विश्वचषकाचे प्रबळ दावेदार - द सांबा किंग्ज
काय मग लोक्स..... काय भारी माहौल बनतोय की नाही मिपावर फुटबॉलचा? डॉन, प्रभो, मेघवेडा... धमाल उडवतायत! आकडेवारी काय, टीम्सच्या फॉर्मची चर्चा काय, मोठमोठ्या स्टार खेळाडूंची ओळख काय.... ओहोहोहो.... बहार आलिये ! बाहेर पाऊस, हातात - गरमागरम चहा / कॉफी... वाफाळणारी भजी (किंवा थंडगार बीअर आणि दाणे), आमचा गणपा म्हणतो त्याप्रमाणे "आपलं आवड्त्या व्यक्तीचा सहवास" आणि समोर चाललेला रंगतदार सामना (आणि कानांत १३७४९ डास एकदम गुणगुणावेत असा तो वुवुझेलांचा आवाज).... अशी चैन करत नसाल तर खरंच एक सोहळा मिस करताय बरं का.
काय टाकलाय भौ जर्मनीनी ऑस्ट्रेलियाला... आयव्हरी कोस्ट काय खेळलं बघित्तलंत?
विशेष
मिसळपाव