पार्टी रे पार्टी
माणूस अगदी विवाहित, कुटुंबवत्सल वगैरे असला म्हणून काय झाले, कधीतरी तो कनवाळू, दयाळू वगैरे जगन्नियंता त्यावर प्रसन्न होतो. कधीतरी अती होते आणि 'साल्यो, काही लाजाबिजा आहेत की नाही? किती दिवस झाले एकत्र बसून. तुमच्या साल्यांच्या रविवार -गुरुवारच्या सुट्ट्या, पोरांच्या परीक्षा आणि बायकांच्या कटकटीतून सवड अशी कधी मिळणार? असं ठरवून काही बसायला मिळणार नाही. बसायचं का आजचं? कुणाचं घर रिकामं आहे? तुझं? मग ठरलं तर! दोन तीन पेग हाणू, हा ठोंब्या चिकन करेल. व्हिस्कीचं माझ्याकडं लागलं. सोडापण आणतो मी. शिग्रेटी आपापल्या. साडेसातला बसायचं, अकरा वाजता आपापल्या घरी. पुढे ज्याच्या त्याच्या वकूबानुसार.
मिसळपाव