Skip to main content

निवडणुका आणि मानोसपचार तज्ज्ञ ...

लेखक छोटा डॉन यांनी सोमवार, 26/10/2009 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या घराच्या विस्तिर्ण अशा बाल्कनीवर फ़ेर्‍या मारुन ( वे समोर तेच तेच "पडलेले" चेहरे पाहुन ) दादुमहाराजांना प्रचंड वैताग आला आहे, काय करावे काही सुचत नाही. जरा कुठे बाहेर जावे म्हटले तर मिडीयाच्या आग्यामोहळाचा टेरर आहे म्हणुन तो ही उपाय कटाप. मधुनच मिलिंद त्याच्या ब्लॆकबेरीमध्ये डोकावुन काही तरी युसलेस डेटा देत असतो, कार्यकारी संपादक व खासदार ही उगाच काहीतरी बोलायचे म्हणुन उसने अवसान आणुन बोलत असतात पण आता त्याला काहीच अर्थ नाही हे दादुमहाराजांना उमजले आहे म्हणुन ते “जाऊ दे आता, काय करणार ?” अशा अर्थाचे हातवारे करत असतात.

जुनी पत्रं

लेखक नेहमी आनंदी यांनी सोमवार, 26/10/2009 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज उघडुन बसले होते सगळी जुनी पत्रे तुझी, माझी, काही जपलेली, न पाठवलेली, काही फाडलेली.... कधी डोळे भरुन येत होते कधी रागाने लाल होत होते.. कधी मी उदास होत होते कधी हरवून जात होते... एक पत्र तुझं मला पाठवलेलं एक असच खुप जुन्या मैत्रिणीचं पहिल्यांदा माहेरी गेल्य नंतर एकटं वाटत असताना तू लिहिलेलं तसचं तुझ्या सोबत आल्यानंतर सखी ने पा्ठवलेले खास बंध.... असच एक पत्र हाती आलं खुप खोल दडवून ठेवलेलं.. माझ्या बाबांच...... लग्नानंतर आलेल पहिलं पत्र... खुपसं काळजी करणारं तेवढचं धीर देणारं.. खुप न सांगता खुप काही सांगणारं.... जपुन ठेवलय मी आज ही आज तेच पत्रं म्हणजे माझे बाबा झालेय मला सोडून गेलेले पण
काव्यरस

एक मुका प्रेमसंवाद!

लेखक ज्ञानेश... यांनी सोमवार, 26/10/2009 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
(नमस्कार मंडळी! मिपावरील स्माईलीज माझ्या कायम फेवरिट राहिल्या आहेत. त्यांचाच वापर करून केलाय हा उद्योग! जमलंय का, बघा...

संघटनापालट-३

लेखक अन्वय यांनी सोमवार, 26/10/2009 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
जेवण घेऊन काका पुतणे दोघेही पुन्हा दिवाणखान्यात येऊन विसावले होते. --- "राज, मला या सगळ्या गोष्टींचा आता तिटकारा आलाय. माझ्या आयुष्यात मी कधीच वजाबाकी केली नाही. माझा जो काही निर्णय असे तो सर्वांच्या हिताचाच असे. माझ्या हिताला मी कधीही प्राधान्य दिलं नाही. पण या उतारवयांतच मला काही कटू आणि मनाला न पटणारे निर्णय घ्यावे लागलेत. त्यामुळे तुझ्यासारखी माणसे मला दुरावली. मी उभं केलेलं वैभव लयाला जात आहे. हे माझ्या डोळ्यासमोर घडते आहे आणि मी काहीच करू शकत नाही. याचं अतीव दु:ख होतंय. यानंच मी खचून गेलोय. या ढाण्या वाघाचा आवाज आता पार बसलाय. डरकाळी फोडण्याची इच्छा होते; पण ती तोंडातून बाहेर पडत नाही.

(किराणा मालाच्या दुकानाचा अति संक्षिप्त इतिहास...)

लेखक पर्नल नेने मराठे यांनी सोमवार, 26/10/2009 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
किराणा मालाचे दुकान काढावे असे माझ्या मनात आले, आले गेले मला सल्ला देउ लागले, लागले सवरले काही तर आम्हाला सान्ग म्हणत सर्वजण, सर्वजण मदत करु लागले आणी दुकान सुरु झाले, झाले सुरु दुकान तसे सगळे मिपाकर खरेदीला यायला लागले, लागले यायला बरेच लोक तसा मला स्टाफ़ कमी पडु लागला, लागला तसा नोकरीला दुकानात माझ्या अवलिया व परा, परा मग येइल जाइल ते पाखरु न्याहाळु लागला, लागला मग वाटु मला सिन्सियर एकच अवलिया, अवलिया झाला कालान्तराने मग म्यानेजर, म्यानेजर झाला तसा लागला हा कविता करु नाना, नाना नाना म्हणत पोरी गोन्डा घॊळवु लागल्या, लागल्या हिशोबाची वजा जाता मला घाम फ़ुटु लागला, लागला मला शोध मिच दुकानाची ड्
काव्यरस

उकडहंडी

लेखक गणपा यांनी सोमवार, 26/10/2009 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी.. आज एका अत्यंत चवीष्ट भाजीची तितकीच सोप्पी कृती घेउन आपल्या सेवेसी हजर आहे. ही भाजी आमच्या गावी साधारण फेब-मार्च महिन्यात होळीच्या आसपास केली जाते. त्यावेळी वाडीत बर्‍या पैकी भाजीपाला असतो. गावी ही भाजी मातीच्या मडक्यात करतात. सगळे जिन्नस एकत्र करुन हे मडके एका खड्यात ठेवुन वरुन जाळ करतात. पण आपल्या शहरात एक वेळ मडक मिळेल पण ते पुरायच कुठे आणि जाळ कसा करायचा ? पण एवढ्याश्या कारणासाठी आपण या चवीष्ट भाजीला का मुकावं बर? म्हणुन आपल्या घरात करता येइल अशी कृती देत आहे.

सूर्यास्ता नंतर...

लेखक अभिजा यांनी सोमवार, 26/10/2009 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
हाजीअली जवळून टिपलेले सूर्यास्ता नंतरचे रंगतरंग...

दाल बाफला

लेखक नेहमी आनंदी यांनी सोमवार, 26/10/2009 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
तुरीची डाळ १ वाटी हळद, तिखट, मीठ चवी नुसार, (ओल खोबरं एक तुकडा, २ चमचे दाणे, २ कांदे, ४ लसुण पाकळया, १ इंच आले), हे साहित्य मिक्सर मधुन बरिक करून घ्यावे. कोथिंबिर, मिरच्या ४,हिंग, २ बारिक चिरलेला टोमटो फोडणीला तेल जाड दळलेली गव्हाचे पीठ, मोहनासाठी,तेल, साय्,मीठ, चिमुट्भर हळद, आणि सगळे भिजवायला पाणी. तुरीची डाळ कुकर मधे चांगली शुजवून घ्यावी. रगडून घ्यावी. आता कढईत तेल घालून त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या, हिंग टाकून त्यावर मिक्सर मधून काढलेला मसाला घालावा.तो शिजत आला की बारिक चिरलेले टॉमटॉ टाकावे.

मुंबई महाराष्ट्राच्या गळ्यातील धोंड?

लेखक भोचक यांनी सोमवार, 26/10/2009 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई ही महाराष्ट्राच्या गळ्यातील धोंड? या शीर्षकाचा हा दत्तप्रसाद दाभोलकरांचा लेख आवर्जून वाचण्यासारखा आहे. सगळ्यांनाच तो पटेल असेही नाही. खरं तर मुंबईविषयी असे वाचताना ते पचवून घेणे अवघड जाते. दाभोलकरांच्या मते मुंबईसाठी उर्वरित महाराष्ट्राने इतका त्याग केला आहे आणि करत आहे की त्या तुलनेत त्यांना काहीही मिळालेले नाही. मुंबईतली वीज, पाणी उर्वरित महाराष्ट्रातूनच जाते.