Skip to main content

मसाला मसूर

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 09/07/2010 05:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी >:) , अस्मादिकांना ह्या विभागात बघून दचकू नका :O ... व्यावसायिक स्पर्धेमुळे आता आम्ही मिपाच्या सर्व विभागात शिरकाव करायचे ठरवले आहे.. :B पाककृतीच लिहिणार आहे .. :$ आपापल्या स्वयंपाकघरात तुम्ही तिचे स्वतःच्या जबाबदारीवर विडंबन करू शकता..

कानसेन कोण?

लेखक बहुगुणी यांनी गुरुवार, 08/07/2010 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
गाण्यांच्या दुव्यांसह आणि विजेत्यांच्या नावांसह या स्पर्धेचे आधीचे भाग इथे पहायला मिळतील: पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग, चवथा भाग, आणि पाचवा भाग. खुशखबर: काही (सहृदय!) कानसेन माझ्या टीम मध्ये यायला तयार आहेत! त्याचा पहिला दृश्य परिणाम म्हणून स्पर्धेच्या या भागाच्या संचालिका आहेत "मस्त कलंदर"! भाग ६ चा ध

आमचे गजाननबुवा..!

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 08/07/2010 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर गायकीचे दिग्गज पं गजाननबुवा जोशी.. डाँबिवलीचे पं गजाननबुवा जोशी.. "बुवा, आपल्या साठीच्या कार्यक्रमानिमित्ताने मला गायला मिळालं आणि माझं गाणं आपल्याला आवडलं हेच माझ्याकरता खूप आहे!" असे उद्गार खुद्द भीमण्णांनी ज्यांच्याबद्दल काढले ते गजाननबुवा..! गजाननबुवा आणि त्यांच्या घरातून, उल्हासकाका - मधुबुवांसारख्या त्यांच्या शिष्य परिवारातून मला अगदी भरपूर, मनसोक्त गाणं मिळालं हे माझं भाग्य..

ध्वनी - गॅरे कैझर या लेखकाच्या दृष्टीकोनातून

लेखक शुचि यांनी गुरुवार, 08/07/2010 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
काल फिरायला जाताना मी आणि नवरा इकडच्या तिकडच्या विषयांवरच्या गप्पा मारत होतो. सहज विषय निघाला "कोबेअर रिपोर्ट" शो चा. मध्यंतरी व्हरमाँट चा एक लेखक या शो मधे येऊन गेला. या लेखकाचं नाव "गॅरे कैझर". त्यानी या शो मधे काही नावीन्यपूर्ण विचार मांडले होते - ध्वनी या विषयावर. या लेखकाने एक पुस्तक लिहीले आहे "द अन्वाँन्टेड साऊंड ऑफ एव्ह्रीथिंग वी वाँट" घरी जाऊन मी मी जालावर त्याचे विचार वाचले आणि पुढील काही रोचक गोष्टी सापडल्या. त्या या लेखाकाच्या शब्दात- "उपासमार, महायुद्ध, पृथ्वीचे सातत्याने वाढणारे तापमान आदि समस्यांशी तुलना केली तर ध्वनी ही अजीबात समस्या वाटत नाही.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरील गीत : उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 08/07/2010 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर उचल मराठी झेंडा जावूदे वर वर ||धृ|| उचल तुझे हात नको भिऊ आता आपूलाच जय होईल सीमेत शिरता झेंडा मराठीचा फडके बेळगाव मनपावर उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||१|| राज्य आपले एक व्हावे मराठी भाषकांचे वेगळे न राहू आता एक घर करू बांधवांचे सुपीक प्रदेश ताब्यात आणू निप्पाणी कारवार उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||२|| पुर्वज आपले खपले तेथे विसरतो कशाला महाराष्ट्र एकीकरण समिती आहे तुझ्या पाठीला सामिल करू हलियाल,भा
काव्यरस