मंद जाहल्या तारका.....
मंद जाहल्या तारका.......
मंतरलेले दिवस ते
चंद्र होता साक्षीला,
पुनवेच्या राती रुपेरी
प्रेमरंगी तुजसवे नाहल्या.
रात्र होती तरुण
अन यौवनी मी तुजसवे,
मोरपंखी मधुर स्वप्नात तू
गंध रातराणीचा दरवळे.
मदहोश मी, बेधुद तू
चंद्र मजकवे सामावला,
हलकेच डोकाउनी नभातून
तारकाहि गाली लाजल्या.
आजही रात्र तैसीच आहे
गंध तोच रातराणीचा दरवळे
? ? ? ? ? ? ?
चंद्र नाही आज मजकवे
तारकाहि मंदावल्या.नभीच्या
निरंजन वहाळेकर
वर्गीकरण
आठवणीतील रात्र जमली
पुनर संपादनाची सोय दिसत नाही