२००९ मिपा गौरव "नोबल" पुरस्कार
२००९ मिपा गौरव "नोबल" पुरस्कार
नामांकनः २००९
हे सदर चर्चाकारांकरता व चर्चाप्रस्तावकांकरता आहे. आपण मराठी माणसं वैचारिक, आणि बुद्धीवादी वगैरे चर्चा करण्यात एकदम पटाईत असतो.
कृपया आपण आपले नामांकन (स्वत: चे नामांकन करता येणार नाहि) सदर नमुन्यात सादर करावे:
नाव :
वर्गिकरण : (उदा. "शांतता","रसायन शास्त्र", "भौतिक शास्त्र", "समाज शास्त्र", इ. इ )
कारणः ( उदा. विशेष कार्य, लेख, इ. इ )
येथे होणार्या चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी इच्छा आहे. नामांकनाची अंतिम तारीख ओक्टोबर १५ ,२००९.
एका तळ्याची गोष्ट
किती तपं लोटली या गोष्टीला! एक सुरेखसं तळं होतं. शांत, नितळ, स्वच्छ निळंशार पाणी. काठावरची हिरवीगार उंच उंच झाडं वाकून प्रतिबिंब पहायची त्यात. आभाळही आपली निळाई शोधायचं त्या तरल पाण्यात. चिमणी पाखरं जाता येता हळूच आपल्या इवल्याशा चोचीत इतकासा थेंब वेचून हलकेसे तरंग उठवून जात. सूर्याचे किरण सकाळ-संध्याकाळी त्या पाण्यात सोन्याच्या राशी ओतत असत. तळं खूप आनंदात होतं.
अचानक सगळं चित्र बदललं. कोणा एकानं गंमत म्हणून तळ्यात एक खडा टाकला. तळ्याचा थरकाप झाला. नितळ पाण्यावर कितीतरी तरंग उठले. त्या एकाला अजूनच गंमत वाटली. त्यानं आणखी एक खडा टाकला. तरंग उठतच राहिले. आता हा एक नवा खेळच झाला!
"सखी शेजारणी तू हंसत रहा"
शरद,रमेश आणि सुमन ही तिन भावंडं घरात किंवा बाहेर सदाची मजा-मस्करी करण्यात दिसायची.कदाचीत हे गुण त्यांना त्यांच्या आईकडून आले असावेत.त्यांची आई प्रत्येक उच्चारलेल्या वाक्यागणीक हंसून समारोप करायची.मला ह्या कुटूंबात वेळ घालवायला आवडायचं.मी दुसर्या मजल्यावर राहत असल्याने आणि हे कुटूंब पहिल्या मजल्यावर असल्याने ह्यांच्या घरावरून जावं लागायचं.ह्याच्या घराच्या जवळ आल्यावर हस्याचे फुलोरे ऐकायलामिळायचे.बरं वाटायचं.ह्यांचे वडिल मात्र स्वभावाने अगदी मख्खं.
गालावर माशी बसली तरी ते ती हाकलण्यासाठी गाल हलवत नसत.ही एक दुसर्या टोकाची व्यक्ती होती.
सुमन स्वभावाने शांत पण वागायला भावांसारखी मिष्कील होती.
गीतार्थ बोधिनीचे लेखक कोण?
गीतार्थ बोधिनी नावाचा एक खूप जुना ग्रंथ नुकताच पाहण्यात आला. पहिली काही पाने फाटलेली असल्याने लेखक, प्रकाशक, प्रकाशन वर्ष ही माहिती उपलब्ध नाही. गीतेचा मूळ श्लोक, समश्लोक, आर्या, दोहा, ओवी, अभंग (मूळ श्लोकाच्या आशयाची) असे या ग्रंथाचे स्वरुप आहे. अध्यायांच्या सुरवातीला वामनकृत असा उल्लेख आहे.
ही रचना वामन पंडितांची असावी या समजुतीने खापरे.ऑर्ग वर शोध घेतला. तिथे वामन पंडितांच्या साहित्यकृतीत या पुस्तकाचा उल्लेख नाही. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या साईटवर त्यांच्याकडील जुन्या ग्रंथांच्या यादीत या नावाचे एक पुस्तक आहे पण लेखकाचा उल्लेख नाही. याबद्दल कुणी अचूक माहिती देऊ शकेल काय?
ऐरावती रत्न थोर
नोबेल पुरस्कार (विशेष करून शांतता) देताना राजकारण होते हे नक्कीच. ते केवळ अमेरिकन फिक्सिंग नसून नॉर्वेजीयन फिक्सिंग आहे, किंबहूना हे महासत्तांचे एकत्रीत फिक्सिंग आहे. बर्याचदा ज्या देशात सौंदर्यसाधने खपवायची असतात त्या देशातील युवतींना "मिस युनिव्हर्स" केले जाते तसेच ज्या मुद्यांना जोर देयचा असतो त्यातील व्यक्तीस नोबेल शांतता पुरस्कार दिला जातो. म्हणूनच दुर्दैवाने गांधीजींना मिळाला नाही. नेहरूंनी तर इतके चीन विरुद्ध शांतताप्रिय राहून हरून दाखवले तरी देखील मिळाला नाही कारण त्या काळातील जागतीक राजकारणात त्याचे महत्व नव्हते.
मराठी नहीं है राज ठाकरे..!
राज ठाकरे यांचे आंदोलन आणि मुंबई मराठी माणसाचीच या त्यांच्या भूमिकेवर हिंदी माध्यमातून नेहमीच टीका केली जात असते. मात्र एका हिंदी भाषकाने तर राज यांच्या मराठी असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
टाटा स्काय प्लस... माहिती हवी आहे...
हे टाटा स्काय प्लस प्रकरण जेव्हा गेल्या वर्षी आले होते तेव्हा चांगलेच इन्ट्रेष्टिंग वाटले होते पण किंमत महाग म्हणून आम्ही घेतले नाही..
डीटीएच मध्ये लाईव्ह टीव्ही पॊज, रेकॊर्ड आणि रिवाईन्ड ्करता येते.
४५ तासाचे रेकॊर्डिंग उपलब्ध असते.
ते लोक असे म्हणतात की आपली टीव्ही पहायची पद्धत बदलून टाकेल टाटा स्काय प्लस.
पुष्कळ निरर्थक पाहण्यात वेळ जातो, त्याऐवजी मोजकेच उपयोगी कार्यक्रम पाहिले जातील असे वाटते.
तेव्हा किंमत ९ हजार होती.
घर
टप, टप, टप करत बाजुच्या खिडकिवरचे पावसाचे थेंब जुन्या आठवणींत ओढताहेत.
परवा माझ्या नवीन फ्लॅट चा ताबा मिळनार, नवीन फ्लॅट बराच मोठा आणी मस्त सोसायटीत आहे म्हणुन घरचे सर्व जण खुष, आनंद आहे, पण काय माहीत माझ्या सध्याच्या घराला काय वाटत असावे!
--------------
खर्रर खर्रर खच्च, घरासमोर ४०७ टेंपो येवुन थांबला, बोलल्याप्रमाणे आज घराचा ताबा घेण्यासाठी दशरथ आला होता.
मिसळपाव