Skip to main content

पावसाची कविता

लेखक दत्ता काळे यांनी शनिवार, 12/06/2010 04:29 या दिवशी प्रकाशित केले.
मोगर्‍याचं पान सांगेल भिजताना आलेली मजा टपटपणार्‍या थेंबांतून पसरणारा गारवा, मग अनामिक थरथर ताजी उब उगत असताना निथळणारा प्रत्येक थेंब अंतस्थ हालचालींना साद देतोय शिरशिरणारा गारवा हलकेच घालतोय फुंकर ओलेत्या उबेवर फुलेच वेडावून गेलीयेत.. आता....सुगंध कोण थांबवणार ?
लेखनविषय:

वाचने 3301
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

मस्त आहे!! वेडावणारी!!! सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||