Skip to main content

"ने मजसी ने" ची शताब्दी

लेखक विकास यांनी गुरुवार, 10/12/2009 04:03 या दिवशी प्रकाशित केले.
आज लोकसत्तेतील लताच्या मुलाखतीत म्हणल्याप्रमाणे उद्या उद्या (१० डिसेंबर, २००९) ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहीलेल्या "ने मजसी ने परत मातृभूमीला" या काव्यास शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. हे वाचकांपर्यंत पोचवल्याबद्दल लोकसत्तेचे आभार! याबाबत कधीच ऐकलेले नव्हते तसेच जालावर देखील माहीती मिळाली नाही. कुणास अधिक माहीती असल्यास अवश्य सांगा. तर्काने विचार केल्यावर इतके नक्की लक्षात आले की ही कविता १९०९ मधे लिहीली असावी.

शिरपूरचा पार

लेखक हर्षद आनंदी यांनी बुधवार, 09/12/2009 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
"च्यामारी ह्या म्हातार्‍याच्या, हातात घावुदे एकदा... नरडंच आवळतू साल्याचं", हणम्या स्टेशनमास्तरच्या केबीन मधुन बाहेर येता येता करवादला. त्याची धुसफूस ऐकुन तिथेच बसलेल्या दोघा-तिघांनी दात विचकले. नान्याच्या पाठीत धपाटा घालुन तो तिथेच एका दगडावर बसला, बाजुला तोंडातील तंबाकुची पींक टाकुन, तो परत चालु झाला. नान्याच्या पाठीच धीरडं झालेले बघुन बघ्यांची चांगलीच करमणुक झाली. हणम्या जाम तापला होता, तापणार नाय तर काय हो? एकतर जवान गडी, चार महिन्यांपलिकडेतर हळद लागली, आठ्वड्याला दोन रोज ह्याची मुंबई ड्युटी, म्हनजे हा आपला चार रोज तिकडंच की!

चिकन फहिटा

लेखक स्वाती२ यांनी बुधवार, 09/12/2009 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
इथे आल्यावर पहिल्यांदी चाखलेला मेक्सिकन पदार्थ म्हणजे चिकन फहिटा. स्पॅनिशमधे 'J' चा उच्चार 'ह' होतो हे महित नसल्याने ' हे फजिटा काय आहे' अस विचारुन स्वतःची फजिती करुन घेतलेली आजही आठवते. मात्र माझ्या फजितीला कारण झालेला हा फहिटा त्याच्या चटकदार चवीमुळे माझा लाडका आहे. खरा फहिटा हा बीफचा स्कर्ट स्टेक हा भाग येतो त्या पासून करतात. पण माझ्या सारख्या बीफ न खाणार्‍यांसाठी चिकन फहिटा हा प्रकार आहे. या चिकन फहिटा साठी लागणारे महत्वाचे साहित्य म्हणजे चिकन मुरवायला लागणारे मॅरिनेड.

अजीब दास्ता हैं ये..... शेवट

लेखक भानस यांनी बुधवार, 09/12/2009 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय झालेय समीरला? मनकवडा झाल्यासारखे का करतोय. ममा म्हणते अगदी तसेच करण्याचा मोह होतोय. सांगावे का मनातले. फार तर काय म्हणेल, " वेडी आहेस का दिशा तू. अग अनुजाशी लग्न ठरतेय माझे. किंवा लग्न आणि तुझ्याशी? ना गं, मी तर नेहमीच तुला जवळची मैत्रीण समजत आलोय. पण कदाचित म्हणाला तर... दिशा, तेवढ्यासाठीच तर परत आलोय मी. खरेच असे म्हणेल का समीर? " अग अग दिशा, काय करते आहेस? आत्ता त्या सायकलवाल्याला मारले असतेस तू. लक्ष कुठेय तुझे? " निमा ओरडत होती. मागून रेश्मा व दिल्यानेही हटकले. " अरे बापरे! दिशा सांभाळ गं बाई, उगाच कोणा बिचाऱ्यावर गाडी घालू नकोस बरं का. कसला एवढा गहन विचार करते आहेस?

आमची `शोध'(?)पत्रकारिता!

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 09/12/2009 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाचं बोलणं चोरून ऐकण्याची आणि ते दुसर्‍यापर्यंत विनाविलंब पोहोचवायची आमची सवय तशी फार जुनीच. म्हणजे इतकी जुनी, की, आम्ही बातमीदार होणार असं भविष्य आमच्या पिताश्रींनी खूप लहानपणीच- म्हणजे `आमच्या' लहानपणी- वर्तवलं होतं. आज आम्हाला हे सांगण्यास आनंद होतो, याचं कारण, पाळण्यातले पाय पाहून भविष्य वर्तवण्याचे शास्त्र अलीकडे लोप पावत असताना, असे शास्त्र खरोखरच अस्तित्वात होते, याचा ठोस पुरावा आमच्या रूपानेच आमच्या हाती आहे. बातमीदाराने (पक्षी- रिपोर्टराने) पुरावा हाती असल्याखेरीज बातमी `डिस्क्लोज' करू नये, असं पत्रकारितेच्या वर्गात शिकवलं जातं असं म्हणतात.

कधीतरी

लेखक नेहमी आनंदी यांनी बुधवार, 09/12/2009 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
कधीतरी बेधुंद होऊन बघायचयं कधीतरी बेहोश होऊन बघायचयं बेधुंद बेहोशीत जगणा~यांना अनुभवायचयं कधीतरी पंख पसरुन उडायचयं कधीतरी अंग आक्रसुन पोहायचयं स्वच्छंद राहुन गुलामी अनुभवायचीयं कधीतरी गर्दित हरवायचयं कधीतरी एकांतात स्वतःला शोधायचयं हरवताना स्वतःलाच सापडायचयं कधीतरी जगुन बघायचयं कधीतरी थराराला सामोरं जायचयं मरताना तुझ्या डोळ्यातले माझ्यावर असलेले प्रेम बघायचयं प्रसन्ना जीके.

फोटो रिस्टोरेशन

लेखक विनायक रानडे यांनी बुधवार, 09/12/2009 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
हा ओळख पत्रातला लॅमिनेट केलेला फोटो होता त्याला ए४ पाना एवढा रिस्टोर केला.