Skip to main content

रामरक्षा फक्त महाराष्ट्रातच..?

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 29/10/2010 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
रामरक्षा ही केवळ महाराष्ट्रातच म्हटली जाते असा अनुभव आहे.. इतर प्रांतातले लोक ती का म्हणताना दिसत नाहीत? जसे हनुमान चालिसा किंवा रामचरितमानस फक्त उत्तरेकडील लोकंच वाचतात/म्हणतात, तसेच आहे का हे? महाराष्ट्रात मात्र बरेचसे लोक, त्यात बहुत करून आम ब्राह्मण समाज हमखास रामरक्षा म्हणताना आढळतो. ही रामरक्षा अगदी ल्हानपणापासूनच मुलांकडून पाठ करून घेतली जाते असेही निरिक्षण आहे..

माझ्या व्यथे... (गझल)

लेखक स्वानंद मारुलकर यांनी शुक्रवार, 29/10/2010 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
परतून सांग तुजला बोलावणार कैसा? नाहीस तू मनाला समजावणार कैसा? पुरते अटून गेले डोळ्यामधून पाणी कल्लोळ भावनांचा मी दावणार कैसा? जहरी तुझ्या स्वरांनी शिवलेस ओठ माझे संवाद अंतरीचा पण थांबणार कैसा? चाहूल पावसाची सुर्या फितूर झाली भेगाळला उन्हाळा ओलावणार कैसा? कंटाळलो कितीही बेरंग जीवनाला आयुष्य तू दिलेले अव्हेरणार कैसा? मी हात लावल्याने कोमेजली बिचारी निष्पाप त्या फुलांना रागावणार कैसा? ना सांगता कधीही येतेस तू समोरी माझ्या व्यथे तुला मी हुलकावणार कैसा? - स्वानंद
काव्यरस

नारायणन कृष्णन

लेखक विकास यांनी शुक्रवार, 29/10/2010 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
नारायणन कृष्णन या व्य्क्तीबद्दल बर्‍याच जणांनी कदाचीत ऐकलेही असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी थोडक्यात माहिती आणि सीएनएनवर जाऊन त्याला मत देण्याचे आवाहन. डिसक्लेमरः ही माहिती खूप प्रेरणादायी असल्याने देत आहे, तसेच केवळ सीएनएनच्या माहीतीवर आधारीतच देत आहे. जर काही वेगळीच माहिती समजल्यास तशी देखील अवश्य सांगा. मदुराईला रहाणार्‍या नारायणन कृष्णन हा एक पंचतारांकीत हॉटेलात काम करणारा शेफ/आचारी. त्याला परदेशी हॉटेलात जाण्याचा योग आला होता आणि जाणारही होता.

आनंद मेळावा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 29/10/2010 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळीत अनेक ठिकाणी आनंद मेळावे भरत असतात.. मिसळ पाव समुहातिल सदस्यांचा आनंद मेळावा भरवावा काय़? याची चाचपणी करण्या साठी धागा गुंफला आहे सन्माननीय सभासदां कडुन मत प्रदर्शन/सुचना/मार्ग दर्शना/कार्यक्रम रुपरेशा आदी बाबत ची अपेक्षा आहे..

फुल्ल टू दबंग

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शुक्रवार, 29/10/2010 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
काल मध्यान्ह मुहूर्तावर मी छानसे देवाला आणि स्वतःला वंदन केले. त्यानंतर 'हे कसे शक्य आहे? ' 'असे कधी असते का? ' असे नको ते प्रश्न विचारणारा मेंदूचा भाग काढून बाजूला ठेवाल. त्यानंतर छानसा उजव्या हाताला रुमाल गुंडाळला आणि शर्टाचे वरचे बटण उघडे टाकून मी रिक्षावाल्यांच्या ईस्टाइलने खुर्चीत स्थानापन्नं झालो.

चकली भाजणी---

लेखक निवेदिता-ताई यांनी शुक्रवार, 29/10/2010 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य-- एक किलो तांदूळ, अर्धा किलो चना डाळ, पाव किलो उडीद डाळ, वाटीभर पोहे, एक डाव धने, एक डाव जिरे. कॄती----- तांदूळ व चना डाळ धुवून पसरुन ठेवावी, जरा वाळत आली की भाजायला घ्यावी, मुठ शेकी ( म्हणजे भाजणी खमंग न भाजता त्यातून चांगल्या गरम वाफ़ा येउ लागल्या की भाजणे बंद करावे.) , भाजणी नेहमी मंद आचेवर भाजावी,उडीद डाळ धुवु नये, तशीच भाजावी, धने - जिरे भाजावेत.पोहे भाजावेत. गार झाल्यावर बारीक दळून आणावी.

रामदासांचे लेखन लोकप्रभेत

लेखक अवलिया यांनी शुक्रवार, 29/10/2010 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
आपले सर्वांचे लाडके श्री रामदास यांचा रत्नांवरील सुरेख लेख यंदाच्या लोकप्रभेत आला आहे. तरी सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा ही विनंती :) http://www.loksatta.com/lokprabha/diwali2010/diwali09.htm रामदासांचे असेच लेख नियमित वेगवेगळ्या मासिकात येत राहो तसेच लवकरात लवकर त्यांच्या लेखांचा संग्रह किंवा कादंबरी कागदावर प्रकाशित होऊन आम्हाला वाचायचा योग येवो अशी प्रार्थना !! जियो रामदास !! जियो !!

सावध रहा नकली खवा बाजारात आला आहे.

लेखक आप्पा यांनी शुक्रवार, 29/10/2010 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
मुळ बातमी : दिवाळीच्या तोंडावरच औरंगाबादसह लातूर, बीड, उस्मानाबाद, पुणे, धुळे येथून हजारो किलो भेसळयुक्त खवा जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हा बनावट खवा 'मेड इन गुजरात' असून देशभरात तो पोहोचवला जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईनंतर उघड झाले असून गुजरातच्या आणंद येथील 'ऑनेस्ट डेअरी प्रॉडक्ट'ने हा खवा बनवला होता. आणंदहून खासगी ट्रॅव्हेलने दररोज नकली खवा येत असल्याची खबर मिळाल्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी जालना रस्त्यावरील ट्रॅव्हल कंपनीवर छापा घालून १२४० किलो 'मिठास' खवा पकडला.

भाषाविज्ञान परिचय

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शुक्रवार, 29/10/2010 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातल्या काही विद्यापीठांमधे बी.ए.च्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात 'आधुनिक भाषा विज्ञानाचा' अंतर्भाव केलेला दिसतो. भाषा म्हणजे काय, भाषेचे स्वरुप, कार्य वगैरे यावर प्राथमिक स्वरुपात जसा अभ्यास असतो त्या प्रमाणे भाषाविज्ञानाचाही अभ्यासही असतो. पारंपरिक भाषाभ्यासाबरोबर आज आधुनिक भाषाविज्ञानाचा अभ्यास आता महत्त्वाचा मानला जात आहे. भाषाविज्ञान म्हणजे केवळ व्याकरण नसते तर, मुखावाटे कोणते अवयव ध्वनी निर्माण करतात कोणते ध्वनी भाषेमधे वापरले जातात. ध्वनीच्या रचना कशा होतात त्यांना अर्थ कसे प्राप्त होतात.