Skip to main content

आठवते का सारे सारे?

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 20/08/2009 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
आस्वाद घ्या!
आठवते का सारे सारे?
आठवते का सारे सारे? आठव ते सारे || ध्रु ||

मावळतीचा सुर्य लाल गुलाबी उगवतीचा चंद्र अन पहिली चांदणी ते शांत गंधीत वारे आठवते का सारे सारे? || १ ||

खडक मोठा ओहोटीतला तेथेच बसायचा असे हट्ट आपूला फेसाळत्या लाटांतले गोरे पान पाऊले आठवते का सारे सारे? || २ ||

हात हाती घेवूनीया घेतल्यात शपथा दुर न जायचे कधीही, होत्या आणाभाका साक्षीला मोजत होते तारें आठवते का सारे सारे? || ३ ||

विसरूनी सारी जगरहाटी धूंद क्षणांची ती मोहक गर्दी मोहरल्या अंगी गोड गोड शहारे आठवते का सारे सारे? || ४ ||

आठवते का सारे सारे? आठव ते सारे || ध्रु ||
- पाषाणभेद
लेखनविषय:

वाचने 1822
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

हात हाती घेवूनीया घेतल्यात शफता दुर न जायचे कधीही, होत्या आणाभाका साक्षीला मोजत होते तारें आठवते का सारे सारे? छान ओळी ! शफता :? शपथा !

विसरूनी सारी जगरहाटी धूंद क्षणांची ती मोहक गर्दी मोहरल्या अंगी गोड गोड शहारे आठवते का सारे सारे? || ४ || दफोराव मस्तच... मदनबाण..... चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :) http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

कशाला राव जखमांवरच्या खपल्या काढताय आता? ;-) सगळं आठवतय, विसरण्यासारखं असतं का ते? अवांतरः "फेसाळत्या लाटांतले गोरे पान पाऊले" इथे "फेसाळत्या लाटांतली गोरी पान पाऊले" असे हवेय का? सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"