एक होता कार्व्हर
लेखिका :वीणा गवाणकर
साधी राहणी उच्च विचारसरणी या उक्तीनुसार जगणारे,वागणारे मानव जातीला वरदान असतात. डॉक्टर जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर अमेरिकन शास्त्रज्ञ ,कृषी क्षेत्रात अमुल्य कार्य करणारे सतत कार्यमग्न असणारे.पण इथपर्यंत पोहचण्यासाठी वर्णद्वेष हा सर्वात मोठा अडथळा त्या काळात भोगुनही एक तारा शेती क्षेत्रात कायमचा उमटला.
अमेरिकन गुलामगिरीच्या काळात १८६० च्या दरम्यान झाला ,आपल्या जन्माची तारीख कार्व्हरयानाही माहित नव्हती.आईवडील दोघेही गुलाम होते,मोजेस कार्व्हर यांनी त्यांना विकत घेतले होते.एका नाट्यमय अपहरणात मेरी- जॉर्ज कार्व्हरची आई कायमची नाहीशी होती. केवळ जॉर्ज वाचतो ज्याला मोजेसबाबा एका घोड्याच्या मोबदल्यात पुन्हा विकत घेतात.जॉर्ज कार्व्हर मोजेस आणि त्यांची पत्नी सुझेन यांच्या घरातलाच छोटासा भाग होतो.काहीही न बोलणारा हा कृष्णवर्णीय मुलगा मुका असेच सगळ्यांना वाटत.परंतु फुलांविषयी,पक्षांविषयी निसर्गाविषयी त्याचे ममत्व सगळ्यांना आश्चर्यचकित करते.एका जादुगाराप्रमाणे हिरमुसलेली झाडं,रोपं तो खुलवीत असे.
कार्व्हर व इतर कृष्णवर्णियांना डायमंड ग्रोव्हला शिक्षणासाठी परवानगी नसते.मोजेसबाबाचे घर सोडून निओशोला पोहचतो.रात्रभर थंडीत कुडकुडत काढणाऱ्या जीवाला मारिया नावची चांगली स्त्री आसरा देते आणि त्यांचे नाव कार्व्हर बाबांचा जॉर्ज ‘जार्ज कार्व्हर’ होते.शिक्षणासाठी कार्व्हरची धडपड ,कष्ट करून पैसे कमवायचे ,प्रवेश घ्यायचा ,शिकायचे आणि पैसे संपले की पुन्हा शाळा सोडायची.नंतर तेच कष्ट,पैसे कमवा,शिका हे चक्र त्याचे चालूच राहत असे.पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी हायलंड विद्यापीठाने देऊ केलेला प्रवेश प्रत्यक्षात ते कृष्णवर्णीय आहे समजताच रद्द केला जातो.कार्व्हारंची शिक्षणासाठीची तगमग सिम्पसन कॉलेजमुळे पूर्ण होते परंतु आपल्या कृष्णवर्णीय बांधवांच्या उद्धारासाठी कला आणि संगीतातली आवड आणि संधी सोडून कार्व्हर शेतकी महाविद्यालयात प्रवेश घेतात.तिथेच पुढे ते प्राध्यापक महानुन्ही रुजू होतात.मायकोलॉजी आणि वनस्पती पथोलोजीमध्ये नवनवीन संशोधन करू लागतात.अनेक दुर्मिळ वनस्पती,कीड ,बुरशी यांवर काम करत असतात.
शेकडो वर्ष गुलामगिरीतच जगलेल्या असंख्य कृष्णवर्णियांना गुलामगिरीतून स्वातंत्र्य तर मिळते पण त्याचा उपयोग त्यांना मुळी येत नव्हता.अशांसाठी वाशिंग्तोन यांनी दक्षिण अमेरिका मध्ये टस्कीगी संस्थेची स्थापना केली.भांबावलेल्या कृष्णवर्णियांना स्वत:च्या पायावर उभे करायचे हा त्यांचा निर्धार होता.त्यानुसार अनेक लघुउद्योग ते शिकवतात.लक्षात येते की गुलामगिरीत शेतीत गुरांप्रमाणे राबणाऱ्या या बांधवांना शेतीचे खरे ज्ञान मिळाले पाहिजे हे वाशिंग्तोन ओळखतात.यासाठी एकच नाव त्यांच्या समोर येते जॉर्ज कार्व्हर.ते कार्व्हर्नाना निवडीचे पत्र धाडून टास्कीगीत येण्याचे आमंत्रण देतात.आणि कार्व्हरही “येत आहे “या वाक्याने काही दिवसात जुन्या प्रयोगशाळेत सर्व नीट व्यवस्था करून तिथे पोहचतात.तिथे आपल्या बांधवांची डळमळीत अवस्था पाहून कार्व्हर बदलाचे एक मोठे शिवधनुष्य उचलतात.
टस्कीगीतच पुढचे सारे आयुष्य ते व्यतित करतात.पहाटे चारला फिरून आल्यावर ते प्रयोगशाळेत पूर्ण व्यग्र होऊन जात.रोटेशन क्रॉप,कापसाऐवजी सोयाबीन ,भुईमुग असे जमिनीचे पोत वाढविणारे पिकांचा पर्याय ते देतात.भुईमुगाचा एक हंगाम अतिपिकामुळे आणि मागणी कमी असल्याने वाया जाणार तेव्हा कार्व्हर स्वत:ला प्रयोगशाळेत कोंडून घेतात आणि जवळपास शेकडो बाय प्रोडक्ट तयार करूनच श्वास घेतात.तीच गोष्ट रताळी पिकाची,सोयाबीन ,कापसाची!कृत्रिम रंग महाग म्हणून मातीपासून रंग बनविणे,शाकाहारी मांसाहार असे अनेक प्रयोग वाचतांना कमालीची मौज वाटते.
त्यांच्या अफाट संशोधनाने हळूहळू जगालाही भुरळ पडणार नाही तर नवलच.पण तरीही फंडची गरज म्हणून कार्व्हर पियानोचे प्रयोग करून तो मिळवतात.अनेक त्यांना मोठमोठ्या संशोधन केंद्राचे त्यांना नोकरीसाठी निमंत्रण येते पण ते सर्व नाकारतात.अगदी तुटपुंज्या पगारात काम करतात,तोही ते शेवटी फंड म्हणूनच देतात. आयुष्यभर मित्रांनी दिलेला एकच कोट वापरला.कधीही सुट्टी घेतली नाही.
एव्हढे असूनही या सेवाव्रतीची कृष्णवर्णीय म्हणून हेटाळणी थांबत नाही.अनेक अपमान पचवून आपल्या कार्यापासून ते तसूभरही मागे हटले नाही.तुम्ही याचा प्रतिकार का करत नाही यावर ते उत्तर देत संघर्ष करण्याऐवजी तो वेळ मी संशोधनासाठी देईल’ खर म्हणजे तुमच कामच तुमची खरी ओळख व्हायला हवी तुमचा वर्ण ,धर्म ,जात ई. गोष्टी नाही हे पुन्हा महान लोकांचे लक्षण अधोरेखित होते.
आयुष्यभर अविवाहित राहिलेल्या हा सेवाव्रती आपला कधी हयातीत इतर शास्त्रज्ञाशी मिसळला नाही एकलकोंडा राहिला,पण कार्याच्या बाबतीत एकाग्र राहिला.जास्त सहवास लाभालाही नाही तरीही आईला ते कधीच विसरले नाही ,मातृभक्त राहिले.आपल्या कार्याचे बीज योग्य हाती देऊन कार्व्हर १९४३ ला कर्मभूमीतच अनंतात विलीन झाला.
वीणा गवाणकर लिखित हे पुस्तक मराठीतले एक अमुल्य साहित्य आहे.पुस्तक लिहितांना सरळ सोपी तरीही तरल भाषा हे या पुस्तकाच्या यशाचे गमक आहे.पुस्तकातली चित्रे,पुस्तकातील उत्कृष्ट दर्जाची पाने हे पुस्तकाची जमेची बाजू आहे
प्रेरणा देणाऱ्या पुस्तकांमध्ये या पुस्तकाचे स्थान खूप मोठे आहे.
-भक्ती
१. एक होता कार्व्हर या पुस्तकाचा उत्तम परीक्षण व्हीडीओ
२.कार्व्हर यांच्या इतर फोटोंसाठी
वाचने
13744
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम पुस्तक परिचय
धन्यवाद,मला ही तेच वाटलं थोडं
In reply to उत्तम पुस्तक परिचय by श्रीरंग_जोशी
छान प्रेरणादायी पुस्तक
वीणा गवाणकर यांच्या मुलाखतीत
In reply to छान प्रेरणादायी पुस्तक by स्मिताके
वीणा गवाणकर यांच्या मुलाखतीत ऐकलं होतं की त्या कार्व्हरचं चरित्र वाचत असताना, मुलांना झोपण्यापूर्वी त्यातल्या गोष्टी सांगू लागल्या. धाकटा लवकर झोपत असे, त्याच्यासाठी त्या लिहून ठेवू लागल्या. ही वही पुढे पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली.हो , पुस्तकाच्या प्रस्तावनेत याचा उल्लेख आहे.ऐसी अक्षरे ...मेळवीन या आपल्या मालिकेतील आधीच्या भागांचे दुवे कुठे मिळतील?इथेच मिपावर माझे सर्व लेखन या भागात लेख आहेत https://www.misalpav.com/user/me/authored धन्यवाद😃me/authored
In reply to वीणा गवाणकर यांच्या मुलाखतीत by Bhakti
ही लिंक चालणार नाही. :-)
In reply to वीणा गवाणकर यांच्या मुलाखतीत by Bhakti
ओह! तेव्हा लक्षात नाही आलं.
In reply to ही लिंक चालणार नाही. :-) by राघव
होय
In reply to ओह! तेव्हा लक्षात नाही आलं. by Bhakti
वाचलंय
धन्यवाद कुमारजी.
In reply to वाचलंय by हेमंतकुमार
छान सारांश
हो नाही, राजहंस सहज ध्यानात
In reply to छान सारांश by कर्नलतपस्वी
परिचय आवडला.... फारच सुरेख पुस्तक आहे हे
होयवाचताना वीणा गवाणकर यांनी
In reply to परिचय आवडला.... फारच सुरेख पुस्तक आहे हे by ज्ञानोबाचे पैजार
वाचताना वीणा गवाणकर यांनी घेतलेली मेहनत शब्दा शब्दात जाणवते.खुपच सुंदर लिखाण आहे.शिक्षकांनी हे पुस्तक नक्की मुलांच्या हाती द्यावे. धन्यवाद पैजारबुवा 😃नितांत
💖
एक होता कार्व्हर मी काही वर्षांपुर्वी वाचले. अत्यंत आवडलेले चरित्र ! एका लेखक मित्रांच्या व्यक्तिगत बैठकीत वीणा गवाणकरांना भेटण्याचा योग आला, ते क्षण संस्मरणिय होते !वाह!
In reply to नितांत by चौथा कोनाडा
धन्यवाद ....
धन्यवाद मुवि काका.
In reply to धन्यवाद .... by मुक्त विहारि
कंटाळा आला की ह्या गुरूंची ही
In reply to धन्यवाद .... by मुक्त विहारि
सुंदर पुस्तक परिचय
या पुस्तकाची आत्ता आलेली ही
In reply to सुंदर पुस्तक परिचय by Nitin Palkar
धन्यवाद नितीनजी.
In reply to या पुस्तकाची आत्ता आलेली ही by Bhakti
अतिशय आवडतं असं व्यक्तिमत्व!
- फोर्डनं एखादं गिफ्ट घेण्यासाठी धोशा लावला, तर त्याच्याकडून मिळालेला हिरा हा शाळेतल्या वस्तूसंग्रहालयात मुलांना दाखवायला ठेवण्यात आलेला होता.
त्यांची खालील वाक्ये कुणालाही मार्गदर्शक ठरतील अशीच आहेत - Start from where you are, With whatever you have, Make something of it, And never be satisfied! समक्ष कोणा संत व्यक्तीला भेटण्याचा अजून तरी योग आलेला नाही. पण हा माणूस संतच होता असं अगदी मनापासून वाटतं! वीणाताईंचे आपल्यावर फार उपकार आहेत! त्याचं आयडा स्कडरचं व्यक्तीचित्र देखील असंच गुंगवून टाकणारं आहे! मिळाल्यास जरूर वाचावं.खुप सुंदर लिहिलंय!
In reply to अतिशय आवडतं असं व्यक्तिमत्व! by राघव
हा माणूस संतच होता असं अगदी मनापासून वाटतं!
In reply to अतिशय आवडतं असं व्यक्तिमत्व! by राघव
खरंय
छान पुस्तक परिचय.
धन्यवाद नक्कीच वाचा!
In reply to छान पुस्तक परिचय. by श्रीगणेशा
वीणा गवाणकर यांचे आणखी एक वाचनीय पुस्तक
अरे वाह! नक्की वाचणार !
In reply to वीणा गवाणकर यांचे आणखी एक वाचनीय पुस्तक by श्रीरंग_जोशी
"नाही चिरा " हे पण वाचलंय !
In reply to वीणा गवाणकर यांचे आणखी एक वाचनीय पुस्तक by श्रीरंग_जोशी
हे पुस्तक वाचनात आले नव्हते
धन्यवाद!तेव्हा मी ते वाचले
In reply to हे पुस्तक वाचनात आले नव्हते by सुक्या
तेव्हा मी ते वाचले आणी त्यांचे काम पाहुन थक्क झालो.इंग्लिश का? काही लोक झपाटलेले असतात हे नक्की.+१११इंग्लिश का?
In reply to धन्यवाद!तेव्हा मी ते वाचले by Bhakti
इंग्लिश का?हो. साधेच होते पुस्तक. ५० - ६० पानी असेल. परंतु सुंदर होते.काही पुस्तके ही ट्रान्झिशनल बुक्स म्हणवतात
छान माहिती ! धन्यवाद!
In reply to काही पुस्तके ही ट्रान्झिशनल बुक्स म्हणवतात by जेम्स वांड
परीक्षण चांगलंच लिहिलंय पण का
रटाळच वाटले.
In reply to परीक्षण चांगलंच लिहिलंय पण का by प्रचेतस
धन्यवाद प्रचेतस.
In reply to परीक्षण चांगलंच लिहिलंय पण का by प्रचेतस
उत्तम पुस्तक परिचय
धन्यवाद ताई!
In reply to उत्तम पुस्तक परिचय by गोरगावलेकर