Skip to main content

हवी.....

लेखक उदय सप्रे यांनी मंगळवार, 09/02/2010 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली आत्महत्येचे खूपच प्रकार आणि कारणे ऐकू येतात्.....मन अगदी विषण्ण होते हे वाचून , ऐकून्.....म्हणून काही सुचलय ते मांडतोय..... हवी..... मरणाचा तुज ध्यास उगा का? जगण्याची ही आस हवी इतरांची सामान्य ठरावी... अपुली "स्टाईल" खास हवी ! गुणवत्तेच्या यादीवरती नाव असो वा नसो तुझे, 'पडलो तरीही अडलो नाही!' धडपडी अशी ही प्यास हवी ! कुणी कुणाला आवडते तर कुणास कोणी ठोकरते , जुने कशाला याद करावे? दाद सदा....नव्यास हवी ! उजेड कोणा जास्त भावतो मिणमिणता कोणास हवा ! कवाड ज्याचे तो उघडू दे, जळण्याची सवय्.....दिव्यास हवी !

नको आणखी

लेखक जयवी यांनी मंगळवार, 09/02/2010 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
फुलणे नव्याने नको आणखी उमलून मिटणे नको आणखी घायाळ व्हावे पुन्हा मीच का इष्कात झुरणे नको आणखी गंधात न्हालो तुझ्या साजणी निशिगंध चाफे नको आणखी येणे तुझे क्षणभराचेच का पेटून विझणे नको आणखी नजरेत जरबी कट्‌यारी तुझ्या बंदी, पहारे नको आणखी धुंदी चढावी सुरांनी तुझ्या कुठले बहकणे नको आणखी जगतोच आहे तुझ्याही विना आधार फसवे नको आणखी जवळीक नाही अताशा कुठे जखडून घेणे नको आणखी जयश्री अंबासकर

अमर्यादीत पैसे मिळविण्याची संधी

लेखक सदानंद ठाकूर यांनी मंगळवार, 09/02/2010 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
अमर्यादीत पैसे मिळविण्याची संधी प्रत्येक माणसाची एक सुप्त इच्छा असते कि आपल्याला इतके पैसे मिळावेत कि कोणताही खर्च करताना हात आखडता घ्यावा लागू नये. कोणी हे उघड बोलतो तर कोणी बोलत नाही. प्रबळ इच्छाशक्ती व त्याला सातत्य, नियमीत प्रयत्न यांची जोड दिली असता हे स्वप्न कोणत्याही व्यक्तीला पुर्ण करता येऊ शकते.

(बोका)

लेखक शाहरुख यांनी मंगळवार, 09/02/2010 02:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा साय वरची आत दुधाचा साठा चोरटे आयुष्य देतो मालकास धोका बंद जरी असली घराची खिडक्या दारे एक तरी असतोच ना उघडा झरोका चोरणे हा वारसा की धर्म माझा? सोडेन कैसा मी एकतरी मोका सोबती जरी काळोखगर्भाचा उबारा सापडतो अचुक मज फडताळातील चक्का ध्यास असतो मग हळूच पळून जाण्याचा बसतो नाहीतर जळक्या लाकडाचा दणका हाणतोय जर रंगा चौक्यावर चौका तो कैसा कवी शाहरुख जो ना मारेल छक्का !! -कवी शाहरुख

कविते, हे तर तुझेच देणे..!

लेखक प्राजु यांनी सोमवार, 08/02/2010 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
रात्र काळी, चंद्र भाळी तरूण चांदणी नवी नव्हाळी नशा आगळी, सूर पाघळी सळसळणार्‍या रानोमाळी पिसे जीवाला, वेड मनाला झुळझुळ वारा, गंध ओला कोण काजवा, उगा हासला तीट लावतो अंधाराला नक्षत्रांच्या सहस्र माळा धरेच्या गळा, साज आगळा पहाट वेळा, धुक्याची कळा रंग केशरी, या आभाळा गारठलेली, धरा ल्यायली शुभ्र धुक्याच्या, गर्द शाली सूर्यकणांची मैफ़ल सजली क्षितिजावरच्या, भव्य महाली पहाट लेणे, रूप देखणे, किलबिल गाणे, नवे उखाणे शब्द रंगणे, मनी गुंफ़णे कविते, हे तर तुझेच देणे..! - प्राजु
काव्यरस

(धोका)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 08/02/2010 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांतीताईंच्या सुंदर गजलेत असं काही वाचलं की पुन्हा एकदा जुन्या दिवसांशी 'धोका' झाल्याची जाणीव प्रबळ होते आणि मग.... पृष्ठ वरचे, 'खास मेनू' अन सलोखा बायडी आभास नुसता, रोज धोका! बंद केली 'डायराने' सर्व दारे आयडी आला कसा, नसता झरोका? बारश्याला मीच 'मामा', कर्म माझे? सोडला हातातला प्रत्येक मोका! सोबती संपादकत्त्वाचा उबारा, आणि शिल्लक मेंबरांचा मंद ठोका बास आता सोंग हे वैचारिकांचे कंड 'चतुरंगास' सुटला हा अनोखा! -चतुरंग
काव्यरस

श्री लिपीतील मजकूर कसा पाहावा?

लेखक चिंतातुर जंतू यांनी सोमवार, 08/02/2010 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
श्री लिपी ही देवनागरी लिहिण्याची प्रणाली वापरून लिहिलेला काही मराठी मजकूर मजकडे आहे. परंतु मजपाशी श्री लिपीची प्रणाली नाही. एकही दमडी न खर्चता ही शिंची लिपी वाचण्यासाठी काही उपाय आहे का? अवश्य सांगावा. अग्रिम धन्यवाद. - चिंतातुर जंतू :S

उमेद

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 08/02/2010 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
बेगॉन/ डायझोन्/टीक२० सगळे एकदम वापरुन पाहिले कितीही झटकले तरी झुरळ काही मरत नाही जीव तुटता तुटता पुनर्जन्म होतो हात पाय हलत रहतात अधुनमधुन पंख फडफडतो जातो जातो वाटते पण जीव काही जात नाही कितीही झटकले तरी काही झुरळ मरत नाही तु काहीही कर पोसलेला नेता आहे मी इथल्या सगळया समाजाच्या नामर्दगानीवर कुरतडत राहीन अंधारात तुलाच. जगत राहीन तुझ्या उष्ट्यावर आणि माज करेन त्यावरच. तूच शेवटी हरणार आहेस मी असाच आहे शतकांपासुन तु ही असाच आहेस शतकांपासुन सोशीक आणि सहनशील निवडणूका वगैरे जन्तुनशाकाना आम्ही दाद देत नाही. हे सांगितल्यावाचुन ते रहात नाही या उपायांनी काही होत नाही, आमची जाड कातडी कशालाच दाद देत नाही ह
काव्यरस

शाहरुख खान आणि पाकिस्तान

लेखक पुरणपोळी यांनी सोमवार, 08/02/2010 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
आपले सर्वाचे (पक्षि: मिडिआ, करण जोहर, आणि भोळेभाबडे चाहते (पक्षि: मला काय त्याचे टाईप जनता)) लाडके, आदरणिय, प्रातः स्मरणिय, अभिनय सम्राट श्री. शाहरुख खान यांच्या मते पाकिस्तान हा उत्तम शेजारि आहे, आणि पाकिस्तानी खेळाडुंचे भारतात स्वागत आहे. शाहरुख वरिल वक्तव्याचे अभिव्यक्ति स्वातन्त्र्य म्हणून समर्थन करीत आहे. वरवर किंवा खोलखोल कसेहि पाहा माझ्या मते वरिल वाक्य हा समस्त देशाचा आणि मुख्यतः अतिरेकि हल्ल्यात बळि पडलेल्यांच्या कुटुंबियांचा अपमान आहे. शाहरुख हा छुपा/खुला पाक समर्‍थक आहे असे वाटल्यास चुक काय?