ह्या संकल्पनेचे अस्तित्त्वदेखील अमान्य करावे लागेल. न्याय - अन्याय हे काही प्रमाणांमध्ये मोजमाप करता येणारे पदार्थ नव्हेत. पूर्वी अन्याय आणि नंतर न्याय असे त्यांचे सर्वसाधारण स्वरूप असते. जर अन्यायाचाच मुळी अभाव असेल, तर न्यायाचे अस्तित्त्व ते काय? आणि अलिकडे आपल्याकडेही अनेक मंडळी न्याय वगैरे काही नसतोच अशी कुरबुर करतांना दिसतात..! पण न्याय - अन्याय ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत. त्यामुळे 'न्याय नसतोच' हे प्रतिपादन खरे मानावयाचे झाल्यास 'अन्यायदेखील नसतोच' असे प्रतिपादन मान्य करणे भाग पडेल. आणि ते मान्य करण्यास न्यायशास्त्राभ्यासक सध्या तरी तयार नाहीत. -- तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु! हैयो हैयैयो!विचारप्रवर्तक
आदर्श
हॅ हॅ
तो तंटा त्यांच्यासमोर खाली पडलेल्या एका बासरीविषयी आहे.