Skip to main content

(स्वप्ना, जागृती, सीमा)

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शनिवार, 18/12/2021 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्ना, जागृती, सीमा आल्या तिघीही घरी कुणास घेवु कवेत अन कुणास ठेऊ दुरी? सीमेसोबत जरा लोळलो कामज्वराच्या धगीं पोळलो स्वप्ना, जागुस शेजेघेऊनी षड्-मोहघटांसवे खेळलो (स्वसंपादित) (अतिशृंगारिक कडवी स्वसंपादित) (स्वसंपादित) आवेगाचे वेग अनावर असे गळुनी पडताना एकांमेकीं विरुनी जाऊ द्वैत आपुले विस्मरताना - शृंगार्_रात्रीं

किचनमधून ती सांगते

लेखक श्रीगणेशा यांनी शनिवार, 18/12/2021 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
किचनमधून ती सांगते, पोहे करते आहे मी धावत जाऊन, शेंगदाणे तळून देतो किचनमधून ती सांगते, पुलाव करते आहे मी धावत जाऊन, भाज्या बारीक चिरून देतो किचनमधून ती सांगते, वरण करते आहे मी धावत जाऊन, फोडणी करून देतो किचनमधून ती सांगते, चहा ठेवते आहे मी धावत जाऊन, चहा तयार करून घेतो किचनमधून ती सांगते, काहीतरी नवीन करते आहे मी शांत राहून, मनाची तयारी करून ठेवतो -- घरून काम करताना.

कोळीगीतः समींदरा, जपून आण माझ्या घरधन्याला

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 18/12/2021 02:09 या दिवशी प्रकाशित केले.
समींदरा रे समींदरा, तू जपून आण माझ्या घरधन्याला लई दिवसांन परतून येईल घराला ||धृ|| नको उधाण आणू तुज्या पाण्याला नको मस्ती करू देऊ वार्‍याला काय नको होवू देऊ त्याचे होडीला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||२|| नारळ पौर्णिमेचा सण आता सरला तुला सोन्याचा नारल वाढवला नेल्या होड्या त्यानं मासेमारीला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||३|| मी कोलीण घरला एकली सारं आवरून बाजारा निघाली म्हावरं विकून येवूदे बरकतीला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||४|| एकवीरा आई माझी डोंगरावरी खणा नारळांन ओटी मी भरीन नवस केलाय मी खंडोबाला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||५|| पंधरा दिवस जायी तो समींदरात ते दिवस जातात माझे झुरण्यात
काव्यरस

"सिंहगड" (भाग-१)

लेखक पराग१२२६३ यांनी शुक्रवार, 17/12/2021 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडेच मी मुंबईहून पुण्याला येताना सिंहगड पकडण्यासाठी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (CSMT) पोहचलो. आगाऊ आरक्षण केलेले होतेच. तिकडे 9 नंबरवर कल्याणच्या कार्यअश्वाची (लोको) दख्खनच्या राणीशी जोडणी सुरू झालेली होतीच, तोपर्यंत सिंहगड विशेष शेजारच्या 10 नंबर ढकलत आणली जात होती. सिंहगड विशेष फलाटावर येत असताना तिचे नवेकोरे आकाशी रंगाचे एलएचबी डबे नजर वेधून घेऊ लागले. मला वाटलं की, कल्याणचे WDS-6S कार्यअश्वच (लोको) त्याला ढकलत असेल. पण सिंहगडला गाडी समोर थांबत असताना कल्याणचाच डब्ल्यूएपी-7 कार्यअश्व दिसला.

स्वप्न जागृतीची सीमा

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 17/12/2021 19:54 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्न जागृतीची सीमा अर्ध सत्य अर्धा भास अलौकिकाच्पा कवेत पडे वास्तवाचा फास सीमेवर कल्लोळती नाद रंगांचे सागर अपूर्वाची अनुभूती गंध, रस, स्पर्शापार उंबरा हा अदृष्टाचा असूनही नसण्याचा नसलेल्या असण्याशी उराउरी भेटण्याचा

कारखानिसांची वारी

लेखक देशपांडे विनायक यांनी गुरुवार, 16/12/2021 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
  मला हा सिनेमा आवडला याचे कारण या सिनेमात एक वाक्य आहे. हे वाक्य ऐकून ४८ वर्षापुर्वी मला मिळालेला सल्ला  आठवला. सल्ला न मागता मिळालेला नव्हता त्यामुळे न ऐकण्याचे कारण नव्हते. मी तो अमलात आणला आणि सुखी झालो.        त्या काळी कुटुंब नियोजनावर खूप चर्चा होत असे. फॅमिली प्लॅनींग बद्दल कुतूहल होते. कॉपर टी बद्दल ,मी कटिंग ला गेलेल्या सलून मधे चाललेली चर्चा ऐकणे अशक्य झाल्याने ती थांबवण्याची विनंती करावी लागली.

गोवा एका वेगळ्या रुपात - भाग १

लेखक मित्रहो यांनी गुरुवार, 16/12/2021 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
काय आहे रे गोव्यात बिकनी, बिच आणि बीयर? हे वाक्य अनेकदा ऐकले होते. तसे बघायला गेले तर हे काही खोटे नव्हते. मी याआधी जेंव्हाही गोव्याला गेलो ते फक्त उत्तर गोवा, दक्षिण गोवा मधले समुद्र किनारे, दोन मोठी चर्च, शांता दुर्गा मंदिर आणि मंगेशीचे मंदिर येवढेच केले होते. या व्यतिरीक्त गोव्यात खरच काही आहे का हा प्रश्न मलाही पडला होता. मी तसा फार पूर्वी काही कामानिमित्त सांकलीच्या भागात गेलो होतो पण तेंव्हा सुद्धा मी काम झाल्यावर उत्तर गोवा दक्षिण गोवा असाच फिरलो होतो. त्यावेळी म्हापशाच्या मासेबाजारात मारलेला फेरफटका मात्र कायम लक्षात राहिला.

देव जाणे !!

लेखक आजी यांनी गुरुवार, 16/12/2021 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
माझी आई खूप धार्मिक होती. त्याउलट वडील तर्क कठोर. आई देवाची पूजा रोज मनोभावे करायची. तिला वेळ नसेल तर मोठा भाऊ करायचा. आई सर्व व्रतवैकल्ये,श्रावणातले उपास, गौरी गणपती, नागपंचमी, गोकुळाष्टमी, दसरा, पाडवा सगळं, सगळं करायची. शिवाय विनायकी आणि अंगारकी करायची. जिवतीची पूजा करायची. वडील म्हणायचे,"या हल्लीच्या काळात जिवतीएवढी मुलं परवडणार आहेत का? शिवाय जिवतीचा कागद चिकटवून काय होणार आहे? मुलांवर विज्ञाननिष्ठ संस्कार करणं हे आईवडिलांचं कर्तव्य." दोघांचेही विचार ऐकून माझी द्विधावस्था व्हायची. आईवर माझं फार प्रेम होतं. म्हणून ती सांगते म्हणून मी शुभंकरोती म्हणायची.

लिसा लिसा - प्रेमाचा निरागस गुंता

लेखक सिरुसेरि यांनी गुरुवार, 16/12/2021 01:35 या दिवशी प्रकाशित केले.
लिसा लिसा - प्रेमाचा निरागस गुंता प्रियदर्शनचे दिग्दर्शन असलेल्या अनेक चित्रपटांतील कथा हि एखाद्या शांत , निवांत , निसर्ग रमणीय गावामधे घडते . उदाहरणार्थ हिंदीतील मुस्कुराहट , खट्टा मिठा . लिसा लिसा या २००३ मधे प्रदर्शीत झालेल्या तामीळ चित्रपटामधीलही वातावरण असेच रम्य , शहरी धकाधकीपासुन दुर आहे . कथा नायक राकेश ( शाम ) हा तरुण येथे आपले वाडवडीलोपार्जीत घर , शेती एकट्याने सांभाळतो आहे . पुढे मागे पैसे कमावण्यासाठी परदेशात जाण्यासाठीही त्याचे प्रयत्न चालु आहेत . चंद्रु हा त्याचा मित्र ( विवेक ) अनेक उद्योगांत आपले पैसे गमावुन बसला आहे .

कॅप्टन कूल - महेंद्रसिंह धोनी

लेखक सुजित जाधव यांनी बुधवार, 15/12/2021 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला शेवटच्या ओव्हर मध्ये १२ धावांची गरज आहे....प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार ३० पेक्षा अधिक धावा करून खेळपट्टीवर टिकून आहे..अश्या वेळेस विश्वातला कोणताही कर्णधार शेवटची ओव्हर संघातील सर्वात अनुभवी गोलंदाजाला देणे पसंत करेल.....पण ३ यष्टयांच्या मागे उभ्या असलेल्या कर्णधाराच्या मनात वेगळाच प्लॅन होता. त्याने शेवटची ओवर फक्त ३ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेल्या जोगिंदर शर्माला दिली आणि इथेच भारतीय क्रिकेट मधल्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. तो सामना होता पहिल्यावहिल्या T-२० विश्वचषकाचा अंतिम सामना.