Skip to main content

शास्त्रीय संगीताबद्द्ल माहीती देनारा दुवा.

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 03/11/2010 05:55 या दिवशी प्रकाशित केले.
संगिताविशयीचं मला काहीच माहित नाही. शास्त्रिय संगीताविशयी मी जानुन घेन्यासाठी मायाजाळावर शोध घेताना, हा धागा सापड्ला. रसीकांना आवडेल. ह्यात प्रत्येक रागाबद्द्ल सविस्तर माहीती दिलेली आहे. http://www.swarganga.org

पुस्तकविश्व दिवाळी अंक २०१०

लेखक आनंदयात्री यांनी बुधवार, 03/11/2010 02:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज धनत्रयोदशी, अश्विन कृष्ण १२ शके १९३२. आजच्या या शुभदिनी 'पुस्तकविश्व'चा पहिलावहिला दिवाळी अंक आपल्या हाती देताना मला अत्यंत आनंद होत आहे. हा अंक ऑनलाईन तसेच पीडीएफ स्वरुपात एकाच वेळी प्रसिद्ध होत आहे. अनुभव, पुस्तकपरिचय, लेखकांचे परिचय, मुलाखत आणि कवितासंग्रहाचे परिचय असे विविधरंगी लेखन आपणास या अंकात वाचायला मिळेल. पुस्तकविश्वचा अंक म्हणजे पुस्तक/लेखकांबद्दल असे जरी असले तरी लेखांच्या विषयात वैविध्य राखायचा प्रयत्न केला आहे. या दिवाळी अंकाचे खास आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांची दिलखुलास मुलाखत.

मला पिस्तुल हवं आहे !!!!

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी बुधवार, 03/11/2010 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
"अशोकच" जेव्हा शुंभा सारखे वागतात तेव्हा लोकशाहीचे चारी स्तंभ धाडकन कोसळतात. हे बघुन स्वर्गात नारदही हादरतात 'नारायणं ' 'नारायणं ' म्हणताना जीभ चावतात आता नाव घ्यावं असा देवच उरला नाही म्हणतात ! इतक्यात स्वर्गाच्या दाराजवळ एक हतबुद्ध झालेला बुद्धपुरुष सत्य आणि चरखा विकायला बसलेला त्यांना दिसतो. " या मुल्यवान वस्तु , का विकतो आहेस तु" नारद विचारतात, त्या बाबाला तो महात्मा खिन्नपणे म्हणतो " माझ्या चरख्याचा अर्थ चर आणि खा असा काढतील असं वाटलं नव्हतं. आणि सत्याच्या प्रयोगाचा अर्थ ते सट्टयाचे प्रयोग

आधार प्रितीचा

लेखक जयदेव यांनी बुधवार, 03/11/2010 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
आज तुच माझा आधार आहे ज्या आधाराला तुझ्या प्रितीची धार आहे डोक्यावर असला जरी काळजीन्चा भार आठवण होता तुझी जातो पळून सारा आजार जात असता जोडी समोरुनी फुलपाखरान्ची आठवण येते तुझ्या सन्गतीची अम्रुताहुनी गोड तुझ्या प्रितीची तू केले आहे माझ्या हृदयात पक्के स्थान म्हणूनी हरपले माझेही देहभान तुला आहे माझ्या प्रितीची जान म्हणुनच आहे माझ्या जगण्यात शान.

माझी गरज.... तू

लेखक अज्ञात यांनी मंगळवार, 02/11/2010 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
सोनुले, रोज रात्री प्रमाणे आजही रात्री परत तो सर्प स्वप्नात आला... भूतकाळाच्या आठवणींचे वेटोळे घालून बसला मला तो... जीवाचा आकांत करून ओरडत होतो, पण शब्द देखील फुटत नवता तोंडातून.... जाग आली तेव्हा फक्त गदद्द अंधार होता सोबतीला... रोजच्यासारखा... तेव्हा जाणीव होते प्रकर्षाने तू नसल्याची, हवा असतो फक्त तुझा स्पर्श... मन भीतीने जेव्हा थरथरत असत तेव्हा त्या हळुवार स्पर्शाचीच गरज असते मला... आस लागलेली असते मनाला... त्या वेळी फक्त हवी असते डोक्याखाली तुझी मांडी, आणि केसातून फिरणारा तुझा हात... शब्द सुद्धा गोंगाट वाटतो, भीतीदायक वाटतो...

गौळणी!!!

लेखक मस्त कलंदर यांनी मंगळवार, 02/11/2010 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
सगळीकडे दिवाळी चालू होते धनत्रयोदशीला. पण काही घरांसारखी माझ्याही घरी ही चाहूल आधीपासूनच लागते. आधी घरी चार-पाच म्हशी होत्या तेव्हा काही काळजी नसायची. एकादशीला आई, आत्या, आणि घरोघरच्या लक्ष्म्या भल्या पहाटे उठत. (आता असे फक्त म्हणावं लागतंय. एकादशीला घरी असल्याला लै सालं उलटली). आम्ही त्यानंतर अर्ध्या तासाने डोळे चोळत बाहेर जाऊ तोवर तिचा अंगणात शेणसडा घालून झालेला असायचा. मला आईच्या कामात लुडबुड करायची असायचीच, पण ती मोठ्या ठामपणे माझा बेत हाणून पाडायची. तिथून उठून रांगोळ्या काढणार्‍या बहिणींच्यात गेले, तरी तिथेही तीच गत.

मनातल

लेखक प्रभा यांनी मंगळवार, 02/11/2010 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
दसरा झाला आणि बघता बघता दिवाळी समोर येऊन ऊभी राहिली. घराची आवराआवरी, साफ़सफ़ाई करताना मुख्य ऎवज असतो घरातील रद्दी! आजकाल मुख्य पेपर + त्याच्या खंडीभर पुरवण्या यांनी बघता बघता रद्दीचा डोंगर होतो. रद्दी आवरताना पुन्हा एकदा नजरेखालून पेपर जातातच. नवरात्राच्या नऊ दिवसातील पेपर व त्यांच्या पुरवण्यांमध्ये सर्वत्र वेगवेगळ्या मंडळांच्या देवींची चित्रे, फ़ोटो व त्यांची वर्णने असतात. हे वाचून खूप चांगले वाटते म्हणूनच टाकून मात्र देववत नाही. पण त्या पेपरांचा काही उपयोगही करता येत नाही. कारण ते वापरणार कसे? कपाटात खाली कसे घालणार? फ़राळाच्या डब्यात कसे काय देवीला खाली घालणार?

घोरणे

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 02/11/2010 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
घोरणे हा एक भयानक रोग/सवय आहे..अश्या माणसाच्या सहवासात झोपणे म्हणजे कठिण काम असते.. पुण्याल होस्टेल मधे असताना माझा एक राजापुरचा पार्टनर होता... त्याला घोरायची सवय होति..झोप लागली कि काहि मिनिटातच हा प्राणी घोरणे सुरु करायचा.. बर घोरण्याचा आवाज हि टिपेला असायचा..सारे होस्टेल दणाणुन सोडायचा.. एका लयीत त्याचे घोरणे चालायचे..पण मधेच ट्रक जसा गिअर बदलतो तसा हा गिअर बदलायचा.. तो पर्यंत लय व आवाजाचा डेसीबल बदलायचा मग गीअर पडला कि पुन्हा जुन्या लयीत घोरणे सुरु..बायका पण दुपारी.लवंडल्या कि घोरतात.. लग्न घरात तर लोक इतके घोरतात ..सामुदायिक घोरणे...कि एस टी स्टंड वर झोपलो कि काय असा भास होतो काहि माणसे

आई .. मिटलेला श्वास .. ५

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 02/11/2010 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
आई .. मिटलेला श्वास .. ४ http://www.misalpav.com/node/15170 पार्श्वभुमी : घरामध्ये वावरताना .. घरातील प्रत्येक गोष्टीकडे पाहताना त्या वस्तु ही आपापल्या पद्धतीने आपल्या दु:खात सामील होत आहेत असा भास कवितेतील नायकाला होतो ..
काव्यरस