Skip to main content

पुस्तक परीचय: "थ्री कप्स ऑफ टी"

लेखक मराठे यांनी शुक्रवार, 22/10/2010 01:37 या दिवशी प्रकाशित केले.
हा पुस्तक परिचय आहे. परिक्षण करण्याइतपत अक्कल मला नाही. जे आवडलं ते लोकांना सांगावं हाच फक्त उद्देश. १९९३ मधे, अमेरिकेतल्या मोंटाना राज्यात राहणारा एक धाडसी गिर्यारोहक "ग्रेग मॉर्टेन्सन", के-२ हे जगातलं दुसर्‍या नंबरचं उंच पण अतिशय अवघड असं शिखर सर करण्यात अपयशी ठरतो. पाकिस्तानातल्या (पाक्-व्याप्त काश्मिरमधल्या) ईशान्येला असलेली हिमालयातली काराकोरम पर्वतरांग म्हणजे जगातल्या अत्युच्य अशा साठ पर्वतशिखरांचं माहेरघर, पाकिस्तान व चीन मधे असलेली नैसर्गिक हद्द. शरिराने श्रमलेल्या आणि अयशस्वी चढाईमुळे पूर्णपणे मानसिकरित्या खचलेल्या अवस्थेत ग्रेग मॉर्टेन्सन बेस कॅंपची आणि पर्यायाने बाकिच्या जगाची वाट चुकून कित्येक तास भरकटत एका गावात शिरतो. गावातली लोकं त्याची काळजी घेतात. परतताना मॉर्टेन्सन त्यांना, त्याच्या अवाक्याबाहेरचं, वचन देतो, "मी परत येइन आणि तुमच्या गावात एक शाळा बांधेन". अवक्याबाहेरचं वचन ह्यासाठी की मॉर्टेन्सनकडे त्यावेळी स्वतः राहायला घरही नसतं. अशा उनाड फिरणार्‍या आणि आपल्या गाडीत झोपणार्‍या मॉर्टेन्सनला ह्या प्रंसंगामुळे जगायला नवं कारण मिळतं. जवळ असलेलं नसलेलं सगळं विकून आणि नविन देणगीदारांना गाठून शाळेसाठी पैसे जमा करतो. आणि पुन्हा कोर्फेला परतुन तो आपलं वचन पूर्ण करतो. पण त्याचं कार्य इथेच संपत नाही. उलट इथे त्याच्या कार्याची सुरुवात होते. आज जवळ जवळ एक दशकभर चाललेल्या, तालिबान आणि अल्-कायदा सारखी अत्यंत कट्टरपंथियांचं आश्रयस्थान समजला जाणार्‍या प्रदेशात राहून विशेषतः मुलींसाठी शाळा बांधण्याच्या त्याच्या अथक परिश्रमांची ही गोष्ट आहे. एकिकडे जग दहशतवाद्यांची पाळंमुळं खोदुन काढण्यासाठी युध्द करत आहे.तर हा जगावेगळा शिपाई गरिबी आणि अडाणिपणा ही, दहशतवादामागील मूळ कारणं दूर करतो आहे. मुलं आणि मुलींना एकाच प्रकारे गैर-उग्रवादी (शब्द सुचवा) (nonextremist) शिक्षण देत आहे. हे करताना मॉर्टेन्सन यांना स्वतः अपहरण आणि असंख्य हल्ल्यांना तोंड द्यावं लागलं. भडकलेल्या इमाम व मुल्लांनी त्यांच्या विरुद्ध काढलेले फतवे तसंच अमेरिकेविरुद्ध गद्दार ठरवून त्यांना दिलेल्या धमक्या यांची तर गणतीच करायला नको. असं असूनही त्यांनी "सेंट्रल आशिया इन्स्टिट्युटचं" स्वप्न साकार केलं. ह्या अंतर्गत ५५ शाळा ईशान्य पाकिस्तान व अफगाणिस्तानच्या दुर्गम आणि गरीब भागात बांधल्या आणि त्या व्यवस्थित चालू राहतील याची व्यवस्था केली. मॉर्टेन्सन यांनी इथल्या हजारो मुला-मुलींना शिक्षणाद्वारे नवी दारं उघडून दिली आहेत. स्वतःच्या अथक परिश्रमांनी आज खरोखरच त्यांनी ह्या मुलांचं जग बदललं आहे.

महाराष्ट्राचा विकास कष्टाळू बिहारी लोकांमुळेच : राजपुत्र राहुलजी

लेखक हुप्प्या यांनी गुरुवार, 21/10/2010 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
आजचे राजपुत्र व उद्याचे पंतप्रधान राहुलजी हे भारतीय संस्कृतीच्या गहन अभ्यासाकरता प्रसिद्ध आहेत. पंतप्रधानांसारखे वरिष्ट लोकही त्यांचे विचार ऐकून त्यातून बरेच काही शिकतात. सामान्यांची तर बातच सोडा. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6788805.cms तर ते नुकतेच असे बरळले आय मीन गरजले की महाराष्ट्र व पंजाबसारख्या राज्यांचा जो विकास झालाय तो केवळ कष्टाळू बिहारी लोकांमुळेच. राहुलजींसारखे प्रकांड विद्वान विचार केल्याशिवाय असे म्हणणार नाहीत. पण महाराष्ट्राचा विकास झालाय ही माहिती मला नवीनच आहे.

फूनके

लेखक कच्ची कैरी यांनी गुरुवार, 21/10/2010 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
funfeसाहित्य-तुर डाळ १ वाटी मूग डाळ ३/४ वाटी मठ डाळ पाव वाटी कोथींबिर जुडी १ कांदे २ मध्यम आकाराचे आलं १ ईंच लसुण ७-८ पाकळ्या मीठ मिरच्या ६-७ तेल तळण्यासाठी क्रुती- प्रथम तुर डाळ ,मूग डाळ, मठ डाळ पाण्यात ७-८ तास भिजत घालावे. त्यानंतर डाळी उपसुन घेउन मिक्सरवर जाड्सर वाटुन घ्याव्यात .मिक्सरमध्ये घालत असतांनाच त्यात आलं लसुण्,मिरच्या घालाव्यात व फिरवुन घ्यावे म्हनजे ते एकजीव होइल.

शेंगदाण्याची चटणी

लेखक कच्ची कैरी यांनी गुरुवार, 21/10/2010 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- २ कांदे मध्यम आकराचे १ टोमॅटो २ चमचे आलं-लसुण पेस्ट कढिपत्ता जीरं मोहोरि तेल हगद धणेपूड लाल तिखट शेंगदाण्याचा कूट कोथिंबीर पाणी क्रुती- कढईत तेल गरम करत ठेवावे त्यात जीरं ,मोहोरि घालावी मोहोरी तडतड्ली कि मग त्यात कढिपत्ता घालावा.त्यानंतर कांदा लालसर परतुन घ्यावा तसेच आलं-लसुण पेस्ट घालवी त्यातच टोमॅटो घालुन परतावे नंतर त्यात धणेपूड ,हळद व लाल तिखट घालावे व परतुन घ्यावे.आता त्यातच शेंगदण्याचा जाड्सर कूट घालुन खमंग परतुन घ्यावे व त्यात गरम पाणी घालावे ,चविनुसार मीठ घालावे व चान्गली १-२ उकळी येउ द्यावी ,शेवटी कोथिंबीरिने सजवावे.

I bet तुम्ही कधी हे पाहीले नसेल - भाग ५

लेखक शानबा५१२ यांनी गुरुवार, 21/10/2010 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
कालचा तो फोटो कदाचित आपण पाहीला असावा,'धुर' असेल अस वाटत खरं,पण नाही तो धुर नव्हता.उत्तर मजेशीर आहे,उत्कंठा व ज्ञान वाढवणारे,पण जाउ दे तुम्हाला नाही ऐकायच तर आम्ही का बोटांना त्रास द्यावा? असो,तर आज हे गणपती बघा,साध्या पीओपीने बनवले आहेत्,मग एवढे चमकतायत का?? (obviously फ्लॅश कींवा लाईट मारली नव्हती,नाही तर त्यात खास काय राहील? पण तुम्हाला जे खरे वाटेल ते मत बनवुन घ्या)

कोजागिरी पौर्णिमा

लेखक स्वप्निल मन यांनी गुरुवार, 21/10/2010 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
कितीही रात्री जागल्या तरी पौर्णिमेच्या चंद्राला तोड नाही आणि प्रेमात हरलेल्याला तर कोजागिरीची बासुंदीही गोड नाही
काव्यरस

जादु कि आणखी काय?

लेखक पर्नल नेने मराठे यांनी गुरुवार, 21/10/2010 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली काही दिवसातला माझा अनुभव असा कि ज्यांच्या खिजगणतितही मी नव्हते त्यांना मी हल्ली आवडायला लागलेय. हे लोक शाळा, कॉलेजात व शेजारी होते व आहेत. एक वर्गातली मुलगी आता समोर आली तरी बोलेल का अशि शंका होती तिने मला चक्क फेस्बुकवर अ‍ॅडलेय, वर मेसजेस व्र मेस्जेस. एकाने तर मुम्बइला आलिस कि लगेच भेट खुप गप्पा मारायच्यात म्हणुन निमंत्रण दिलेय. एका खडुस शेजार्याने पण कशी आहेस काय म्हणतेस म्हणुन मेसेज पाठवलाय. हि ३ उदाहरणे पण प्रत्य्क्शात खुप . आता ही फेसबुकची जादु कि आणखी कसली? हा मला प्रश्न पडलाय. तुम्ही जरा प्रश्न सोडवायला मदत कराल का?

ईशान ..... भाग २

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 21/10/2010 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
3

ईशान ..... भाग १

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 21/10/2010 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
3

चकलीची भाजणी

लेखक जागु यांनी गुरुवार, 21/10/2010 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारे साहित्य: १ किलो तांदुळ अर्धा किलो चणा डाळ पाव किलो उडीदडाळ २०० ग्रॅम मुगडाळ दोन मुठ पोहे १०० ग्रॅम जिर क्रमवार पाककृती: तांदुळ स्वच्छ धुवुन वाळवुन घ्या. डाळी कडक उन्हात २-३ दिवस तापवुन घ्या म्हणजे लवकर भाजल्या जातात. जिर निवडून घ्या. वरील सर्व जिन्नस एक एक करुन मध्यम आचेवर खमंग वास येईपर्यंत भाजावे व दळून आणावे. दळून आणल्यावर. हवाबंद डब्यात किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत सिल करुन ठेवावे म्हणजे वास उडत नाही. अधिक टिप : आवडत असल्यास थोडे धणेही घालावेत.