Skip to main content

पुस्तक परिक्षण : "पार्टनर" व.पु. काळे

लेखक सागर यांनी शनिवार, 09/10/2010 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
एवढ्यातच वपुं चे 'पार्टनर' सुन्न मनाने वाचून काढले. भन्नाट पुस्तक आहे. मी खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे माझ्या शालेय जीवनात वाचली होती. तेव्हाही 'पार्टनर' मस्त वाटली होती. पण त्यातील दाहकता जाणवली नव्हती. काही संदर्भ, अर्थ व भूमिका कळण्यासाठी लग्नाचा अनुभव गाठीशी (किंवा किमान तेवढी मॅच्युरिटी) असल्याशिवाय 'पार्टनर'मधील दाहकता जाणवणे शक्य नाही. पहिल्या ११ पानांतच मी 'पार्टनर' मध्ये गुरफटलो. कुठे मनसोक्त हसलो ... तर कुठे मनसोक्त रडलोही... होय खोटे कशाला सांगू? 'पार्टनर' वाचल्यामुळे असेल कदाचित पण त्यातील रोखठोक पार्टनर चे विचार जळजळीत असले तरी प्रामाणिकपणे पटले.

मी पाहीलेले मृत्यु

लेखक आप्पा यांनी शनिवार, 09/10/2010 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मा़झ्या आयुष्यातला एक प्रसंग. साधारणतः १९७७ किंवा ७८ ची घटना असावी. मी एका प्रथीतयश रुग्णालयात नोकरीला लागलो होतो. ठाण्यातील पहीलीच नोकरी. ऑपरेशन थियेअटरला मदतनिस होतो. एक रुग्ण ट्रेनमधुन पडला होता. पाय फ्रॅक्चर होता. त्याचे ऑपरेशन ठरले. अती विशाल देह. डॉ.नी त्याच्या कमरेत एक इंजक्शन देऊन त्याचा कमरेखालील भाग बधीर केला. पायाचे हाड जोडले. हाडामध्ये स्टील रॉड टाकला. ऑपरेशन पुर्ण झाले. पेशंट शुध्दीवरच होता. त्याचे पायावर प्लॅस्टर घालण्यास सुरवात झाली. डॉ.नी रुग्णाला सांगीतले तुझे ऑपरेशन यशस्वी झाले. रुग्ण डॉ.ना थँक यु. म्हणाला.

राजगड

लेखक केदार बर्वे यांनी शनिवार, 09/10/2010 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मि.पा.वरच्या सर्व मित्रानो आणि मैत्रिणिनो, नेहमी प्रमाणे शनिवारी सुटी होती आणी काय करायचे असा ? होता.

***जगदंबा ***

लेखक मदनबाण यांनी शनिवार, 09/10/2010 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
आज ठाण्याच्या टेंभी नाक्याला असणार्‍या देवीच्या दर्शनाला जाउन आलो, आणि देवीची प्रसन्न आणि मोहक मुद्रा टिपुन आलो... :) विशेष :--- हा धागा गणपा शेठला समर्पित केला आहे, कारण मी त्याला सांगितले होते की जेव्हा केव्हा मला शक्य होईल तेव्हा मी या देवीचे फोटो जरुर काढीन...आज तो योग आला.

तव नयनांचे दल हलले ग

लेखक शरद यांनी शनिवार, 09/10/2010 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
आजपासून मला आवडलेल्या काही कवितांची ओळख करून देत आहे. तेव्हा या कविता किमान पन्नास वर्षांपूर्वीच्या असणार हे तर आलेच. पण चांगली कविता नेहमीच ताजी तवानी असते ( हे माझे मत !) सुरवात श्री. बा.भ.बोरकरांच्या एका भावकवितेपासून करू. तव नयनाचें दल हललें ग कवीवर्य बा.भ. बोरकर हे बालकवींप्रमाणेच निसर्गात रंगणारे. त्यामुळे त्यांची एक कविता द्यावयाची म्हटले तर त्यांच्या अनेक निनांतसुंदर निसर्गकविता समोर येतील. पण आज मी आज एक भावकविता देत आहे. हीच का ? तर तुमच्या आवडत्या कवीच्या अनेक कविता तुम्हाला प्रिय असल्या तरी दोन चार तुमच्या स्वत:च्या असतात. त्या नेहमी वाचण्याकरिता नसताच मुळी.

दवाखान्यातील दोन प्रसंग - एक अनुभव

लेखक कानडाऊ योगेशु यांनी शनिवार, 09/10/2010 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
चार दिवसांपूर्वीच माझ्या सात महीन्यांच्या मुलीला फणफणुन ताप आला होता.नुकतेच प्रवासावरुन परत बेंगलोरला आलो होतो आणि येतानाच जाणवले की लेकराला ताप भरला आहे.पण प्रवासाचा शीण असेल आणि थोड्या विश्रांतीनंतर तिला बरे वाटेल असे वाटले.कंपनीमध्ये अगोदरच प्रोजेक्टची डेडलाईन जवळ आल्याने आणि बॉसनेही यांनंतर कृपया रजा घेऊ नको अशी विनंती करुन रजा दिल्याने त्या दिवसाचीही रजा टाकणे मला पटले नसते म्हणुन प्रवासावरुन आल्या आल्यावर पटापट आवरुन कंपनीमध्ये गेलो.कंपनीत जाऊन दोन-तीन तास झालेच नसतील तोवर बायकोचा फोन आला कि पटकन घरी या मुलीला १०३ टेम्परेचर आहे.बॉसला सांगुन लगोलग निघालो.डॉक्टरचे क्लिनिक ५-३० ला उघडते.