मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एमेफ हुसेनची चित्रे आणि हिंदूंच्या दूखावल्या जाणार्‍या भावना

युयुत्सु · · काथ्याकूट
एमेफ हुसेनची चित्रे आणि हिंदूंच्या दूखावल्या जाणार्‍या भावना हे मला आजतागायत न उलडलेले कोडे आहे. हिंदू त्यांच्या स्वतःच्या देवतांचा किती आदर करतात हे बघितले की इतराना टिंगल करायची संधी मिळणारच. आम्ही कसेही वागू, आम्हाला कुणि नावे ठेवायची नाहीत असा यात मला सूर ऐकू येतो. गेले कित्येक वर्षे मी राहतो त्या ठिकाणी एका नाल्यात कुणितरी हे एक देऊळ बांधलेले आहे. या देवळाचे हूसेनने चित्र काढले तर हिंदूच्या भावना लगेच दूखावतील. पण वाहत्या गटारा शेजारी देउळ बांधण्याबद्दल कुणी हूं की चूं केलेले मला ऐकू आलेले नाही. Image removed. असेच एक दिवस मला भांडारकर रोडवर गोळविलकर लॅब शेजारील कचरापेटीच्या भिंतीवर ही मूर्ती सापडली. ज्याने कुणी ही कचरापेटीत टाकली त्याला नदीत अथवा विहीरीत विसर्जन करायची पण बुद्धी झाली नाही हे आश्चर्य! Image removed. आपणच आपल्या दैवतांचा आदर केला नाही तर इतर लोक त्याचा गैर फायदा घेणारच...

वाचन 10786 प्रतिक्रिया 0