Skip to main content

स्टॉप अनदर भोपाल..

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 19/06/2010 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
१) हे मराठी संस्थळ आहे याची कल्पना आहे, पण तरीही हा धागा अपवाद समजला जावा अशी विनंती.. २) स्वाती बांदेकर ह्या व्यक्तिला मी ओळखत नाही पण विषय महत्वाचा आहे म्हणून, आणि सर्वांच्या माहितीकरता म्हणून मला आलेले त्यांचे विपत्र मी येथे डकवत आहे.. ------------------------------------------------------------------------------------------- from swatibandekar@gmail.com reply-to swatibandekar@gmail.com to tatya7@gmail.com date 19 June 2010 12:41 subject Stop Another Bhopal Hi

१ विषय, २ लेख, ३ संकेतस्थळे आणि ४-५ दिवस - एक प्रयोग

लेखक आनंद घारे यांनी शनिवार, 19/06/2010 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत असतांना मला अचानक कधीतरी लेखन करायची उबळ यायची. त्या वेळेला एकादा कोरा कागद हाताला लागला आणि कोणतेही विघ्न आले नाही तर तो पेन्सिलीने अथवा शाईने काळानिळा होत असे. ही लेखनाची ऊर्मी थोड्या वेळानंतर ओसरायची. पण आपल्याकडे इतरांचे किती लक्ष आहे हे पाहणे हा स्वभावातला स्थायी भाव होता. त्याचाच एक भाग म्हणून आपले लिखाण किती लोकांनी वाचले याबद्दल उत्सुकता वाटायची. पण भिडस्तपणा हाही मनातला दुसरा एक स्थायी भाव असल्यामुळे मी आपणहून त्याबद्दल कोणाला विचारत नसे. दुसरे बालपण सुरू झाल्यानंतर पहिल्या बाल्यावस्थेतल्या कांही गुणांनीही डोके वर काढणे सुरू केले.

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ

लेखक इंटरनेटस्नेही यांनी शनिवार, 19/06/2010 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वपीठिका: मी मुंबई विद्यापीठाशी संलग्न एका प्रथितयश महाविद्यालयातून बीएमएस (Bachelor of Management Studies) ही पदवी मिळवली आहे.

“ रात्र यौवनांत ”

लेखक निरन्जन वहालेकर यांनी शनिवार, 19/06/2010 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
“ रात्र यौवनांत ” गंध सुगंधि, परिचित वारा, आभासले, आली प्रिया, प्राजक्त बरसले आज नभातून, चंद्र साक्षीला अन उभी प्रिया.. स्पर्शून पाहीन तुज आस होती ही जिवनी आज सामोरी तू अशी जाग आली स्वप्नातुनी “ दूर इतुकी का उभी ” ? आज जवळी असूनही ये अशीच मज समिप याद राहील रात्र ही रात आहे यौवनांत अन अधिरता ही अंतरी लाज हृदयीं का वृथा जाईल वाया रात्र ही आज बहरू दे प्रितवसंता, फुले गुलाबी, धुंद प्रितिचे, जतन करू या सदैव हृदयीं क्षण सोनेरी अन गंध प्रितिचे. निरंजन वहाळेकर
काव्यरस

कोल्हापुरी तडका!!!

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 19/06/2010 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
परवा कोल्हापूरला गेल्तो... जाताना, प्रवासातच, आठवणींची जुळवाजुळव करून ठेवली होती... कोल्हापुरात जायचं म्हटलं, की मला बर्‍याच वेळा `सत्यवादी' आठवतो... ते तीनचार रंगाचे, उभे पट्टे असलेलं पहिलं पान, आणि त्यावरच्या मस्त मथळ्यांच्या बातम्या... त्यातले खास कोल्हापुरी शब्द... ते आठवतच सकाळी कोल्हापुरात उतरलो. रेस्ट हाऊसवर गेलो, आणि जस्ट फ्रेश होऊन भायेर पडलो. मस्त पाऊस पडून गेल्ता...

झाकिर नाईक

लेखक आनंदयात्री यांनी शनिवार, 19/06/2010 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या वर्तमानपत्रात बातमी आहे. डॉ. झाकिर नाईक यांना इंग्लंड मधे येण्यास बंदी अशी. कोण आहेत हे झाकिर नाईक ? डिएनएने असे लिहले आहे की '... Zakir Naik, 44, will not be allowed to enter the country due to his 'unacceptable behavior' ... ' त्यांचे हे अनअ‍ॅक्सेप्टेबल बिहेविअर काय आहे/होते ? या प्रश्नांची उत्तरे जाणण्यासाठी आणि या विषयावर उहापोह होण्यासाठी हा काथ्याकुट.

बापाचा दिवस

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 19/06/2010 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
जून महिन्याचा तिसरा रविवार अख्ख्या जगाने बापजाद्यांच्या उत्सवासाठी राखून ठेवलाय. एरव्ही बापाचा दिवस सहसा कोणताही पोट्टा 'साजरा' करतांना दिसत नाही. मात्र बापाचा 'दिवस घालायला' सगळी चिरंजीव मंडळी न चुकता हजर होतात. कारण त्याच दिवशी इस्टेटीच्या लॉटरीची सोडत असते! असो. त्यामुळे काही फादर्स डे चं महत्व कमी झालेलं नाहीये. 'पप्पा वेडुल्या' मुली आजही मोठ्या उत्साहाने आपल्या डॅड करिता काहीतरी 'हटके' भेटवस्तू खरेदी करण्यासाठी गिफ्ट आर्टिकल्सची अनेक दुकाने या दिवशी पालथी घालतांना दिसतात. मातृदिनाइतका प्रतिसाद पितृदिनाला मिळत नसतो हे मात्र खरे.

< पहीलं अ‍ॅडव्हेन्चर , पहीलं चुंबन>

लेखक शुचि यांनी शनिवार, 19/06/2010 01:51 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा पुढील सुंदर कविता - http://misalpav.com/node/12795 पहीलं अ‍ॅडव्हेन्चर आमचं पहीलं चुंबन तो रंगात आलेला मी जरा अलिप्तच त्याचा तो चावटपणा माझं सावध हास्य अचानक त्यानी मागणं एकत्र चुंबन घेणं त्याचं ते आतुर धटींगणपणा माझं शुद्ध नवखेपण त्याने धसमुसळ्यासारखं मला दुखावणं यावेळी, त्याचा तो विजयी चेहरा आणि माझं समजूतदार हास्य
काव्यरस

(पहिला पाऊस पहिली भेट)

लेखक अडगळ यांनी शनिवार, 19/06/2010 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
माफी असावी http://www.misalpav.com/node/12795 पहिला पाऊस आमची पहिली भेट ती रांगेत बसलेली मी तिच्या तीन डबे मागं तिचा तो क्लासिक डबा आणि माझा फुटका कॅन अचानक ओळख निघणं रांगेत दोन डबे पुढं जाणं तिचं ते प्लॅस्टिक पिशवी फड्फडणं अन् माझं त्या आवाजानं तडफडणं माझ्याबी कार्डावरचं राकेल घेवुन, मलाच निरोप देणं यावेळी, तिचा तो ज्वलनशील चेहरा आणि माझं विझलेलं हास्य
काव्यरस