Skip to main content

मी लिहितो तेव्हा...

प्रकाशित मुखपृष्ठ
============ मी लिहितो तेव्हा माझी, लेखणी बासरी होते मी जिथे सारखा बसतो ती अशी ओसरी होते मी लिहितो तेव्हा सगळ्या सृष्टीचा कागद होतो शब्दांच्या वर्षावाला जो टिपतो, ओला होतो मी लिहितो तेव्हा लिहिणे, स्वप्नाहून सुंदर होते कवितेच्या दवबिंदूंनी पानांची थरथर होते मी लिहितो तेव्हा तेव्हा, मी लिहितो ऐसे काही, जणू धमन्यांमधे माझ्या वाहते जांभळी शाई.. मी लिहितो तेव्हा मजला, जाणवते अपुले अंतर कवितेच्या थोडे आधी, कवितेच्या थोडे नंतर....! -ज्ञानेश. ============== (नमस्कार मिपाकर मंडळी... मी सदस्य म्हणून इथे तसा नव्यानेच आलोय. 'पाहुणा' म्हणून बर्‍याच दिवसांपासून आहे. मिपाकरांनी या कवितेवर आपला अभिप्राय कळवावा.)

याद्या 4090
प्रतिक्रिया 22

लेखनविषय:

सुरेख कविता. शेवटचं कडवं तर खूप खास. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी

झकासच हो ज्ञानेश्वर माउली. मी लिहितो तेव्हा माझी, लेखणी बासरी होते ह्या ओळी एकदम मस्तच. ©º°¨¨°º© परा महानोर ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

वा ज्ञानेशराव, मस्त ! आवडली :-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

वाहवा.. छानच आहे कविता. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

कवितेच्या दवबिंदूंनी पानांची थरथर होते क्या बात है!! कवितेचा शेवट खूप आवडला. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by चतुरंग

रंगाशेठनी किंवा केशवसुमारांनी विडंबन केले तर कविता चांगली असल्याची पावतीच समजावी. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)

वा ! मस्त !! --अवलिया ============================= रामायण महाभारत घडायला स्त्रीची गरज आहे असे नाही, आजकाल सही ते काम करते. ;)

सर्व प्रतिसादकांचे आभार मानतो. @चतुरंग राव- तुमचा 'दूसरा' ही आवडला. ;) "Great Power Comes With Great Responssibilities"

छान ! शेवटचे कडवे छान. मिपावर स्वागत :) -- लिखाळ.

सुंदर कविता. आवडली. (आस्वादक)बेसनलाडू

कविता मस्तच.... >>>(नमस्कार मिपाकर मंडळी... मी सदस्य म्हणून इथे तसा नव्यानेच आलोय. 'पाहुणा' म्हणून बर्‍याच दिवसांपासून आहे. मिपाकरांनी या कवितेवर आपला अभिप्राय कळवावा.) भौ, तुमचा बिल्ला नंबर १४४६ आहे.. मग तुम्ही नवे सद्स्य कसे? :? कधी कधी डोक नको त्या गोष्टित चालत म्हणुन विचारले..

In reply to by टुकुल

आपली शंका रास्त आहे. मी खाते उघडून बरेच दिवस झाले आहेत. पण मी मिपावर खाते उघडले आहे, हे मीच विसरलो होतो. आता नव्याने खाते उघडले, त्यावेळी 'तुमचा विरोपपत्ता आधीच वापरात आहे" असा संदेश दिसला. पाहिले, तर माझेच नाव! म्हणून मी नवा ! (जुना म्हटलात तरी हरकत नाही !!) :> "Great Power Comes With Great Responsibilities"

छान. मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa

मस्त! शेवटचे कडवे विशेष आवडले मिपावर स्वागत ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे