नको आणखी
लेखनविषय:
फुलणे नव्याने नको आणखी
उमलून मिटणे नको आणखी
घायाळ व्हावे पुन्हा मीच का
इष्कात झुरणे नको आणखी
गंधात न्हालो तुझ्या साजणी
निशिगंध चाफे नको आणखी
येणे तुझे क्षणभराचेच का
पेटून विझणे नको आणखी
नजरेत जरबी कट्यारी तुझ्या
बंदी, पहारे नको आणखी
धुंदी चढावी सुरांनी तुझ्या
कुठले बहकणे नको आणखी
जगतोच आहे तुझ्याही विना
आधार फसवे नको आणखी
जवळीक नाही अताशा कुठे
जखडून घेणे नको आणखी
जयश्री अंबासकर
वाचने
2242
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
धुंदी चढावी सुरांनी तुझ्या कुठले बहकणे नको आणखीवा जयू, सुंदर काव्य! तात्या.
जयश्री ताई वेलकम बॅक...
बर्याच दिवसांनी तुमची कविता वाचायला मिळाली.
छान आहे कविता.
घायाळ व्हावे पुन्हा मीच का
इष्कात झुरणे नको आणखी
गंधात न्हालो तुझ्या साजणी
निशिगंध चाफे नको आणखी
येणे तुझे क्षणभराचेच का
पेटून विझणे नको आणखी
एक नंबर....
गंधात न्हालो तुझ्या साजणी
निशिगंध चाफे नको आणखी
वा! :)
क्रान्ति
अग्निसखा
क्या बात है
येणे तुझे क्षणभराचेच का
पेटून विझणे नको आणखी
आई ग!!!!!!!!!
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
>> गंधात न्हालो तुझ्या साजणी
निशिगंध चाफे नको आणखी
>> येणे तुझे क्षणभराचेच का
पेटून विझणे नको आणखी
कायच्याकायच आवडले :)
गझल आवडली. त्यातही
येणे तुझे क्षणभराचेच का पेटून विझणे नको आणखीहे बेष्टच ऋषिकेश ------------------ इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
तात्या, धनंजय, क्रान्ति, शुचि, संदीप, ऋषिकेश......धन्यवाद !!
इतक्या सुरेख प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटलं :)
:)
जयु,
>>जगतोच आहे तुझ्याही विना
आधार फसवे नको आणखी
जवळीक नाही अताशा कुठे
जखडून घेणे नको आणखी
>>>>
सुरेख गं ! खुsssssssssssssssssssssssपच आवडली. जीयो. जीयो.
वर्षा
जयु,
>>जगतोच आहे तुझ्याही विना
आधार फसवे नको आणखी
जवळीक नाही अताशा कुठे
जखडून घेणे नको आणखी
>>>>
सुरेख गं ! खुsssssssssssssssssssssssपच आवडली. जीयो. जीयो.
वर्षा
घायाळ व्हावे पुन्हा मीच का
इष्कात झुरणे नको आणखी
सॉलिट्ट्ट्ट... :)
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
धुंदी