Skip to main content

छायाचित्र प्रदर्शन - लडाख

लेखक आकडा यांनी गुरुवार, 10/12/2009 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
ठाण्यात उद्यापासून 'लडाख - ए फॅण्टसी लॅण्ड' हे छायाचित्रांचं प्रदर्शन ठाणे कला भवन, बिग बझार जवळ, कापूरबावडी, ठाणे भरणार आहे. वेळा : ११ डिसें: संध्याकाळी ५ ते ८ १२ - १३ डिसेंबरः सकाळी १० ते रात्री ८ हे फोटो श्री. गजानन देवधर आणि श्री. शशांक गुर्जर यांनी काढलेले आहेत. श्री. देवधर ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. श्री. गुर्जर हे जॉन्सन अ‍ॅंड जॉन्सन या कंपनीत आहेत. सुंदर लडाखचे फोटोंचा मिपाकरांनीही जरूर आनंद घ्यावा.

बेंगळुरुमध्ये मराठी शाकाहारी भोजनालये, खानावळी, डबेवाले

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी गुरुवार, 10/12/2009 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
काकांच्या वयाच्या असलेल्या माझ्या एका मित्राचा मुलगा काही महिन्यांपासून बंगळुरूमध्ये नोकरीनिमित्त आहे. कोरमंगल, इंदिरानगर या भागात राहतो. तो १००% शाकाहारी आहे. महाराष्ट्रीय पद्धतीचं जेवण कुठे चांगलं मिळेल हे त्याला माहित नसल्यामुळे सध्या जेवणाचे प्रॉब्लेम्स येत आहेत. बंगळुरूला राहणार्‍या मिपाकरांपैकी कोणाला कोरमंगल, इंदिरानगर किंवा आसपासच्या भागात मराठी पद्धतीचं जेवण कुठे मिळेल याबद्दल माहिती असल्यास सांगाल. शक्यतो खानावळ किंवा डबेवाले असल्यास (महिन्याचे पैसे भरून जेवण मिळेल अशी सोय असावी) इथे कळवा. धन्यवाद. -प्रशांत

त्या आठवणी

लेखक सुनिल पाटकर यांनी गुरुवार, 10/12/2009 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
बजाजने स्कुटर उत्पादन बंद केल्याची बातमी टिव्ही.वर पाहिली आणि आठवणींनी मन हेलावून गेले.येथे प्रश्न स्कुटर पूरता मर्यादित नव्हता.काळाच्या ओघात प्रत्येक नवी गोष्ट इतिहास बनून जाते.विकासाच्या लाटेत या गोष्टींच्या उरतात त्या फक्त आठवणी.काँलेजला स्कुटर वरुन येणारे सर,, त्याकाळची तरूंण पोरं... पाच पाच दिवस रेडिओवर ऐकली जाणारी काँमेंट्री..बिनाका गीतमाला आणि अमिन आयानीचा आवाज ऐकण्यासाठी बुधवारची वाट पाहाणारे अनेक जण, अँन्टीना फिरवून फिरवून टिव्ही.वरचा सिनेमा पाहाण्यासाठी चाललेली धडपड..

बुधवारची कविता : (खवट)

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी गुरुवार, 10/12/2009 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
नियमाप्रमाणे या बुधवारी रात्री देखील आम्ही 'साप्ताहिक सांकृतीक कार्यक्रमास' बसलो. थोडेसे कडक धोरण अवलंबल्याने उतरायला वेळ लागला त्यामुळे हि कविता सेवेत रुजू करण्यास उशीर झाला. त्याबद्द्ल मी आपला दिलगीर आहे. आणि हां बदलीन... असो. आमची प्रेरणा ग्लास जरा मी हाती घ्यावा.. पिता पिता काव्य नवे तेव्हाच पडावे .. पिता पिता सोबत होते तिची नि माझी पेग काही जरा बरा चिवडाही मिळावा.. पिता पिता एकदाही पुढे तुझा प्रतिसाद न यावा इतकी का जळजळ व्हावी ..पिता पिता चुकून जुळती कधीमधी मते आपली आठवही त्याचा न उरावा..
काव्यरस

मी पण पळालो...

लेखक विमुक्त यांनी गुरुवार, 10/12/2009 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे मँरेथॉनच्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास लकडीपुलावर प्रचंड गर्दी होती... बरेचजण आमच्या सारखेच पहिल्यांदा मँरेथॉन मधे भाग घेत होते... सगळे चेहरे आनंदी आणि उत्साही होते... वातावरण एकदम वेगळच भारावलेलं होतं... एका शब्दात सांगायच झालं तर प्रचंड "युफोरिया" होता वातावरणात... खालच्या नदी शेजारच्या रस्त्यावर बरेचजण warmup साठी पळत होते... "पश्या, warmup साठी नको पळायला... आत्ताच दमलो तर मेन रेस राहून जाईल" रव्या "हो बे... रेसच्या वेळेस सुरुवातीला हळू पळूत म्हणजे warmup होवून जाईल..." मी पुणे मँरेथॉनच्या आदल्या दिवशी रव्याला फोन केला तर म्हणाला... "नको बे... मी नाही पळत...

घोसाळ्याची भजी

लेखक श्रद्धा. यांनी गुरुवार, 10/12/2009 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
साहीत्य :- घोसाळे.... गोल काप केलेले अथवा फिंगरचिप्स प्रमाणे, डळीचे पीठ, चवीप्रमाणे मीठ, तिखट, हिंग,ओवा,थोडी चिरलेली कोथिंबीर, तळायला तेल. कृती :- प्रथम डाळीच्या पिठात मीठ, तिखट, ओवा, हिंग, घालुन घ्यावा. मग तेल गरम करुन १ मोठा चमचा तेलाचे मोहन त्या पिठात घालावे. पीठात कोथिंबीर घालुन पाणि घालुन सारखे करुन घ्यावे. पीठ फार पातळ अथवा फार घट्ट असु नये. त्यातच घोसाळ्याचे काप घालुन भजी तळुन घ्यावीत..गरम गरम खायला घ्यावीत...

मसाले भात

लेखक श्रद्धा. यांनी गुरुवार, 10/12/2009 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :- २ वाट्या बासमती तांदुळ, १/२ वाटी कोथिंबीर, ३-४ मिरी, ४-५ लवंगा,२/३ तमालपत्री, १०/१२ काजू तुकडे, चिरलेला कोबी १ वाटी ,गाजराचे तुकडे एक वाटी, मोठे २ चमचे गोडा मसाला, चवीपुरते मीठ, २ मोठे चमचे तेल, १ मोठा चमचा तुप, राई, जीरे, हळद, हिंग,आले १ इंच उकललेले पाणी तांदळाच्या अडीचपट कृती :- तांदूळ धुवून १५ मिनीटे निथळत ठेवा.

<सवयीने मंद >

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 10/12/2009 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरीत होऊन लढवावे असे सध्या तुरळकच आढळते तरी ही आमची प्रेरणा ही (सवयीने मंद) होळीची याद देऊन जाणारे विविध नावांचे विरविरीत धागे... काही खुळे, आणि दिशाहीन मठ्ठ काही नेहमी व्यस्त काही सुस्त तेच वळण तेथेच नेणारे फक्त कधी रोडावलेले, निष्कारण थंडावलेले अतीसामान्य कवितेचे जंत ... तरीही एकूणएक कवीता वाचणारा रटाळलेला विचारवंत ... पोळीची साद घालून जाणारे विविध आचार्‍यांचे सुनसान धाबे... काही बळेबळे, आणि चववीहीन घट्ट काही स्वस्त काही फस्त काही जेवण तेच ;तेच वाढणारे रीक्त चवीचे तेच मीठ पीठ अन मसाले कधी शिजलेले , अर्धवट भिजलेले ,

सात ....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 10/12/2009 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
************************************************ या विषयावर आजपर्यंत खुप जणांनी लिहीलेय, खुप सुंदर लिहीलेय. त्या सात महावीरांची आठवण आजही आपल्याला निष्ठेचे महत्व शिकवते.
काव्यरस

रात्र मिलनाची ... !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 10/12/2009 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
मंद वार्‍यात,धूंद तार्‍यात, लाजत रात्र आली चांदण्यांचे तबक हाती, उधळीत रात्र आली ! मंदावला भास्कर.., चांदणे सावळे निळावले स्पर्षाने शशिकराच्या, बघ गरती रात्र झाली ! शृंगारात विरघळे, अस्तमानाचे गीत फिके लाजलेली रातराणी..., फुलवीत रात्र आली ! लज्जेने धरले हळुवार, दाती शेव अंधाराचे गुंफीत गीत मिलनाचे.., आतूर रात्र झाली ! नको रे सख्या हे असे, अता दुरावे अंतरीचे रुणझुणते सुर समीराचे, धुंदीत रात्र आली ! चल मिळून तनुत, आगळा देहराग आळवू मिटले अंतर सगळे...,अन गंधीत रात्र झाली ! विशाल.
काव्यरस