डाळिंब सोलण्याची कला
डाळिंब व्यवस्थित सोलणे हे मनीचं गूज खोलण्याइतकंच कठीण काम असतं. मधुमिठास बोलणे काय किंवा इच्छित निसरगाठी खोलणे काय दोन्ही गोष्टी एकाच पाटातून वाहणाऱ्या! त्या वाहत्या, खळाळत्या प्रेमजलात (किंवा जालात म्हणा हवं तर) संबंधित प्रेमीजन कसे-किती-कोठवर वहावत जातील याचा अंदाज भल्याभल्यांनाही येत नसतो. पाटाने वहिवाट मोडल्यावरच भानावर येणं होतं!
तद्वत डाळिंब सोलण्याअगोदर आत काय दडलंय? टिप्पूर दाणे आहेत की नुसताच भुललासी वरलिया रंगा असा प्रकार आहे, याचा अदमास ना चाकूला असतो ना काकूला. डाळिंब विक्रेती काकू कितीही म्हटली की ते झाडावरच टचकन् फुटलंय, यावर पटकन विश्वास ठेऊ नये बंधूंनो.
मिसळपाव