Skip to main content

गड्याऐवजी माझ्या श्रीमुखात!

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी रविवार, 30/05/2010 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
(सदर लेख माझ्या मातोश्रींनी लिहिला असून २४ मे २०१०च्या सकाळ मुक्तपीठात प्रकाशित झाला आहे. मिपाच्या नियमांत बसत नसल्यास काढून टाकायला हरकत नाही.) सुमारे पन्नास वर्षांपूर्वी घडलेली हकिगत मी सांगत आहे. त्यावेळी मी दहा वर्षांची असेन. अगदी बारीकशी, कुणाच्या अध्यात ना मध्यात. आई- वडील, आजोबा, दोन काका-काकू, चुलत भावंडे असे भरलेले घर. मोठ्या भावडांमध्ये खूप दंगामस्ती, भांडणे चालयची. कधी कधी त्यांना आजोबांच्या छड्या खाव्या लागत. माझ्या जन्मानंतर वडिलांचा व्यवसाय अधिक भरभराटीला लागला त्यामुळे मी त्यांची फार लाडकी मुलगी होते आणि असे सर्व असताना मला माझ्या वडिलांनी अगदी अचानक एक सणसणीत थोबाडीत दिली.

२६ जून चे चंद्र्ग्रहण - भाग 1

लेखक युयुत्सु यांनी रविवार, 30/05/2010 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
दोन ग्रह एकमेकांशी निरीक्षकसापेक्ष नव्वद अंशाचा कोन जर करत असतील तर त्या रचनेला ज्योतिषात केन्द्रयोग अशी संज्ञा आहे. केंद्रयोग हे सहसा त्रासदायक असतात कारण त्यात ग्रहांची तत्त्वे नकारात्मक किंवा एकमेकांना विरुद्ध होइल असे काम करताना दिसतात. दोनाच्या जागी जर चार ग्रह एकत्र येऊन जर एकमेकांशी केंद्र योग करत असतील तर नकारात्मक आविष्कार अधिकच वाढतो. यामुळे ज्या रचना आकाशात तयार होतात. त्यापैकी एक म्हणजे ग्रॅण्ड स्क्वेअर किंवा मराठीत बृहच्चौकोन. जन्मपत्रिकेत बृहच्चौकोन ही रचना असेल तर कमालीच्या जीवनसंघर्षला अशा व्यक्तीनी तोंड दिलेले असते. याच्या उलट बृहत्त्रिकोण ही रचना असते.

बजरंगाचा भक्त पैलवान

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 30/05/2010 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
बजरंगाचा भक्त पैलवान
हि कविता आपला सगळ्यांचा लाडका टारझन यास अर्पण
मी आहे बजरंगाचा भक्त, त्याचा डोक्यावर वरदहस्त मेहनत करतो कसूनी, मैदानी कुस्ती करतो फक्त ||धृ|| शाळेत होतो द्वाड, घरी करायचे नाही लाड चिंचा बोरे आवळे पाडूनी खायी नाही कसली त्याला तोड लहाणपणी म्हणती सगळे तू अभ्यासात सुस्त आता मेहनत करतो कसूनी मैदानी कुस्ती करतो फक्त ||१|| दंड बैठका तालीम करतो, जोर मारूनी घाम गाळतो शड्डू जोरात ठोकतो, गडी समोरचा घाबर
काव्यरस

माझी सज्ञानता...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 30/05/2010 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
मी अठरा वर्षे पूर्ण केली तरी साधे मिसरुडही फुटले नव्हते. त्यामुळे रूढ अर्थाने मी अज्ञानीच वाटायचो. त्या वयातही कुठले कुठले अन् किती किती अगाध ज्ञान मला प्राप्त झाले होते, ते कुणा सज्ञानाच्या गावीही नसावे, इतके सखोल व मुद्देसुद होते.(अशी त्यावेळची सद्भावना होती.) गावच्या स्टँडवर एकुलता एक बुक स्टॉल होता. वर्तमानपत्रांपासून ते निळ्या-पिवळ्या पुस्तकांपर्यँतचे सर्व वाङ्मय तिथे उपलब्ध असायचे. सुट्टीच्या कालावधीत मी स्टॉलमध्ये बसायचो. मालक आमच्याच गल्लीतील असल्याने ओळखीचा होता. मी आलो की तो जेवायला घरी जायचा.

आफ्रिकन सफारी

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 29/05/2010 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
लेख एकटाकी लिहिला आहे. टंकनदोष असल्यास क्षमस्व. खरडीतून कळवल्यास दुरुस्त केले जातील आफ्रिका म्हटलं की डोळ्यापुढे उभे रहातात ती घनदाट जंगले, प्राणीसृष्टी, काळ्या रंगाचे रहिवासी, साऊथ आफ्रिकेची टिम, इजिप्तचे पिरॅमिड आणि सोमालियासारखे दारिद्र्य... मात्र आफ्रिका इथेच संपते का? तर छे! ती तर इथे सूरु होते. कधीतरी ह्या खंडात भटकायची इच्छा जुनी आहे. मात्र दुधाची तहान ताकावर ह्या न्यायाने आफ्रिका खंडातील विषयांवरचे चित्रपट बघायचे ठरवले. ६ चित्रपट डाऊनलोड केले त्यात एक डॉक्युमेंटरी आणि ५ चित्रपट होते. त्यातल्या चार चित्रपटांची ओळख करण्यासाठी हा लेख.

मांडूळ म्हणजे काय?

लेखक हुप्प्या यांनी शनिवार, 29/05/2010 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
http://72.78.249.125/esakal/20100529/4654348987110421059.htm वरील बातमी पहा. यातील मान्डूळ म्हणजे काय? कुठला प्राणी? काळ्या जादूसाठी मांडूळाची तस्करी होते असे लिहिले आहे. आधी मी गांडूळ वाचले!

दिले नादान तुझे हुआ क्या है.......

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 29/05/2010 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
दिले नादान तुझे हुआ क्या है.... ही ग़ालीबची गज़ल माहीत नसणारा माणूस भारतात मिळणे कठीण. याचा अर्थ खरच समजवून घ्यायचा असेल तर आपल्याला सुफी संप्रदायाबद्दल थोडीशी माहीती करुन घ्यायला लागेल. आपण ही माहीती या सारख्या गज़लेच्या आणि गालीब सारख्या कवींच्या बाबतीतच फक्त करुन घेऊ. सुफी संप्रदायावर मी लवकरच www.jayantpune.wordpress.com वर लिहीणार आहे त्यात आपल्याला अधिक माहीती मिळेळ. सुफी संप्रदायाच्या मते आपल्या अध्यात्माच्या प्रवासात आपल्याला सात टप्पे ओलांडावे लागतात. या प्रवासाला ते “मार्ग” म्हणतात आणि जो हे करायचा प्रयत्न करतो त्याला सालिक म्हणतात.

तुझ्या रूपातले राग

लेखक शैलेन्द्र यांनी शनिवार, 29/05/2010 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांती यांची क्षमा मागुन... काही दारात बारात, थोडे वेळात चुकले, माझ्या मनात होते, का तु झोपुन घेतले?.. रात्री जागवल्या साधु, राज-हरणाला पीत आर्त विनवण्या केल्या जोगियाच्या प्रहरात भल्या पहाटेला मस्तक तुझ्या चरणी झुकले काळजात कोमेजले मुक्या मागण्यांचे नि:श्वास तरि नकाराचा तुझ्या नाही केला ग दुस्वास घोरण्याच्या सुरांत तुझ्या, माझ्या मागणीला जपले मल्हाराच्या लडिवाळ, सरी आळवल्या कानात, आळविले दाराचे सूर, ठेवुन आशा ग मनात तुझ्या भुपाळाच्या ताना, वाटे निमीत्त हुकले.
काव्यरस

गणपतीपुळे बद्दल माहिती हवी आहे...

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 29/05/2010 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
गणपतीपुळे ला पुण्याहून जायचे आहे. पुढच्या आठवड्यात. कसे जायचे म्हणजे प्रवास सोयीस्कर होईल? तेथे किती दिवसांत बघून होते? आसपास अ़जून बघण्यासारखे आहे का? मध्यमवर्गाला परवडण्यासारखे हॉटेल / गेस्ट हाऊस वगैरे याबद्दल माहिती हवी आहे. इंटरनेटवर हे सर्च करुन माहिती मिळेल याची मला कल्पना आहे. पण, जे मिसळपाव चे वाचक आधी जावून आलेले आहेत ते याबाबत अधिक माहिती सांगू शकतात म्हणून येथे धागा टाकतो आहे.