Skip to main content

माझ्या अंगामधी भिनलाय वादळी वारा

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 28/07/2010 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या अंगामधी भिनलाय वादळी वारा
माझ्या अंगामधी भिनलाय वादळी वारा पडती मनामधी तुफानी पाउस धारा ||धृ|| लाटांवर लाट येई उंच उसळून तालात त्यांच्या घेई मला लपेटून भरती आली माझ्या मनाच्या समिंदराला माझ्या अंगामधी भिनलाय वादळी वारा ||१|| भरल्या वादळी नाव वल्हवू मी कशी माझ्या होडीची वल्ह दिली तुझ्या हाती जोशात हाक नाव पोचव सागर तीराला माझ्या अंगामधी भिनलाय वादळी वारा ||२|| जाळं टाकलं पाण्यात गावंना मला मासोळी आले तुझ्याच जाळ्यात मीच झाले मासोळी घरला ने मला बरोबरीनं काढीन जलम सारा माझ्या अंगामधी भिनलाय वादळी वारा ||३|| -पाषाणभेद (दगडफोड्या) २८/०७/२०१०
काव्यरस

वाचने 1077
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया