Skip to main content

मोनालिसा

लेखक मॅन्ड्रेक यांनी रविवार, 18/04/2010 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, माझ्या छंदातुन केलेला एक प्रयत्न. मॉडेल - माझी कन्या -किन्नरि

वैकुंठ

लेखक बाबुराव यांनी रविवार, 18/04/2010 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय तुकाराम, काल तु सपनात आला अन् म्हणला, चल वैकुंठाला. मी हापकुनच गेलो हातापायाला दरदरुन घाम फुटला. च्यामारी तुक्या, तुला काय सवसारात इंट्रेस नव्हता. तु बरा आन तुव्हा इट्टल बरा. माहं तसं नव्ह रं दादा, पोरासोरायचं शिक्षान, म्हातारा-म्हतरी, त्यायच्या हौशी-मौजी, अजुन लय गोष्टी राह्यला आन तु म्हणतो चल वैकुंठाला. आपल्याच्यानं काय होनार नाय. तुव्ह मी काय ऐकणार नाय. टाळ चिपळ्याच्या आवाजात आरामात झोपलो. पर, माह्याच तसबीरीजोळ माहं गणगोत काहून रडून राह्यलं हे मातर कळत नव्हतं ?

चित्रपटातील आपल्या मनात राहिलेला एक प्रसंग.....!

लेखक इन्द्र्राज पवार यांनी रविवार, 18/04/2010 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या सुट्टीचा आनंद घेणे चालू असल्याने संस्थळावर चित्रपटविषयक धागे भरपूर प्रमाणात दिसत आहेत; त्यात ही एक छोटीशी भर. चित्रपट पाहून झाल्यानंतर बरेच दिवस त्याचे कथानक, कलाकारांचा अभिनय, चित्रीकरण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यातील मधुर गाणी आपल्या मनात रुंजी घालत असतात व ज्यावेळी एकमेकाबरोबर संवाद साधत असताना या बाबीशिवाय अचानक असेही आपण म्हणतो कि, "अर्रे त्याप्रसंगत अमिताभ किती हळवा दाखविला आहे रे, इतके दिवस झाले तरी सिलसिला मधील तो प्रसंग मी विसरू शकत नाही." इ. इ.

बावळ्ट्पना

लेखक शिल्पा ब यांनी रविवार, 18/04/2010 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
मी वाशिला एक प्रदर्शन बघायला गेले होते...

.....घडावे असे काही.....

लेखक कानडाऊ योगेशु यांनी रविवार, 18/04/2010 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
.....घडावे असे काही..... ------------------------------ घडावे असे काही सुंदर आणि गोड.. वक्षावरी सुटावे माझ्या वेणींचे पेड.. लागावी चाहुल त्याला.. किणकिणत्या कंकणाने.... हलकेच जाग यावी..
काव्यरस

मे. हायकोर्टाचे अभिनंदन

लेखक युयुत्सु यांनी रविवार, 18/04/2010 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
४९८ अ च्या खोट्या तक्रारी म्हणजे मानसिक छ्ळ http://www.esakal.com/eSakal/20100418/4861360524180312202.htm सकाळ ने ही बातमी दडपली नाही म्हणून सकाळ्चे पण अभिनंदन.

एक गिअर मेला

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 18/04/2010 07:30 या दिवशी प्रकाशित केले.
एक गिअर मेला एक गिअर मेला. तुम्ही म्हणाल काहीतरीच काय? गिअर कधी मरतो का? गिअर तर तुटतो, कंडम होतो. मी म्हणतो तो गिअर मेलाच. असाच एक गिअर होता. परिस्थितीच्या वंगणाने गांजलेला, ओझ्याने पिचत चाललेला. दररोज कितीक फिर फिर फिरणार? कितीक काम करणार? तरीही हा गिअर फिरतच होता. एखाद्या घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे. बैलाच्या मानेवर जसे जू असते तशी त्याच्या मानेवर होती एक क्वार्टर पीन. आपेक्षांची, मागण्यांची, गरजा पुर्ण करवून घेणार्‍यांची. तसा तो काही फार मोठा अन मुख्य गिअर नव्हता त्या गिअर बॉक्स मध्ये. अन त्या गिअरबॉक्सच्या आजूबाजूला असंख्य इतर गिअर बॉक्स होतेच.
काव्यरस

मित्रा ...

लेखक स्वप्निल मन यांनी शनिवार, 17/04/2010 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी मित्रा तू माझ्याकडून दुखावला जात असतोस, पण कसे समजावू तुला, असं करताना मला किती त्रास होत असतो तुझ्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे, मित्रा तू तर माझा जीव की प्राण आहेस तुझ्यासाठी त्याग करायला मला काहीच वाटत नाही, कारण तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे तुझ्याशिवाय जगणं ही कल्पनाच असह्य आहे, तू म्हणशील तर आयुष्यावर पाणी सोडायला तयार आहे आप्ल्या मैत्री आड कधीच काही नाही येणार, पण, प्रत्येक संकटाच्या वेळी तू विरू आणि मीच जय होणार

(दक्षिणेकडची खव्वयेगिरी–२) अप्पम् व व्हेजिटेबल स्ट्यु

लेखक विंजिनेर यांनी शनिवार, 17/04/2010 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिणेकडची खव्वयेगिरी – १ केरळ ट्रीपवर गेलात तर सकाळी ६-७ च्या सुमारास केरळातल्या कुठल्यातरी स्टेशनात गाडी शिरते आणि प्लॅटफॉर्मवर “अप्पम-मुट्टै ऽऽ” अशा आरोळ्या ऐकू येतात. आपण धडपडून उठतो आणि खिडकीतून हात बाहेर काढून ते पुडकं हातात घेतो. पुडक्यातले केळीच्या हिरव्यागार पानात गुंडाळलेले वाफाळते जाळीदार अप्पम आणि सोबत खमंग गरमा-गरम मुट्टै हा एक न्याहारीचा स्वर्गीय प्रकार आहे असं माझं स्पष्ट मत आहे. तसंही केरळला “गॉडस् ओन कंट्री” असंच म्हणतात म्हणा ( आता तिकडच्या लोकांना “डेव्हिलस् ओन पिपल” म्हणतात ते जाउद्या ).