न्यायाचा पुतळा
एक आटपाट नगर असतं. त्या नगरात एक गरीब ब्राह्मण रहात असे. आपले नित्यनेमाचे उद्योगधंदे आटोपुन तो नगरीचा फेरफटका करत असे. नगरीत अनेकांशी गप्पा मारत असतांना तो आपल्या वैयक्तिक आयुष्याला विसरत असे. नगरीत अनेक विद्वज्जन, मान्यवर भल्या भल्या विषयांवर चर्चा, वाद करत असत. पण हा त्यापासुन बरेचदा दुर रहात असे. लोकांशी बोलावं, विनोद करावा, टवाळी करावी असाच याचा खाक्या असे. वैयक्तिक आयुष्यात ज्यांना विचार करायचा नसतो ते चव्हाट्यावर येवुन विचार केल्याचे नाटक करतात असा त्याचा सरळ सरळ विचार होता.
नगरातील नगरपालाने काही काळ बदली नगरपाल नेमल्यानंतर ब्राह्मणाची साडेसाती सुरु झाली.
मिसळपाव
सध्या फिफा वल्डकप २०१० अंतीम टप्प्यात पोहोचला आहे. स्पेन आणि नेदरलॅन्ड यांच्यात आता अंतीम सामना रंगेल. या संपुर्ण स्पर्धेत अनेक खेळाडूंबरोबर चर्चेत आला आहे तो भविष्यवेत्ता ऑक्टोपस.पॉल असे त्याचे नाव आहे . जन्माने इंग्लन्डचा असलेला हा पॉल सध्या वास्तव्यास जर्मनीत आहे. या स्पर्धेतील भविष्यवेत्त्या ऑक्टोपसने आत्तापर्यंतची जर्मनी बाबतची भविष्ये बरोबर वर्तवली आहेत.
मार्सेलिस बंदरामध्ये ७ जुलै १९१० ह्या रात्री मोरया बोट थांबली आणि ८ जुलै १९१० रोजी सकाळी स्वातंत्रवीर सावरकरांनी बोटीच्या पोर्टहोल मधून भर समुद्रात उडी मारली व पोहत मार्सेलिस बंदराला लागले. ह्या जगभर गाजलेल्या ऐतिहासिक पराक्रमाची आज शताब्दी आहे.
त्यानिमित्त ह्या थोर स्वातंत्रवीराला मिपापरिवारातर्फे विनम्र आदरांजली.
