Skip to main content

उषा..

उषा..

Published on 01/01/2010 - 09:38 प्रकाशित मुखपृष्ठ
हळद माखूनी अंगावरती लोभसवाणी सोन शलाका पाण्यावरती उतरूनी अलगद तरंग उठवी हलका हलका घेता भरूनी ओंजळ अवघी साज रूपेरी पाण्यामधला डोकावूनी तो पहात राही चांद सावळ्या नभामधला सांज विसावे आकाशाच्या कुशीमध्ये लाजून थोडी रक्तिमगाली खळी पडूनी अवीट होई रात्र वेडी टिपूर तारे साक्षीला अन चंद्रकोरही गोजिरवाणी रात-दिनाच्या संयोगातून जन्मा येते उषा देखणी - प्राजु (सर्व मिपाकरांना नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!)
लेखनविषय:

याद्या 3606
प्रतिक्रिया 14
हळद माखूनी अंगावरती लोभसवाणी सोन शलाका पाण्यावरती उतरूनी अलगद तरंग उठवी हलका हलका रक्तिमगाली खळी पडूनी अवीट होई रात्र वेडी रात-दिनाच्या संयोगातून जन्मा येते उषा देखणी या सा-याच अतिशय भावसुंदर, चित्र-प्रत्यय देणा-या, आणि अतिशय तरल कल्पना आणि शब्द रचना देखील तितकीच कोमल. कविता फारच आवड्ली... निसर्ग कवितेचा / भाव कवितेचा फारच देखणा संयोग आहे..

अतिशय सूंदर कविता...! शब्दाशब्दातून भाव प्रकटन...! आवडली.

नव्या वर्षाची ताजीतवानी टवटवीत कविता.. सुंदर !!!

मस्त आहे. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

एकदम मस्त कविता प्राजुताई ! नवीन वर्षाच्या हर्दीक शुभच्छा ! उदय सप्रे....त्यो "येम्" हाय न्हवं का मांज्या नावातला , त्यो सायलेण्ट हाय बगा !

सांज विसावे आकाशाच्या कुशीमध्ये लाजून थोडी रक्तिमगाली खळी पडूनी अवीट होई रात्र वेडी 'सांज विसावे आकाशाच्या कुशीत' हे तर खासच...! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे

टिपूर तारे साक्षीला अन चंद्रकोरही गोजिरवाणी रात-दिनाच्या संयोगातून जन्मा येते उषा देखणी सुंदर... :) मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato

होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं ब्लॉगर्सच्या प्रवाहावर दृष्टीक्षेप टाकत सकाळमध्ये लिहिलेल्या लेखात ह्या कवितेचा संदर्भ वाचून आनंद वाटला :)

हळद माखूनी अंगावरती लोभसवाणी सोन शलाका पाण्यावरती उतरूनी अलगद तरंग उठवी हलका हलका खुप सुदंर..तरल रचना

धन्यवाद. देवदत्त जी, मनापासून आभारी आहे. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

इ सकाळ ने या कवितेचा उल्लेख करावा ही आनंदाची बाब आहे . मीनल. http://myurmee.blogspot.com/