Skip to main content

रुपये१००१

लेखक मन१ यांनी शुक्रवार, 01/10/2010 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
बंधुंनो, हायकोर्टाचा निकालाला शांतपणे घटनात्मक पद्धतीनं सामोरं गेल्याबद्दल सगळ्या सगळ्यांचे मनापासुन आभार. इथुन पुढही सर्व काही वैधानिक मार्गानच अधिकाधिक सामंजस्यानं जाइल अशी मी आशा बाळगतो. माझ्या माहितीप्रमाणं तुमच्या उपासनेमध्ये थेट मूर्ती पूजनास वाव नाही.

नोहा चा आर्क

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 01/10/2010 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
१९६४ पासुन ऐकतोय. महापुर येणार. जग बुडणार. अजुन तरी बुडलेले नाही. बुडेल तेंव्हा बुडेल. पण समजा यदाकदाचित बुडालेच तर नोहाला प्रश्न पडेल? स्पिसिस(नमुने)म्हणुन कुणाकुणाला बोटीवर न्यायचे. पुढच्या युगात उपयोगी पडेल असे कुठ्कुठले मिपावरील नमुने तो आपल्या बोटीवर नेइल? नुसते नाव सांगु नका. कारणे पण सांगा.

अमुच्यावरच्या धाग्यासंगे युद्ध आमुचे सरू

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 01/10/2010 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
आमच प्रेरणा: ओळखा बघू अमुच्यावरच्या धाग्यासंगे युद्ध आमुचे सरू टंकू आणिक मरू पकतिल प्रेक्षक, पको नागरिक पकतिल महिला, पकतिल वाचक विडंबने पण करू, टंकू आणिक मरू लेख आमुचा आढाव्याचा, स्वप्नामधल्या संदेशाचा अट्टहास हा सुरू, टंकू आणिक मरू विडंबनाला लगेच उत्तर, वेळ न देऊ आम्ही क्षणभर पुरून त्यांना उरू, टंकू आणिक मरू हानी होवो कितीही भयंकर, प्रतिसादांचे चालो संगर अंती विजयी ठरू, टंकू आणिक मरू
काव्यरस

<<विंडबकांच्या 'फळ'प्राप्तीसाठी युद्ध आमुचे सुरू >>

लेखक सुहास.. यांनी शुक्रवार, 01/10/2010 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
विंडबकांच्या फळप्राप्तीसाठी युद्ध आमुचे सुरू चिक्कु किंवा पेरु, चिक्कु किंवा पेरु !! कविता आवश्यक विडबंनासाठी कच्च्या मालावर अत्याचारासाठी धावा कोणाचा करू, चिक्कु किंवा पेरु !! आमुच्या थर्डक्लास काव्यप्रतिभेतुन वाचे जी संपादकाच्या चाळणीतुन, कोणाची कविता स्मरू, चिक्कु किंवा पेरू !! विक्षिप्त,पुप्या,ममो ,रंगा अम्हास ठावे थोर विडंबक औषधासही न गावे कास कोणाची धरू, चिक्कु किंवा पेरू !! प्रासंगिकही लेख न सापडे पडलो धराशायी आम्ही बापुडे एका जनार्दनी टारू , चिक्कु किंवा पेरू !! ऊचलले दंडक संपादकानी रे सुहासा पितृपक्षीय बाजे डंका,चाले तमाशा बंद पडले बोरू, चिक्कु किंवा पेरू !!
काव्यरस

माझी फुलांची रांगोळी

लेखक जागु यांनी शुक्रवार, 01/10/2010 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या साखरचौतीच्या गणपतीच्या दिवशी मी ही रांगोळी काढली होती. खुप फुले उरली होती त्यातुनच ही रांगोळी काढली झर्ब्रेरियाची फुले आदल्या दिवशी वाहिलेल्या कंठीतुन काढली. त्यावरच ते मणी होते. खालची टोकेरी पाने गेलार्डीयाच्या काडीतील कापुन घेतले. हिरविगार गोलकार पाने आमच्य कंपाउंडच्या झाडाची काढली आहेत. त्यावर तगडीच्या कळ्या लावल्या आहेत. तसेच मध्ये मध्ये गेलार्डीया आणि ऑरगंडी ची फुले लावली आहेत. ऑरगंडीच्या फुलांच्या खाली कडू मेहंदीची पाने लावली आहेत.