Skip to main content

एक माणूस....

लेखक बाजीगर यांनी गुरुवार, 10/03/2022 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व भ्रष्टाचा-यांच्या गर्दीत मारेक-यांच्या गारदी त घराणेशाहीच्या चाटूकारांत हिंदूविरोधांच्या बाटूकारांत खोटारड्यांच्या जहरात फंद फितूरांच्या शहरात न्यूयाॅर्क टाईम्सच्या पेड लीस्टवर अतिरेक्यांच्या हिट लीस्ट वर घरभेदींच्या द्वेषात ही शिव्याशापांच्या त्वेशात ही एक माणूस आपल्या कामांमुळे कसल्या उंचीवर जातो.. 550 वर्षांचा रामजन्मभूमी विवाद सोडवला 70 वर्षांचा काशमीर 370 विवाद सोडवला नोटाबंदी चा वादग्रस्त निर्णय राफेल खरेदीचा अभूतपूर्व निर्णय बालाकोट air-strike घरात घूसून ठोकला. निरपराधांनी घेतला काश्मीरात श्वास मोकळा GST ची अंमलबजावणी करा make in India चा नारा नवकल्पना start up ल
काव्यरस

एकदिवसीय क्रिकेट, महिला विश्र्वचषक-2022

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 08/03/2022 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
कुणीतरी, ह्या विषयावर धागा काढेल, असे वाटले होते, म्हणून थांबलो होतो... 2017 पासून, भारतीय महिला, ह्या प्रकारच्या खेळांत चांगल्याच प्रवीण झाल्या आहेत... पण, व्यक्तीपूजेच्या शापातून, अद्याप तरी, ह्या संघाची सुटका झालेली नाही. मिताली राज आणि हरमन प्रीत कौर, यांना अजूनही संघात का घेतले आहे? हा एक अनाकलनीय प्रश्र्न .... ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड, यांच्यात अंतिम सामना होण्याची शक्यता जास्त आहे, हे माझे वैयक्तिक मत ...

मॅॅड प्रोफेसर

लेखक भागो यांनी सोमवार, 07/03/2022 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
नोव्हेंबरच्या थंडीतला दिवस होता. जेम्स मरे इंग्लंडच्या क्रॉथॉर्न येथे पोहोचले. ज्या व्यक्तीला भेटण्यासाठी ते आले होते त्यांचे ब्रॉडमूर नावाचे मोठे भव्य घर असावे असे त्याने गृहीत धरले होते. ते त्यांच्या गाडीतून बाहेर पडले आणि उत्साहाने एका मोठ्या खोलीत गेले. ज्यांच्या भेटीसाठी मरे आले होते त्या माणसाचे मरेवर खूप ऋण होते. नवीन ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीचे संपादक बनून मरे यांना वीस वर्षांहून अधिक काळ लोटला होता. त्यातील सतरा वर्षे नवीन शब्दकोशाच्या निर्मितीला डॉ. डब्ल्यू सी मायनर ह्यांच्यासोबतच्या पत्रव्यवहारामुळे मोठी मदत झाली होती. त्यांनी डिक्शनरीसाठी हजारो शब्दांचे योगदान दिले होते.

निषेध व भावनिक स्फोट

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 07/03/2022 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट हे मुळात मनोरंजनाचे साधन आहे. परंतु काही मोजक्या चित्रपटांतून आपले शिक्षणही होऊ शकते. काही चित्रपटात एखाद्या विशिष्ट मध्यवर्ती कल्पनेभोवती काही प्रसंग छान गुंफलेले असतात. त्यातून आपल्याला त्या विषयाची जाणीव होते. पुढे त्याचे कुतूहल वाटू शकते आणि त्यासंबंधी अधिक वाचण्याची प्रेरणाही मिळू शकते. अशा प्रकारे मी घेतलेल्या एका अनुभवावर एक लेख यापूर्वी इथे लिहिलेला आहे : पैशांवर डल्ला आणि स्टॉकहोम सिंड्रोम ! नुकताच असा दुसरा अनुभव मला आला. तो विशद करण्यासाठी हा लेख. एकदा प्राईम व्हिडिओवर ‘आज काय पहावे’ म्हणून शोध घेत होतो.

अजि सोनियाचा दिनु

लेखक बाजीगर यांनी रविवार, 06/03/2022 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
अजि सोनियाचा दिनु वर्षे अमृताचा घनु अजि सोनियाचा दिनु मेट्रो पाहिला रे, मेट्रो पाहिला रे... बरवा उसंत ट्रॅफिकजॅमु प्रगटलो अंतराळु बरवा उसंत ट्रॅफिकजॅमु प्रगटलो अंतराळु मेट्रो पाहिला रे, मेट्रो पाहिला रे... अजि सोनियाचा दिनु वर्षे अमृताचा घनु मेट्रो पाहिला रे मेट्रो पाहिला रे.... अजि सोनियाचा दिनु कृपासिंधु करुणाकरू कृपासिंधु करुणाकरू नितिन देवेन मोदीवरु बाप नितीन गडकरीवरु मेट्रो पाहिला रे मेट्रो पाहिला रे सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापारी करार पारदर्शी व्यवहार व भ्रष्टाचारा न थार अजि सोनियाचा दिनु वर्षे अमृताचा घनु मेट्रो पाहिला रे मेट्रो पाहिला रे.... अजि सोनियाचा दिनु

अमर्त्य

लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 06/03/2022 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
mipa नुकतीच गणपतीपुळ्याला भटकंती झाली.आबां घाट उतरताना एका जागी थांबून निसर्गाचे रौद्र रूप न्याहळत असताना खडकावर घट्ट पाय रोऊन उभा असलेला एकाकी पर्णहीन वृक्ष लक्ष वेधून घेत होते.नक्की काय विचार करत असेल,पुन्हा पाने फुटतील का?किंवा कोणा लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीचे भक्ष होईल आसे अनेक विचार पिंगा घालू लागले.
काव्यरस

झुंड

लेखक सोत्रि यांनी शनिवार, 05/03/2022 19:49 या दिवशी प्रकाशित केले.

झुंड सिनेमा नागराजने त्याच्याच कामाने उंचावलेल्या अपेक्षांची उंची गाठण्यात कमी पडतो. मी फारच अपेक्षा ठेवून गेलो होतो आणि त्यामुळे निराशा पदरी पडली असे खेदाने म्हणावे लागतंय. पण ह्याचा अर्थ सिनेमा फसलाय का? तर अजिबात नाही. जे काही 'स्टोरी टेलींग' नागराजला करायचे आहे ते काम नागराजने व्यवस्थित केले आहे. पण सिनेमा बघताना काहीतरी कमी पडतंय असं सतत वाटत राहतं.

शेन वॉर्नची अकाली एक्झिट

लेखक किसन शिंदे यांनी शुक्रवार, 04/03/2022 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
1 आत्ता लेट तिशीत असलेल्या पिढीचं नव्वदीतलं बालपण, शेन वाॅर्न या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, इतकं मोठं वलय त्या नावामागे होतं. बहुतेकांच्या स्मरणात शेन वाॅर्न म्हणजे शारजातला कोका-कोला कप, धुळीचे वादळ, सचिनने पुढे सरसावत मिड ऑनला मारलेले षटकार, इतकंच असेल, पण सच्च्या क्रिकेटवेड्या लोकांच्या हा फिरकीचा जादूगार कायम स्मरणात राह्यला, तो त्याच्या जादूई लेगस्पिनमुळे.

स्मार्टफोन घ्यायचाय - सल्ला हवा

लेखक उत्खनक यांनी शुक्रवार, 04/03/2022 00:48 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आजपावेतो १० हजाराच्या वरचा कधी फोन घेतला नाहीये. आता घ्यावा म्हणतो. आणि त्यासाठी सल्ला घेण्यासाठी मिपाशिवाय आणखी चांगली जागा कोणती? गरजः - गेमींग साठी नकोय. ऑफिसच्या कामासाठीच बहुतेक वेळ वापर होईल.