मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव
नमस्कार मंडळी,
सध्या अच्युत गोडबोलेंच किमयागार वाचतोय. खुपच छान पुस्तक. शक्य असेल तर प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना वाचायला द्यावे. नक्कीच सायन्सची आवड निर्माण होईल. या लेखात पुस्तकाची माहीती देत नाही पण त्याच्या प्रस्तावनेत जे स्वा. सावरकर व पु ल देशपांडे यांचे विचार मांडले ते देत आहे.
प्रस्तावनाच मनाची एवढी पकड घेते की पुढील पुस्तक सोडवत नाही.
सावरकरांच्या मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव या निबंधातील उतारा आहे. त्यात सावरकर म्हणतात, "आपले चांगले ते देव करील, देव चांगले करील तर मी सत्यनारायण करीन. ही आशा, हा अवलंब अगदी खुळचट आहे! कारण तो असत्य आहे.
ए देवबाप्पा
ए देवबप्पा
ऐकू येते का रे काही तुला
त्या आरतीच्या गोंगाटात
टाळ्या अन झांजेच्या खणखणाटात
लोक काय काय मागत असतात
अन गार्हाणी सांगत असतात
कुणाला काय हवे असते
रुपं देही धनं देही
पुत्रं देही सर्व कामांशा देही मे
गात असतात किती ते तुझे गोडवे
अन म्हणतात की जो गाईल ही आरती
मिळेल त्याला सर्व हवे ते
पण खरे सांग एकदा
खरेच ऐकु येते का रे तुला?
सांग ना.....
ए देवबप्पा
दिसते कारे काही तुला
गाभार्याच्या बाहेरचे
त्या चिमुकल्या दाराच्या फटीतून
किंवा त्या जाळीच्या दरवाजाच्या पलीकडचे
त्या रोषणाईच्या झगमगटात?
किती डोळे लागलेले असतात
आशेचे डोहाळे घेऊन आलेले असतात
ताटकळत उभे असतात दर्शनासाठी
तुझ्यावर केलेल्या रो
सुंदर माझे घर!
माझी एक जुनी कथा इथे टाकतेय.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
खरंतर ती एक खूप सुंदर सकाळ होती. थंडीचा कडाका पडायच्या आधीची मोहक थंडी आणि कोवळ्या उन्हाचे मऊसूत कवडसे. तिच्या घरासमोरून जाणारी वाटही सुंदर सकाळीएवढीच सुंदर होती. या सगळ्या सौंदर्याच्या कल्लोळावर ओरखडा असवा तशी ती तिच्या घराच्या गॅलरीत उभी होती. परत एकदा मिनिटामिनिटाला आत आत उतरत जाणारं नैराश्य अनुभवत. इतक्या सुंदर सकाळी ती निराश का होत होती हे मात्र कोणालाच उमजण्यासारखं नव्हतं.
तसं तिच्याभोवती नैराश्याचे ढग जमणं तिला नवीन उरलं नव्हतं. कधी बरं.. हा!
चेहऱ्यांचे राजकारण..................
चेहरा म्हणजे काय ?
दोन डोळे, दोन कान, एक नाक, ओठ, गाल, कपाळ,
थोडी त्वचा, त्याच्या मागे रक्त-मांसाचा चिखल. सगळ्यांचा चिखल सारखाच, त्वचा जवळजवळ सारखीच, सर्व अवयव एक ठराविक प्रमाणात, तरीसुद्धा विधात्याने प्रत्येकाचा चेहरा वेगळा केला आहे. शाहरुख खान संपूर्ण देशाला भुलवतो, तिथेच क्रूर कसाबचा चेहरा समोर आले कि मनात संताप येतो. सर्व चित्रपट जग ह्या एक चेहऱ्यावरचा आपले पोट भरते. आजकाल नेते सुद्धा चेहरा वापरून अभिनय ह्याच एका गुणाने यशस्वी होऊ पाहतात. कामावर मालकासमोर क्षणोक्षणी हा चेहराच साथ देतो. रडणारे मुलसुद्धा आईचे केवळ तोंड बघूनच शांत होते.
... स्मरण असावे (गझल)
विजयी झाल्यावर याचेही टिपण असावे
'मोठेपणही माणुसकीला शरण असावे..'
भेद मोडुया आज असा की सर्व म्हणावे...
'जन्म घेतला त्या धर्मातच मरण असावे'
एवढेच मी सांगू शकतो सरळ मनाने..
जीवनासही कोणतेतरी वळण असावे
पानोपानी जीवन भरले रसरसलेले..
ती कुठली प्रतिभा होती की दळण असावे..?
आज कशाने भावुक झालो..?
मिसळपाव