“ रात्र यौवनांत ”

निरन्जन वहालेकर जे न देखे रवी...
“ रात्र यौवनांत ” गंध सुगंधि, परिचित वारा, आभासले, आली प्रिया, प्राजक्त बरसले आज नभातून, चंद्र साक्षीला अन उभी प्रिया.. स्पर्शून पाहीन तुज आस होती ही जिवनी आज सामोरी तू अशी जाग आली स्वप्नातुनी “ दूर इतुकी का उभी ” ? आज जवळी असूनही ये अशीच मज समिप याद राहील रात्र ही रात आहे यौवनांत अन अधिरता ही अंतरी लाज हृदयीं का वृथा जाईल वाया रात्र ही आज बहरू दे प्रितवसंता, फुले गुलाबी, धुंद प्रितिचे, जतन करू या सदैव हृदयीं क्षण सोनेरी अन गंध प्रितिचे. निरंजन वहाळेकर
वर्गीकरण
काव्यरस

4 टिप्पण्या 1,848 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

मदनबाण नवीन

कविता आवडली... :) मदनबाण..... "Life is like an onion; you peel it off one layer at a time, and sometimes you weep." Carl Sandburg

sagarparadkar नवीन

अहो भर दिवसा देखील त्या रात्रीच्या कल्पनेने रोमांचित झालो ... 'जावयाची जात' मधील " ... होवून आज राधा, माझी प्रिया हसावी" हे गाणं आठवलं. कोणाकडे आहे का ह्या गाण्याची लिन्क? मला तरी सापडली नाही .