आताच 'उपक्रम' वरील श्री शरद कोर्डे यांचे सृजनशीलतेवरील लिखाण वाचले. तेथे त्यांनी सृजनशीलता जोपासण्या साठी वेगवेगळी तंत्रे सांगीतली आहेत. यात एका तंत्राचा उल्लेख सापडला नाही ज्याचा मी विषेश अभ्यास केला आहे. हे तंत्र म्हणजे नादोपचाराचे तंत्र. यात आपला मेंदू हव्या त्या अवस्थेत नेता येतो. मेंदूच्या या अवस्थांची गॅमा ४० Hz, बीटा (२०-१३Hz), अल्फा (१३-१०), थीटा (१०-४) व डेल्टा (४ - ०) अशी विज्ञानाने सर्वसाधारण वर्गवारी केली आहे. या अवस्थांमध्ये मेंदू वेगवेगळी कार्ये करतो.
सुप्त मनावर असलेली जागृत मनाची पकड ढिली पडली की नवनिर्मिती घडू लागते. माणसाचा मेंदू अल्फा-थीटा अवस्थांमध्ये आंदोलित होतो तेव्हा सुप्त मनात दडलेल्या असंख्य गोष्टी बाहेर येउ लागतात. ज्यांना हा अनुभव घ्यायचा आहे त्यानी https://www.freewebs.com/yuyutsu/musictherapy.htm या लिंक वर जाउन् काही 'फुकट' असलेले ट्रॅक्स ऐकून पहावेत. माझे Inner Voice 1 आणि Alpha Magic हे ट्रॅक्स जगभरातील लोकाना खुप आवडले आहेत. सुप्त मनातील खजिन्याचा शोध घेण्यास ते नक्की उपयोगी पडतील.
हे ट्रॅक्स ऐकताना दिलेल्या सूचना काटेकोर पणे पाळाव्यात...
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुप्त
सुप्त जागृत पकड ढीली नवनिर्मिती...
वा मस्त च हो एकदम
आताच
आताच 'उपक्रम' वरील श्री शरद कोर्डे यांचे सृजनशीलतेवरील लिखाण वाचले
हे उपक्रम काय आहे ?? आम्ही फक्त मिपा वर असतो. बाकी कुठला संदर्भ देऊन क्रुपया मिपावर लेखन करु नये. हे म्हणजे लेखक सर्व मिपा वाचकांना उपक्रम हे माहीतच आहे असे समजुन लेख लिहीत आहे काय???
---(कट्टर मिपाकर)नि३.
बाकी कुठला
In reply to आताच by नि३
हा तुमचा आक्षेप म्हणजे लेखनशिस्तीच्या सर्वमान्य संकेतावरच घाव आहे
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
ऐकले आणि आवडले सुद्धा...
इथे जरुर भेट देउन पहा. हे ट्रॅक फुकटात डाउन लोड करुन सेव्ह ही करता येतात. येथील खुप सारे ट्रॅक मी मोबाईल च्या मेमरी कार्डात टाकले आहेत. सकाळ संध्याकाळ लोकल मधे छान वेळ जातो व फ्रेश वाटतं. ब-याच वेळा रात्री झोपताना ऐकतो.(अनुभव शब्दबध्द करनं कठीण आहे. त्या साठी अनुभव घ्याच खुप खुप शुभेच्छा)

****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
जयपाल काका
In reply to ऐकले आणि आवडले सुद्धा... by jaypal
जयपाल काका या लिंक बद्धल धन्यवाद...
Free relaxation mp3 >>> Chimes, free relaxation mp3
हा ट्रॅक मस्तच आहे.
जमल्यास हे सुद्धा ऐका :---
https://www.youtube.com/watch?v=Lps1hzr0x80
मदनबाण.....
"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo
जयपाल जी
In reply to ऐकले आणि आवडले सुद्धा... by jaypal
जयपाल जी तुम्ही दिलेला दुवा आवडला.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
मन:शक्ति
मन:शक्ति केंद्रातही असे काही प्रयोग चालतात.
पण या सर्व प्रयोगांची प्रॅक्टीकल फलिते काय आहेत.
प्रॅक्टीकल फलिते
In reply to मन:शक्ति by विजुभाऊ
माणसाचे प्रश्न तणाव शून्य अवस्थेत चांगल्या रितीने सोडवता येतात. तणाव नाहिसा झाला की जगण्याची उमेद वाढते.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
माणसाचे
In reply to प्रॅक्टीकल फलिते by युयुत्सु
माणसाचे प्रश्न तणाव शून्य अवस्थेत चांगल्या रितीने सोडवता येतात. तणाव नाहिसा झाला की जगण्याची उमेद वाढते.
सहमत...
युयुत्सुराव तुम्ही बनवलेले ट्रॅक ऐकले.या धाग्यामुळे इतर ट्रॅक्स सुद्धा शोधले... :)
मदनबाण.....
"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo
आपल्याला
In reply to माणसाचे by मदनबाण
आपल्याला जर माझी निर्मिती आवडली असेल तर इतरांशी अवश्य शेअर करा. माझ्या कामाचा लोकांना जर उपयोग झाला तर त्या सारखा दूसरा आनंद नाही.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
आपल्याला
In reply to आपल्याला by युयुत्सु
आपल्याला जर माझी निर्मिती आवडली असेल तर इतरांशी अवश्य शेअर करा.
नक्कीच !!! :)
यु टयुबवर frequency 528 ( DNA repair freq ) दिली आहे.ती किती फायदेशीर आहे ? या विषया बद्धल आपण अजुन काही माहिती देऊ शकाल काय ?
मदनबाण.....
"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo
DNA repair freq हा
DNA repair freq
हा दावा माझ्या माहिती प्रमाणे अवाजवी आहे. याची कारणे अनेक आहेत. या दाव्याच्या पुष्टीसाठी वैज्ञानिक संशोधनाचे संदर्भ दिले आहेत का?
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
या
In reply to DNA repair freq हा by युयुत्सु
या दाव्याच्या पुष्टीसाठी वैज्ञानिक संशोधनाचे संदर्भ दिले आहेत का? मलाही या बद्धल माहिती नाही.पण काही दुवे शोधले...
https://www.under-one-roof.net/12-strand-DNA/12-strand-DNA-Solfeggio.ht…
https://www.redicecreations.com/specialreports/2006/01jan/solfeggio.html
https://www.technologyreview.com/blog/arxiv/24331/
https://timberwolfhq.com/solfeggio-frequencies-dna/
अजुन माहिती मिळाल्यास आवडेल.
मदनबाण.....
"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo
हा तुमचा
हा तुमचा आक्षेप म्हणजे लेखनशिस्तीच्या सर्वमान्य संकेतावरच घाव आहे
हे काय आता नविन ???
पहील वाक्य सोडुन जर लेख जसाचा तसा लिहला असता तर काहि बिघडले असते काय???
ते कोणत तंत्र समजल नाहि तुम्हाला म्हणता ते तेथे त्यांना विचाराना भाउ ईथे का गरळ ओ़कता???
---नि३.
DNA repair freq हा
DNA repair freq
हा दावा माझ्या माहिती प्रमाणे अवाजवी आहे. याची कारणे अनेक आहेत. या दाव्याच्या पुष्टीसाठी वैज्ञानिक संशोधनाचे संदर्भ दिले आहेत का?
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
खूपच छान !
खूपच छान ! लिंक्स वरुन ट्रॅक्स डाऊनलोड करुन ऐकतो आहे.
ग्रेट !!!
----------------------------------------------
कळस
ग्रेट
In reply to खूपच छान ! by कळस
प्रतिक्रियेबद्दल आभार!