पावसाची कविता
मोगर्याचं पान सांगेल
भिजताना आलेली मजा
टपटपणार्या थेंबांतून
पसरणारा गारवा,
मग अनामिक थरथर
ताजी उब उगत असताना
निथळणारा प्रत्येक थेंब
अंतस्थ हालचालींना साद देतोय
शिरशिरणारा गारवा
हलकेच घालतोय फुंकर
ओलेत्या उबेवर
फुलेच वेडावून गेलीयेत..
आता....सुगंध कोण थांबवणार ?
मिसळपाव
कुणे धबधबा (पहिला टप्पा)
कुणे धबधबा (दुसरा टप्पा)