Skip to main content

एका कारसेवकाचं मनोगत !!

लेखक सुहास.. यांनी गुरुवार, 30/09/2010 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
आधी हि लिंक वाचा !! http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6654038.cms आज अठरा वर्षांनी आलेल मनोगत मला पुर्ण पटले वा पटले नाही असे नाही...मी औ.बादला असताना बरेचशे पाकधार्जीणे मुस्लीम पाहिलेत.भर चौकात टीव्ही लावुन पाकिस्तान संघाची मॅच काय बघतात,त्यांच्यासारखी केशभुषा काय करतात. ईकडे नागपुरचाळीत असताना एकदा एका मुस्लीम दुकानदाराने,ईंडिया मॅच हारल्यावर ' अरे तुम्हारी ईंडिया हार गयी ' असं एकवले होते.ईतकी धर्माधंता ?

(चौकट)

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 30/09/2010 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबकांच्या भाऊगर्दीतून मी जातो कुणालाही न दिसणार्‍या कवितेकडे काथ्याकुटाखाली, कौलाखाली लपलेल्या शाब्दिक चित्राकडे तिथे असतो नवख्या कवीच्या शब्दकुंचल्यातले रंग सांडलेला भाष्यतुकडा. मला ते चित्र सुखदायी वाटतं वाटतं करावंसं थट्टाबध्द मी विडंबन टाकतो त्या चित्राभोवती. आता माझी शाब्दिक चौकट, त्यात रगडलेले भाव, कल्पना अन् त्याखालची प्रतिसादांची जागा - इतकेच ...
काव्यरस

पितृपक्षातली स्वप्नं, योगायोग व श्रद्धा

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 30/09/2010 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर - या लेखांत श्रद्धांची चिकित्सा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांना अशी चिकित्सा केलेली मुळात आवडत नाही, किंवा अशा चिकित्सेने त्यांच्या विश्वासाला तडा जाईल असं वाटतं त्यांनी हे लेखन वाचू नये. ज्यांना अशा डिस्क्लेमरची गरज वाटत नाही, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करावे. आपला एखाद्या गोष्टीवर विश्वास कसा बसतो? एका शब्दात उत्तर द्यायचं झालं तर 'अनुभवातून' असं म्हणता येईल. अगदी अडीच वर्षाच्या मुलालासुद्धा 'ब्लेडला हात लावू नकोस, त्याने लाल बाऊ होतो' हे सांगून, त्याच्याकडून दहावेळा वदवून घेतलं तरी त्याचा हात ब्लेडवरून फिरायला शिवशिवतोच.

कै. नारायण सुर्वे यांची "मुंबई" हि कविता मला हवी आहे.

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 30/09/2010 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
कै. नारायण सुर्वे यांची "मुंबई" हि कविता मला हवी आहे. कुणाकडे आहे का? ऑनलाईन कुठे मिळू शकेल?

धरम वीर

लेखक फारएन्ड यांनी गुरुवार, 30/09/2010 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
हा खरे म्हणजे त्या दशकातील सर्वात सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. मलाही लहानपणी जेव्हा पाहिला तेव्हा खूप आवडला होता. गाणी चांगली आहेत, धर्मेन्द्राचे काम मस्त आहे. टिपिकल मनमोहन देसाई फॉर्म्युला आहे. त्यामुळे यातील अचाट आणि अतर्क्यपणा मी वेगळ्या नजरेने बघतो. तेव्हा हे सगळे केवढे आवडायचे याची आता गंमत वाटते. सगळ्या चित्रपटाबद्दल लिहायचे झाले तर एक ग्रंथ होईल. तेव्हा थोडक्यात जमते का बघू :) ही कथा कोणत्या काळात आणि कोणत्या प्रदेशात घडते माहीत नाही. एक मोठे राज्य असते. जीवन त्यात कोण असतो माहीत नाही पण त्याची बहिण मात्र राजकन्या असते. इंद्राणी मुखर्जी ती राजकन्या म्हणजे केवढा जुना काळ असणार!

अयोध्ये चे मंदिर

लेखक रणजित चितळे यांनी गुरुवार, 30/09/2010 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या अयोध्या - बाबरी प्रकरण चालले आहे. माझे ह्या बाबतीतले मत इच्छुकांनी www.rashtravrat.blogspot.com मध्ये, "MAKING PEACE WITH HISTORY" ह्या नावाने २२ सप्टेंबर ला पोस्ट केलेले वाचावे. इंग्रजी मधुन असल्या कारणाले येथे देत नाही. राष्ट्रर्पण सध्या अयोध्या खटल्याचा निकाल लवकरच लागणार असल्याने हा धागा सध्यासाठी वाचनमात्र केला असून या विषयावर चर्चा संपादक मंडळाच्या विचाराने सुरू करण्यात येईल. कृपया संयम बाळगावा, ही विनंती. -संपादक मंडळ

बुद्धी प्रामाण्य वाद

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 30/09/2010 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
बुद्धी प्रामाण्य वाद म्हणजे नेमके काय?....प्रत्यक्ष प्रमाण वाद व बुद्धी प्रामाण्य वाद यात नेमका फरक आहे काय ...जेंव्हा आधुनिक विज्ञान नव्हत तेंव्हा माणुस बुद्धीप्रामाण्यवादी नव्हता का? .. बुद्धीप्रामाण्यवाद हा वैज्ञानिक कसोट्यांवर अवलंबून असतो का? ..बुद्धिप्रामाण्य म्हणजे 'केवळ स्व बुद्धीचा वापर आणि स्व बुद्धीच प्रमाण' असे असते का ? बुद्धीप्रामाण्यवाद सांगतो..विश्वाची व्याप्ती ही ज्याच्या त्याच्या बुद्धीवर अव्लंबून असते. विश्वाची निर्मिती देवाने केली हे बुद्धीप्रामाण्यवादास नामंजूर आहे.. देवाची निर्मिती मानवी मेंदूने केली आहे असं बु.प्रा.

ईडली -चटणी--

लेखक निवेदिता-ताई यांनी गुरुवार, 30/09/2010 07:54 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :- तीन वाट्या तांदूळ, एक वाटी उडीद्डाळ,(दोन्ही रात्रभर भिजत घालावे, सकाळी मिक्सरमधून वाटून ठेवावे.) साधारण सहा-सात तासात ईडली पीठ तयार होते.), नारळ एक, भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी, चार-पाच हिरव्या मिरच्या,कोथिंबीर एक वाटी बारीक चिरुन, साखर्,मिठ चविनुसार्, जिरे-मोहरी,हिग्,हळद, तेल ई. साहित्य...