दोन ग्रह एकमेकांशी निरीक्षकसापेक्ष नव्वद अंशाचा कोन जर करत असतील तर त्या रचनेला ज्योतिषात केन्द्रयोग अशी संज्ञा आहे. केंद्रयोग हे सहसा त्रासदायक असतात कारण त्यात ग्रहांची तत्त्वे नकारात्मक किंवा एकमेकांना विरुद्ध होइल असे काम करताना दिसतात.
दोनाच्या जागी जर चार ग्रह एकत्र येऊन जर एकमेकांशी केंद्र योग करत असतील तर नकारात्मक आविष्कार अधिकच वाढतो. यामुळे ज्या रचना आकाशात तयार होतात. त्यापैकी एक म्हणजे ग्रॅण्ड स्क्वेअर किंवा मराठीत बृहच्चौकोन. जन्मपत्रिकेत बृहच्चौकोन ही रचना असेल तर कमालीच्या जीवनसंघर्षला अशा व्यक्तीनी तोंड दिलेले असते. याच्या उलट बृहत्त्रिकोण ही रचना असते. ज्यांच्या पत्रिकेत बृहत्त्रिकोण असतो त्यांचा आयुष्यक्रम हेवा वाटेल इतका सहज असतो. आयुष्यातले प्रश्न सीमित असतात किंवा वेळच्या वेळी सुटत जातात. संघर्ष हा शब्द त्यांच्या शब्द्कोषात नसतो. अशा व्यक्तीना जगातली गुंतागुंत, इतरांचे कष्ट यांच्या विषयी संवेदना पण कमी असते. जन्मपत्रिकेतील रवि,चंद्र, लग्न आणि ख-मध्य हे जर बृहत्त्रिकोण किंवा बृहच्चौकोन तयार करत असतील तर मात्र वर सांगितलेले आविष्कार हमखास बघायला मिळतात.
हे सर्व सांगायचा उद्देश एवढाच की २६ जून रोजी होणारे ग्रहण बृहच्चौकोन ही रचना निर्माण करणार आहे (प्रभावकाल +/- ५ दिवस). सुदैवाने हा बृहच्चौकोन काही मिनीटेच म्हणजे चंद्र रविच्या प्रतियुतीमध्ये असे पर्यंतच टिकेल. पण तरीही याचा परीणाम मोठा आणि दूरगामी असू शकतो.
ग्रहणाची पत्रिका
अमुक अमुक ग्रहयोगांमुळे जागतिक पातळीवर काय घडामोडी होतील याचा विचार मेदिनीय ज्योतिषात करतात. मेदिनीय ज्योतिष ही ज्योतिषाची शाखा खूप बाल्यावस्थेत आहे. तरी पण बृहच्चौकोना सारख्या रचनांचा मेदिनीय ज्योतिषाच्या अंगाने विचार त्यात असलेल्या रवी-शनी-हर्षल-प्लुटो यासारख्या ग्रहांमुळे करणे इष्ट ठरते.
मेदिनीय ज्योतिषात एक मूलभूत तत्त्व असे आहे की आकाशात ग्रहांची विशिष्ट रचना जेव्हा तयार होते तेव्हा त्या रचनेतील ग्रह ज्या भूभागात आकाशात बरोबर डोक्यावर येतात त्या ठिकाणी (किंवा सभोवतालच्या भागात) ग्रहांच्या तत्त्वांशी संबंधित घटना घडायची शक्यता असते.
२६ जूनच्या बृहच्चौकोनाचा विचार केला तर रवी फ्रान्स जर्मनी आणि आफ्रिकेचा काही भाग येथे ख-मध्यावर येतो. शनी चीन, बांगलादेश, रशियाचा काही भाग येथे ख-मध्यावर येतो. चंद्र-प्लुटॊ रशियाचा अतिपूर्वेकडील काही भाग येथे ख-मध्यावर येतात (नकाशा बघावा). सहसा ज्याबाबतीत हा भूभाग संवेदनशील असतो त्या बाबतीत घटना घडताना दिसते, म्हणजे राजकीय अस्थैर्य असेल तर घातपात, भौगोलिक (नैसर्गिक) अस्थैर्य असेल तर वादळ/भूंकपाची शक्यता इत्यादि...
माझ्या अंदाजानुसार २६ जूनचे चंद्रग्रहण हे चिनी अर्थव्यवस्थेची घोडदौड थांबवणार्या घटनांची नांदी ठरावे. असो.
लेखाच्या पुढच्या भागात २६ जूनचे ग्रहण वैयक्तिक आयुष्यात कोणत्या जन्मतारखाना महत्त्वाचे आहे याचा विचार करु.

वाचने
11890
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
लई भारी निष्कर्ष.....
अजुन एक प्रश्न होता
In reply to लई भारी निष्कर्ष..... by वेताळ
वेताळाशी सहमत...
In reply to लई भारी निष्कर्ष..... by वेताळ
अरेरे John Murphy
चांगले लिहा की
भीती...
संगणक
In reply to भीती... by राजेश घासकडवी
तीन अंश ... बापरे...
मग भारताचे राडे, तिबेटचे राडे म्हणजे चीनचे फावले असा निष्कर्ष का
In reply to तीन अंश ... बापरे... by राजेश घासकडवी
एक शक्यता
In reply to मग भारताचे राडे, तिबेटचे राडे म्हणजे चीनचे फावले असा निष्कर्ष का by युयुत्सु
ऐकून
In reply to एक शक्यता by राजेश घासकडवी
युयुत्सु ह्यानी वर्तवलेले चीन भविष्य .....
In reply to ऐकून by युयुत्सु
या
In reply to युयुत्सु ह्यानी वर्तवलेले चीन भविष्य ..... by वेताळ
ह्या
In reply to युयुत्सु ह्यानी वर्तवलेले चीन भविष्य ..... by वेताळ
असं असताना
In reply to एक शक्यता by राजेश घासकडवी
वा वा वा...
In reply to असं असताना by युयुत्सु
तर्क
In reply to वा वा वा... by राजेश घासकडवी
शास्त्र
In reply to तर्क by युयुत्सु
आपण
In reply to शास्त्र by राजेश घासकडवी
पोपट मेला नाही बरं का...
In reply to आपण by युयुत्सु
पोपट
In reply to पोपट मेला नाही बरं का... by राजेश घासकडवी
ह ह पु वा
In reply to पोपट by पंगा
डिलबर्टवर कार्टून स्ट्रीप
In reply to पोपट मेला नाही बरं का... by राजेश घासकडवी
चालू द्या......!
कधी आयुष्यात आनंद येईल तर कधी दु:ख, त्यासाठी जन्मपत्रिकेत बृहच्च
वर्ल्ड कप ???
फुटबॉलचा
In reply to वर्ल्ड कप ??? by अडाणि
हा हा हा!
In reply to फुटबॉलचा by युयुत्सु
+१
In reply to हा हा हा! by पाषाणभेद
ते कृपया
In reply to हा हा हा! by पाषाणभेद
चीन
http://maharashtratimes.india
In reply to चीन by मिसळभोक्ता
काटवे
In reply to http://maharashtratimes.india by Manoj Katwe
प्रकाटाआ
In reply to चीन by मिसळभोक्ता
सूर्यग्रहण व मेदनीय ज्योतिषशास्त्र
----
In reply to सूर्यग्रहण व मेदनीय ज्योतिषशास्त्र by संजीव नाईक
अवांतर
In reply to ---- by नितिन थत्ते
मिथून
In reply to ---- by नितिन थत्ते
इथुन्-तिथुन
In reply to मिथून by प्रभो
एक शंका
In reply to सूर्यग्रहण व मेदनीय ज्योतिषशास्त्र by संजीव नाईक
पडित गागाभट्ट
In reply to एक शंका by पंगा
सांगतो
In reply to पडित गागाभट्ट by संजीव नाईक
माहितीसाठी
In reply to सूर्यग्रहण व मेदनीय ज्योतिषशास्त्र by संजीव नाईक