Skip to main content

धक्कादायक विधान करणा-या पुस्तकाबद्दलचे प्रश्न

लेखक शानबा५१२ यांनी रविवार, 10/10/2010 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार्,नमस्कार, गेली दोन तीन दीवस एक पुस्तक वाचतो आहे.त्यात एका चॅप्टरमधे एका व्यक्तीवर टीका करण्यात आली आहे.टीका म्हणजे साधीसुधी टीका नाही,सर्व मर्यादा ओलांडुन टीका करण्यात आली आहे.लेखकाने त्या व्यक्तीबद्दल जनसामान्यांत असलेल्या अफवांना त्या व्यक्तीच्या स्वभावाशी जोडले आहे.म्हणजे एखादी घटना सांगताना त्या अफवेचा वापर दाखला म्हणुन करण्यात आला आहे.जी अफवा अत्यंत धक्कादायक व त्या व्यक्तीच्या खाजगी आयुष्याशी संबंधीत आहे. त्या व्यक्तीशी लेखकाची झालेली मुलाखत लेखकाने लिहली आहे,त्यात त्या व्यक्तीच्या विचारांपासुन ते उच्चारापर्यंत

मुगाची खिचडी आणि फोडणी

लेखक रतन यांनी रविवार, 10/10/2010 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मन्ड्ळी. मिपा वरील हे माझे पहिलेच लेखन. मिपची आणि माझी गाठ आन्तरजालावरती मिसळची पाकक्रुती शोधताना पडली. मिपा वरील अनेक पाकक्रुती पाहून या कट्याच्या प्रेमात पडलो. हिन्दुस्थानात लग्न होइपर्यन्त खाणवळीत पोट भरत होतो लग्न झाल्यावर बायकोच्या हातचे आयते पदार्थ गिळत होतो. साइटनिमित्त देशाच्या बाहेर पडलो आणि खायचे वान्धे झाले. मग बोंबलत आन्तरजालावर पाकक्रुती शोधत हिण्डू लागलो. प्रवास शेवटी मिपा वर येउन थबकला आणि आम्हि इथेच वस्ति करयचे ठरवले. विश्वास ठेवा, मी प्रथम आठवडाभर मिपावर फक्त पाकक्रुतीच आहेत असे समजत होतो.

बंडू आणि मुखपुस्तकातले उरोजकर्क स्थितीसंदेश!

लेखक नगरीनिरंजन यांनी रविवार, 10/10/2010 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
काही महिन्यांपुर्वीची गोष्ट. शनिवारची सकाळ, म्हणजे तसे दहा वाजून गेलेले, पण तरीही ती सकाळच. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत ऑफिसात इमर्जन्सी रिलीजवर काम करून, आयटीतला माणूस झोपू शकेल तितपत, ढाराढूर झोपलेला बंडू रस्त्यावरच्या वाहनांच्या कर्कश कलकलाटाने जागा झाला. बिछान्यावर पडल्या पडल्याच त्याने कानोसा घेतला. स्नेहलता आयटीत असल्यामुळे स्वयंपाकघरातून पोहे-उप्पीट वगैरेचा खमंग वास येणे शक्य नाही हे माहिती असूनही उगाचच वेडी आशा लावून त्याने एक खोल श्वास घेतला.

राष्ट्रकुल:-प्रेक्षकांचा पाठिंबा आणि खेळाडू.

लेखक Bhushan Kulkarni यांनी रविवार, 10/10/2010 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीत चाललेल्या राष्ट्रकुल खेळांमधिल भारतीय खेळाडुंचे प्रदर्शन पाहुन संपुर्ण जगाने तोंडात बोटे घातली आहेत.खेळाडुंचे प्रदर्शन आणि भारताने केलेला उद्घाटन समारंभ व खेळांचे आयोजन यामुळे 2020 साली होणार्या ऑलंपिक स्पर्धाँचा प्रबळ दावेदार म्हणुन भारत पुढे आला आहे. भारताची सर्वात जास्त शक्ती ही प्रेक्षकांकडुन मिळणारया पाठिंब्यात आहे.जेव्हा सर्व प्रेक्षक एका सुरात 'जितेगा भाई जितेगा,ईँडीया जितेगा.' आणि 'भारत माता की.....जय!' असे म्हणतात तेव्हा खेळाडू आपली पुर्ण क्षमता पणाला लावतो व त्यातुनच त्याची सर्वश्रेष्ठ कामगिरी होते.राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्याला या गोष्ठीचा वारंवार अनुभव आला आहे. परंतु काही ख

विभन्ग

लेखक कल्पेश इसई यांनी रविवार, 10/10/2010 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
खवळलेला समुद्र... उत्थुन्ग अशा लाटा.. पण ...पण शान्त का किनारा...!!!!! स्वच्छ स्वच्छ हा प्रकाश ... सुन्दर असा चन्द्र... मग ...मग का हिरमुसल्या चान्द्ण्या...!!!! कळपा कळपात फिरणारे हे बगळे.... पण ...पण का गरुड हा एकटा...!!!! कोसळणारा पाऊस.. चिम्ब भिजलेले मन ... पण ...पण तरिही कोरडेच का आपण...!!!! विचारान्गत झालेले हे मन... गडबड्लेले हे मन.... पण...पण का मुक हे बोलणे...!!!!! ..................................................................कल्पेश इसई (२१ फेब्रुवारी २००५)
काव्यरस

पट्टा उर्फ विश्रामगडावर.....

लेखक प्रचेतस यांनी रविवार, 10/10/2010 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
नाशिकला एका खाजगी समारंभाचे बोलावणे आले व माझ्या डोक्यात बरेच दिवस मनात असलेला एक किल्ला करण्याचा प्लॅन भिरभिरू लागला. नाशिकला अर्थातच पुणे-मनमाड व्हाया नासिक रेल्वेनेच गेलो कारण २ घाटांतून दिसणारे सह्यपर्वताचे विलक्षण सौंदर्य. शनिवारी नाशिकला पोहोचलो. रविवारचा संध्याकाळचा समारोह आटोपला. तेव्हाच मामेभावाबरोबर सोमवार सकाळचा सिन्नर - घोटी दरम्यान असलेला पट्टा किल्ला पाहायाचा बेत आखून ठेवला. अर्थात इतरही गप्पागोष्टींबरोबर झालेल्या जागरणामुळे एकवेळ ट्रेक करणे रद्द करावे की काय असे वाटून गेले. पण किल्ला पाहायच्या ओढीमुळे आळसावर मात केली.

फुलपाखरु

लेखक सद्दाम हुसैन यांनी रविवार, 10/10/2010 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा मी एक फुलपाखरु झालो पहिल्या मंजीली वरून खाली पडलो भेटला मला एकदा सांडू ज्याच्या डोक्यात नव्हता मेंदू म्हणे मला तू कसा तुरू तुरू उदातोस मे बोललो जसा तू डूर्रडूर्र हवा सोडतोस सांडूला तेल लावायला आली त्याची बायको तिच्या सोबत आली एक फुलपाखरीन तिला घेऊन लपलो मी एका फुलात तिच्या मागून आला तिचा बेवडा बाप मला सुद्धा त्याने केला बेवडा की मी झालो फुलपाखरूचा देवदास आता माझी फुलापाखारीन परो गेली सोडून आणि मे शोधली एक नवीन फुलापाखारीन
काव्यरस

माझी शब्दरचना

लेखक कल्पेश इसई यांनी रविवार, 10/10/2010 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
नाही ...नाही म्हणायचेच होते तुला .. तर हसुनच का बोलली नाहीस.... दुर...दुरच जायचे होते जर तुला ... निरोप का घेउन गेली नाहीस.. तुला साथ नव्हती द्यायची जरी... सवली तरी सोडुन गेली असतीस... मनातुन निघायचेच होते जर तुला.. मनात खोलवर का गेलीस.. अलगदच निघुन गेली असतीस... तुझ्या आठवणी ओसरायला जन्मच अपुरा पडेल.. पण नविन आठवणी करायला तुच आता नसेन... नको नको येऊ समोर कधी सय्यम माझा सुटेल.. कितीही म्हटले तरी तुझ्या १ झलकसाठी मन हे तरसेल... गहिरे हे बोल... घुमसट्लेले हे मन... विचारव्नत हा कवि... पण तरिही...पण तरिही ....का अपुर्ण ही कविता............... कल्पेश इसई..(१४ जानेवारी २००५)
काव्यरस

अभिव्यक्ति स्वातंत्र्याची नक्की काय व्याख्या आहे ?

लेखक सद्दाम हुसैन यांनी रविवार, 10/10/2010 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावचे पान उघडले की मला एक वाक्य दिसते "अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. येथे तुम्हा सर्व मराठीप्रेमींचं मनापासून स्वागत आहे." माझ्या कडुन अनावधानाने हिंदी आणि उर्दु भाषेचा खुप गैर वापर झाला. माझे विचार मी लोकांपर्यंत पोचवुच शकलो नाही. मी काहितरी वेगळेपना निर्मान करण्याच्या नादात असे केले होते. पण संपादक मंडळाने मला माझी चुक निदर्शनास आनुन दिली. म्हनुन मी आता केवळ मराठीच लिहिन. पण एक कुतुहल म्हनुन मला एक प्रश्न पडतो , की अभिव्यक्ति म्हनजे काय ? माझं मराठि तितकसं सॉलिड नाही आणि बरेच प्रश्न पडतात. त्यातला हा एक.

हम्पी........

लेखक किल्लेदार यांनी रविवार, 10/10/2010 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
हम्पी चे काही फोटोज............... जुनेच आहेत पण आज एकदम हम्पीची आठवण झाली. गेल्यावर्षीच जाउन आलो.