Skip to main content

राजवंशी

लेखक राहत यांनी गुरुवार, 25/11/2021 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
राजवंशी वणव्यात भार गवताचे ते टाकुन गेले वाहत्या गंगेत कसे हात धुऊन गेले अंधार शोधण्या ते दीप घेऊन आले आसवांच्या गावाला हुल देऊन गेले रिक्त तर्कांची मते हाती घेऊन आले भाट अर्थहीन शब्दांचा ढोल बडवुन गेले घेऊनी विजय मनीषा हात जोडून आले आणीबाणीत सारे कसे पांगुन गेले उदकाहूनी निराळे तरंग मानून गेले राजवंशी थाटात दिंडित राहुन गेले - राहत

जात्या मधले दाणे रडती सुपातले हसती......

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 24/11/2021 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
जात्या मधले दाणे रडती सुपातले हसती. " वृद्धांचे फालतू लाड बंद करा" ,लेख मिसळपाव ब्लॉग वर वाचला. आवडला, भरपूर प्रतिसाद मिळाले. लेखक यशस्वी झाले. एवढ्या सगळ्या प्रतिक्रिया वाचल्यावर असे वाटू लागले आहे की वृद्धत्व शाप की वरदान. अर्थात तो एक वेगळा धागा होऊ शकतो. प्रत्येकाचा अनुभव, दृष्टिकोन वेगळा अगदी पंचतत्रांतल्या गोष्टी सारखा. आमची खेळातली पहिली पारी खेळून झाली. एक्स्ट्रा ओव्हर्स पण संपल्यात. आता पँव्हेलियन मधे बसलोय सामना संपण्याची वाट बघत.

हे डोंगरकड्या

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी मंगळवार, 23/11/2021 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
हे डोंगरकड्या --------------------------------------------- हे डोंगरकड्या , गड्या , काय डौलात उभा आहेस तू ! छाती पुढे काढून हे डोंगरकड्या , तुझ्या उन्नत छातीवर बरसत असतील मेघ अन त्यांच्या मोतियांची माळही रुळत असेल तिच्यावर अन तूही ते मोती अलगद सोडत असशील तुझ्या पायागती भरभरून हे डोंगरकड्या , हिवाळ्यात धुक्याची शाल लपेटत असशील तुझ्या त्या छातीभोवती तरुणीच्या धवल अवगुंठनासारखी अन गार वारंही गपगुमान बाजूबाजूने वाहून निघून जात असेल तुझ्या पोलादी छातीला नमून हे डोंगरकड्या , ग्रीष्मात तुझ्या कड्यावरचं गवत पिवळं - पिवळं पडत असेल एखाद्या बुजुर्गाच्या छातीवरचे केस न केस पांढरे झाल्य

तिथे कोणी नि:शब्द

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 21/11/2021 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
नव्या अंतरिक्षी पुन्हा प्राणपक्षी जसा झेप घेण्यास सरसावतो... ....खगोलातल्या अद्भुताच्या स्वरांनी चिदाकाश व्यापून झंकारतो ...स्थलाच्या त्रिमितीत कालाक्ष थोडा उगा विरघळावा तसा भासतो .....जिथे चुंबिते पाणरेषेस व्योम तिथे कोणी नि:शब्द झंकारतो

विजेची गोष्ट ४ : एडिसन चे DC विजेचे साम्राज्य आणि त्याला AC विजेने टक्कर देऊ पाहणारा वेस्टिंग हाऊस (Beginning Of War Of Currents)

लेखक अनिकेत कवठेकर यांनी रविवार, 21/11/2021 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
(अंदाजे १८००-१८८६) विक्रमाच्या  राज्यात  दीपावलीचा सण मोठ्या  प्रमाणात  साजरा  करण्यात आला होता. काय ती रोषणाई काय तो थाट वर्णावा महाराजा .. किती कौतुके करावी त्याची! रात्री केलेली रोषणाई आणि दारूकाम तर आकाशातल्या तारे तारकांना फिके पाडेल असे.. काही अग्निबाण सरळ सरळ आकाशात उंच जातायत.. थेट एका रेषेत आकाशाला गवसणी घालायला निघाल्यासारखे.. एका दिशेत .. तर भुईचक्रे गोलगोल फिरत फिरत सर्वत्र फिरत हलणाऱ्या रांगोळ्या घातल्यात कि काय असे वाटावे..

चौकटराजा- काही ज्ञात, अज्ञात पैलू

लेखक प्रचेतस यांनी रविवार, 21/11/2021 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
काका गेले, ते हि शेवटची भेट न होऊ देता हे अजूनही खरं वाटत नाहीये, मात्र ते गेलेच हि वस्तुस्थिती मात्र स्वीकारायलाच हवी आहे. काही विस्कळीत तर काही पक्क्या आठवणी सतत मनात रुंजी घालत आहेत. तसा चौराकाकांचा आणि माझा परिचय ते मिपावर आल्यापासूनचा, सुमारे नऊ, साडेनऊ वर्षांपूर्वीपासूनचा. त्यांचं घर माझ्या घरापासून अगदी चालत जाण्याच्या अंतरावर. कित्येकदा आम्ही भेटत असू. चिंचवड टेल्कोसमोरच्या गल्लीत असलेल्या इमारतीत ते राहात. "काका, मी येतोय, कट्ट्यावर या" असं मी त्यांना फोन करत असे. ते लगेच येत. तिथल्या आयडिया शोरुमच्या पायर्‍यांवर आम्ही गप्पा मारत बसत असू.

'चौरा' : विज्ञाननिष्ठ, चिकित्सक, बहुरंगी ‘राजा’माणूस !

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 21/11/2021 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
चौरा व माझा मिपा परिचय उण्यापुऱ्या चार वर्षांचा. आमची प्रत्यक्ष भेट फक्त एकदाच. तरीसुद्धा मिपावरील प्रतिसादांमधून या राजाने जो मैत्रीचा पूल आमच्यादरम्यान उभारला तो अविस्मरणीयच. म्हणूनच चित्रगुप्त यांच्या धाग्यावर निव्वळ चार ओळींची आदरांजली लिहून माझे समाधान झालेले नाही. किंबहुना मी तेवढेच करून थांबणे हा चौकटराजांवरील अन्याय असेल. काल त्यांच्या निधनाची दुःखद बातमी वाचल्यापासून अगदी ‘आतून’ बरेच काही मनाच्या पृष्ठभागावर येत आहे. त्यांच्यावर अजून काहीतरी मनापासून लिहीले पाहिजे ही ऊर्मी स्वस्थ बसू देत नाही.

उर्दू शायरीमधील "हर्फ गिराना" आणि हिन्दी चित्रपट संगीतावर त्याचा परिणाम

लेखक धष्टपुष्ट यांनी रविवार, 21/11/2021 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत भूलचुकीमुळे काही काव्यशास्त्रविषयक लेख "जे न देखे रवी" मध्ये लिहीत होतो. कालचा लेख इथे पुन्हा प्रकाशित करत आहे. क्षमस्व! --- मराठी वृत्तबद्ध कवितेत एखादे अक्षर लघु आहे का गुरु यामध्ये संदिग्धता नसते, पण त्याचा कधीकधी जाचही होऊ शकतो. उर्दूमध्ये "हर्फ गिराना" या सवलतीमुळे त्यात लवचिकता, कधी कधी संदिग्धता आणि म्हणूनच रोचकता आली आहे. . या लघुलेखात आपण २ गोष्टी पाहणार आहोत १. हर्फ गिराना काय प्रकार आहे २. तो कधी कधी नीट न समजल्यामुळे चित्रपट संगीतात कसा घोटाळा होतो --- या लेखाच्या व्याप्तीच्या बाहेर: १.

विपश्यना आणि रॅन्डम मी

लेखक पाटिल यांनी रविवार, 21/11/2021 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
(हे वाचणाऱ्यास विपश्यनेच्या दहा दिवसांच्या कोर्ससंबंधी अनुभवाने किंवा ऐकून वाचून माहिती असेल, असं गृहीत धरून लिहितोय.) १. तर फारा वर्षांनी एकदाचा दहा‌ दिवसांच्या सुट्टीचा जुगाड करून, पद्धतशीर बॅग वगैरे घेऊन, ट्रेनमधून उतरलो. रिक्षातून विपश्यना सेंटरच्या दिशेने जाताना 'कदम बंधू बिअर शॉपी' असा एक ओझरता बोर्ड दिसला. म्हटलं, कोर्स संपल्यानंतर आपल्यासारख्यांसाठी ह्या कदम बंधूंनी जवळच 'सोय' करून ठेवली आहे, हे एक बरंय. रिक्षातून उतरलो तर सेंटरच्या गेटवरच्या छोट्याशा हॉटेल कम् टपरीमध्ये दोन समवयस्क तरूण सिगरेट ओढत उभे.

मिपाकर 'चौकटराजा' यांना भावपूर्ण श्रद्धांजली

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 20/11/2021 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
आज दिनांक २० नोव्हेंबर, २०२१ रोजी सकाळी ५:२० वाजता, आकुर्डी पुणे येथे आपले प्रिय मिपाकर चौकटराजा (अरूण बर्वे) यांची प्राणज्योत मालवल्याचे समजले. मृत्यूचे कारण कोविड असल्याचे समजले. गेली काही वर्षे मी कायप्पावर त्यांचेशी नियमितपणे संपर्कात होतो. ते पियानोवर ओपी नय्यरची गाणी वाजवून रेकॉर्डिंग पाठवायचे, अलिकडे स्मूलवरही बरीच गाणी गात असत. मिपावर त्यांनी उत्तम दर्जाचे लिखाण केलेले असले तरी अलिकडे काही काळापासून ते मिपावर येताना दिसलेले नाहीत. गेले दोन-तीन आठवडे त्यांचेशी संपर्क होत नव्हता म्हणून काळजी वाटत होती, फेसबुक आणि स्मूलवरही ते येत नव्हते.