Skip to main content

सुधारक

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 21/05/2010 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
हल्लीचे पुरोगामी व पुर्विचे सुधारक यांच्या भुमिका एकच आहेत कि त्यात फरक आहे..कुणी जाणकार समजावुन सांगु शकेल का?

विश्वास

लेखक बाबुराव यांनी शुक्रवार, 21/05/2010 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
गोड शब्द, गोड वचनं आणि निरागस चेह-यावर कधीच विश्वास टाकू नकोस असं तु म्हणायचीस. मुखवट्यांच्या चेह-यात तुझाच एक चेहरा खरा वाटायचा, पण कालांतरानं कळलं तोही फसवाच. आता तुझे स्पर्श बोलतात आणि पाणवतात डोळे. तेव्हा मात्र धैर्य होत नाही तुझ्यावर,तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवायला.
काव्यरस

शिवाजी महाराजांवर ई-बुक

लेखक अस्मी यांनी शुक्रवार, 21/05/2010 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
सारंग माडगुळकर यांनी शिवाजी महाराजांवर King Shivaji -the spiritual quest म्हणून एक ई-बुक मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांत लिहिले आहे... शिवइतिहासामध्ये 'मिर्झाराजांची मोहीम' व 'आग्रा भेंट' ही दोन प्रकरणे चुकीची लिहिली गेली आहेत, असं त्यांच मत आहे. भाग १ मिर्झाराजे जयसिंह प्रकरणाचे सत्य स्वरूप ! ...

(चित्र)

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 21/05/2010 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
मिलिंद फणसे यांची अप्रतिम गझल चित्र वाचली आणि काही दिवसापुर्वी इथे आलेल्या वादळाच्या आठवणी जाग्या झाल्या. उघडी पडली अर्थव्यवस्था, नवे प्रशासक झाले नि धाग्यातून झाली गणती, किती कफल्लक झाले! कशी, कधी या स्थळाची मंडई बनवली सांगा? असे, कसे हे सुजाण सगळे मुर्ख गिर्‍हाइक झाले? पाहा, पाहा पोतडीतले किती आयडी आले आणिबाणी उठली आणीक, किती विधायक झाले फरार झाला आहे मालक अशी वदंता होती अन पुर्वीचेपूजक त्याचे, सगळे मारक झाले नव्या पहाटेच्या गप्पाही शिळ्या कधीच्या झाल्या जुनेच सारे कंपू जमले, किती सुधारक झाले तुझ्या विडंबन चित्रा कैसे छान म्हणावे "केश्

एक चांगली बातमी ~~ नव्हे आदर्शवत बातमी म्हणू या !!

लेखक इन्द्र्राज पवार यांनी शुक्रवार, 21/05/2010 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
आपण आपल्या या संस्थळावर विविध विषयावर वेगवेगळ्या बाजूनी विचार मांडीत असतो, त्यांची देवाणघेवाण करीत असतो. अशाच प्रसंगी समाजात कित्येक चालिरीतीबाबतही मत व्यक्त करतो. "लग्न" हा असाच एक महत्वाचा आणि प्रत्येक कुटुंबाचा जिव्हाळ्याचा विषय. वर्षानुवर्षे "विवाह समारंभ" म्हटले, की भोजनावळ, जोरदार स्वागत समारंभ, वाद्यांचा दणदणाट असे समीकरण झाले आहे; आहेर देणे, घेणे, रुसवे फुगवे काढणे, फोटो, व्हिडिओ, आदीची रेलचेल. यात बदल तरी काय असणार? आपणदेखील वैयक्तिक पातळीवर यातील काही प्रथांना दूर केले तरी बहुतांशी लग्नात हेच दृश्य दिसत असते. अशावेळी काहीतरी "आगळे वेगळे" घडले तर मनाला फार हर्ष होतो.

~*~*~*~ राजीव'जींना भावपूर्ण श्रद्धांजली ~*~*~*~

लेखक मृगनयनी यांनी शुक्रवार, 21/05/2010 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
राजीव गांधी!... आपल्या सर्वांचं एक आदरणीय आणि लाडकं व्यक्तिमत्व! भारताचे यशस्वी -माजी पंतप्रधान! २१ मे १९९१, रोजी रात्री, कोणाच्याही ध्यानीमनी नसताना तामिळनाडू येथे घडवून आणलेल्या मानवी बॉम्ब-हल्ल्यात झालेला राजीव'जींचा मृत्यू केवळ भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण विश्ववासीयांना मोठा मानसिक आघात देऊन गेला!..... राजीवजींच्या स्मृतीला विनम्र अभिवादन! ..... *~*~*~* STILL WE MISS YOU.... RAJEEV'JI...... LOVE YOU.......

गुरूवरचा पट्टा गायब

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शुक्रवार, 21/05/2010 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
नासाच्या कालच्या बातमीप्रमाणे गुरूवरचा एक पट्टा गायब आहे. ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर अँथनी वेस्ले यांनी काढलेला फोटो (नासाच्या संकेतस्थळावरून) गुरू हा ग्रह वायूंचा गोळा आहे. अर्थात गुरूचं परिवलन पृथ्वीप्रमाणे, घनपदार्थाप्रमाणे होत नाही; याला डिफरन्शियल रोटेशन (मराठी शब्द?) असं म्हणतात. म्हणजे वेगवेगळ्या अक्षांशांना स्वत:भोवती फिरण्याचा कोनीय वेग वेगवेगळा असतो.

बाजार मांडियेला....!

लेखक विनायक पाचलग यांनी शुक्रवार, 21/05/2010 08:13 या दिवशी प्रकाशित केले.
''माझा मुलगा ना, आय.आय.टी. करतोय. " कुठे ना कुठे, कधी ना कधी तरी हे वाक्य तुम्ही ऐकले असेलच. कारण बारावी विज्ञान शाखेतील मुलांपैकी निम्मी मुले आज ''आयआयटी करत आहेत.'' ''आयआयटी'' त प्रवेश मिळविण्यासाठी अभ्यास करणे याचा शॉर्ट फॉर्म म्हणजे आय अय टी करणे . आयआयटी ,भारतातली सर्वोत्तम अभियांत्रिकी शिक्षण संस्था, या संस्थेतून बाहेर पडणारा विद्यार्थी हा सर्वोत्कृष्टच असतो, असायचा... त्यामुळे तिथे जाण्यासाठी प्रयत्न तर सगळे करायचे. पण, त्याचा इतका बाऊ होत नव्हता. पण, साधारणतः २१ व्या शतकाच्या सुरवातीपासून सारेच बदलत गेले.

कामू कोण ?

लेखक शिल्पा ब यांनी शुक्रवार, 21/05/2010 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
मी खूप वेळा कामू किंवा कॅमूबद्दल मानसशास्त्र या विषयतील लेखकाविषयी (?) ऐकले आहे ... कोणाला कामू कोण हे माहिती आहे का ? त्याची पुस्तके कुठे मिळतील? एखादा दुवा उपलब्ध आहे का? मी गुगल करायचा आणि विकीपेडियामध्ये शोधायचा प्रयत्न केला पण काही माहिती मिळाली नाही...कदाचित स्पेलिंग चुकले असेल...मी kamu असे शोधले...कृपया खात्रीशीर माहिती असेल तर येथे लिहावे. धन्यवाद.

काही छंद

लेखक सुचेल तसं यांनी शुक्रवार, 21/05/2010 06:52 या दिवशी प्रकाशित केले.
बायो-डेटामधे हॉबीज म्हणून एक सेक्शन असतो. मला वाटतं ९०% लोकांच्या हॉबीज अगदी सारख्या निघतील. वाचन, संगीत, क्रिकेट (पहाणं ), पोहोणं, इत्यादि. आपले असे पण काही छंद असू शकतात की जे आपण तिथे लिहू शकत नाही. ते छंद पाहून मुलाखत तिसरीकडेच भरकटेल म्हणून कदाचित लोकं (ज्यात मी पण आलो) उल्लेख करत नसतील. मला लहानपणी काडेपेट्यांचे कव्हर (टिक्के) जमवायचा छंद होता. त्या नादापायी मी आणि माझा चुलतभाऊ नाही नाही तिथे भटकलो. शाळा सुटली रे सुटली की ३-३, ४-४ किलोमीटर आम्ही वणवण हिंडायचो आणि नजर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना. आता लक्षात येतंय की समोरच्याला ते एकदम येडछापसारखं दिसत असणार.