लेखकप्रभोयांनी बुधवार, 28/10/2009 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
चंगळवादी आणी आद्य विठोबा रहिवासी असलेल्या अमेरिकेच्या संयुक्त संस्थानी कनेक्टीकट भागातील डॅनबरी क्षेत्री अथवा जवळपास कोणी मिपाकर वारकरी राहतात का?? असल्यास कळवा.
अवांतरः येत्या ९ तारखेपासून ३-४ महिन्यासाठी माझी बदली तिकडे होतेय......
लेखकपरिकथेतील राजकुमारयांनी बुधवार, 28/10/2009 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
प्रश्न :- ताई, मी मिसळपाव वरील एक स्त्री सभासद आहे, माझे खुप मित्र आणी खुप फॅन्स पण आहेत. मी सगळ्या धाग्यांवर भरभरुन प्रतिसाद देते पण सभासद मला 'उगाच पुढे पुढे करणारी, अतिशहाणी आणी बालिश' म्हणतात. आजकाल तर काही सभासद मला तुझे खाते 'फेक' आहे म्हणतात. काहि स्त्री सभासद तर मला मुद्दामुन "काय रे कसा आहेस?" असे विचारतात. पुरुष सभासद "मला फोन कर म्हणजे तुझ्या आवाजावरुन तु मुलगी आहेस का नाही ते कळेल" म्हणतात. सगळेच माझ्या ज्ञानावर व रुपावर जळतात. ताई मी काय करु ?
लेखकअक्षय पुर्णपात्रेयांनी मंगळवार, 27/10/2009 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर यापुर्वी सिद्धहस्त लेखकांविषयी चर्चा झालेली आहे. या लेखकांपैकी काही जण आजकाल फारसे लिहित नाहीत तर काहीजण अजिबातच लिहितांना दिसत नाही. गेल्या काही महिन्यांत ज्यांचे लेखन आवडले त्या लेखकांसंदर्भात हा चर्चाविषय आहे. सध्या लिहीते असलेले तीन लेखक रामदास, श्रावण मोडक आणि संजोप राव हे या मिपावर लक्षवेधी आणि वाचनीय ललितलेखन करतांना आढळतात. तीन्हींची शैली, हाताळलेले विषय निराळे आहेत. नुकतीच राव यांनी 'माझे खाद्य-पेय जीवन' ही लेखमाला सुरू केलेली आहे. रामदासांचा धातुकोष आणि मोडकांच्या श्रावणनोंदी लेखमाला प्रसिद्धच आहेत तसेच अपुर्णही.
लेखकमस्तानीयांनी मंगळवार, 27/10/2009 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी !
शाळेत असताना लिहावे लागलेले निबंध यापलीकडे लिखाण न केलेली मी ... पण गेले काही दिवस नियमितपणे मिपावर बागडत असते, त्यामुळे "मी सुद्धा लिहू शकेन" असा काहीसा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. तो वापरूनच आज हे धाडस करीत आहे. बघू कसं काय आणि कितपत जमतंय ते !
आम्ही सध्या आहोत अमेरिकेतल्या मिशिगन राज्यात. एकाच हिमवादळात चांगला फुट- २ फुट बर्फ आणणारा हिवाळा आणि कायम शून्याखाली तापमान अशी थंडी चालू होण्याआधी अधाशासारखे फिरून घेणारे लोक आहेत इथे ... २/३ हिवाळे पाहील्याने आम्हीही "आधीच" एखाद्या ठिकाणी जाऊ असा विचार केला. बरं, एक ठिकाण ऐकून माहित होत. Pictured Rocks National Lakeshore.
लेखकनेहमी आनंदीयांनी मंगळवार, 27/10/2009 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
अ्चानकच तूला अस समोर बघितलं
आणि काय झालं न कळे
शुष्क असलेल्या जिवनात
एक कोम्बं अंकुरलं.....
निगा राखावी तर कशी कळेना
पाऊस प्रेमाचा कधी पडेना
रान वाळवंट झाले....
ग्रिष्माचे रण माजले....
मग केले हद्दपार पावसाला
या जिवनातून
तुझ्यासकट......
आणि पुन्हा अचानक....
हो अचानकच.....
तू समोर आलास..
ठरवलं होत थेंब हे
पडु द्यायचे नाहित तरी
उगाच पाणी तरळले
झिरपु नकोस म्हंटल तरी
हा पाऊस कोसळलाच
प्रसन्ना जीके
लेखकविसोबा खेचरयांनी मंगळवार, 27/10/2009 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो,
हे मिपाचे वैभव! हे केवळ अन् केवळ तुम्हा सर्व मिपाकरांमुळेच शक्य आहे. मी सर्वांचा ऋणी आहे..
आपला,
(कृतार्थ आणि कृतज्ञ) तात्या अभ्यंकर.