Skip to main content

एका तडीपाराची जबानी

लेखक यकु यांनी गुरुवार, 04/11/2010 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
ही जाहीर जबानी सुरू करण्याअदुगर सम्पाद्क मंडळाम्होरं काही मुद्दे मांडू इच्चितो. कारन मी ल्हिलेलं त्येंनी पुसून टाकल्यास पब्लिकला ही जबानी वाचाय कशी मिळ्णार? तर क्रपया हे पुसू नै. १. आताचा मी यशवंत एकनाथ म्हणजे पूर्वीचा यशवंतकुलकर्णी; जो त्यानं इथं काही गुन्हे केल्यानं तुमच्या नजरेत सध्या तडीपार हाये. २. आताचा यशवंत एकनाथ हा आयडी दोन वर्सांपूर्वी मला देन्यात आला हुता. काल पात्तुर मी ह्यो कदीच वापरलेला न्हाई कारन तो मला देन्यात आला हाये हेच मला ठावं नव्हतं. तडीपारीच्या काळात जुन्या वह्या चाळताना मला हा आयडी गावला आन तो वापरून मिसळपावच्या दाराला सहज धक्का मारला तर काय! खुल्ललं ना दार!

भ्रष्टाचार हाच शिष्टाचार

लेखक प्रमोद सावंत१ यांनी गुरुवार, 04/11/2010 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
आपण पिळवणूकीच्या अर्थकारणात बांधलो गेलो आहोत, तेथून जेव्हा सर्वांची सुटका होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला देश स्वतंत्र होईल. पिळवणुकीचे अर्थकारण राज्यकर्त्यांपासून सुरु होते. पोलिस, आयकर, अबकारी, कर, सीमाशुल्क आदी विभागात ठराविक जागी बदली होण्यासाठी लाखॊ रूपयांची राज्यकर्त्यांना लाच दिली जाते. जो पोलिस अधिकारी अथवा आयकर आधिकारी एवढा खर्च करतो, त्याला त्याची वसुली करायची असते. त्यातूनच भ्रष्टाचाराचा उगम होतो. समाजाच्या वरच्या मजल्यावरून सुरू झालेला भ्रष्टाचार हळूहळू खाली पसरतो. जेव्हा सामान्य नागरिकांचा सरकारी यंत्रणेशी संबंध येतो तेव्हा प्रत्येक कागदासाठी त्याला किंमत मोजावी लागते.

नयनिती ही बहु प्रेमाला..

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 04/11/2010 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
मला नयनिति ही बहु प्रेमाला, मज धर्म हा समजावला हे गाणं हवं आहे, क्रुपया मदत करा. माझ्याकडे गाडित स्पिकर वरुन रेकॉर्ड केलेलं आहे पण आत ३ वर्षांनी त्याची क्वालिटी खराब होत आहे. धन्यवाद हर्षद

सावधान!!! पुढे "माहितीचा धोका" आहे!!

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 04/11/2010 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
आपणा सर्वांच्या सुरक्षिततेसाठी, सरकारच्या निर्देशानुसार आजकाल विविध मोबाईल कंपन्या, सायबर कॅफे आणि इतर अनेक सेवा या प्रत्येक ग्राहका कडे रंगीत छायाचित्र तसेच छायाचित्र असलेले ओळखपत्र (पॅन कार्ड) आणि रहिवासाचा पुरावा असे अनेक कागदपत्रके मागतात. नाहीतर सेवा बंद करुन टाकतात. काही मोबाईल कंपन्यामध्ये तर खात्रीशीर रित्या असे घडते आहे की, तीन वेळा योग्य कागद पत्रके, फोटो जमा करूनही कागद पत्रके अपूर्ण असल्याच्या नावाखाली सेवा बंद क्रण्यात येत आहे. म्हणजेच ही कागदपत्रेके गहाळ होत आहेत. सेंटर मधून ती कंपनीच्या मेन ऑफिसमध्ये पोहोचतच नाहीत नाहीतर पोहोचल्यावरही ते हेतुपूर्वक त्रास देतात?

महिलांसाठी आनंदाची बातमी...

लेखक अवलिया यांनी गुरुवार, 04/11/2010 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा! :) नुकत्याच हाती आलेल्या बातमी नुसार मंत्रिमंडळाने महिला अत्याचार विरोधी कायद्याला (Protection of Women against Sexual Harassment at Workplace Bill, 2010 ) मंजुरी दिली असुन पुढिल कारवाई लवकरच होणार आहे. अनेकदा कामाच्या ठिकाणी अनेक स्त्रियांना आपल्या पुरुष सहकार्‍यांकडुन अपमानास्पद वागणुक मिळते. या कायद्यामुळे त्याचे समुळ उच्चाटन झाले नाही तरी किमान पायबंद बसेल असे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे. मनुष्य शिकला पण सुसंस्कृत झाला नाही असे आपल्याला आजुबाजुला पाहिले की दिसते. परस्त्री मातेसमान मानावी असे हिंदू धर्मातील अनेक पंथांचे म्हणणे असते.

’रेषेवरची अक्षरे २०१० - अंक तिसरा’

लेखक मेघना भुस्कुटे यांनी गुरुवार, 04/11/2010 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, ’रेषेवरची अक्षरे २०१० - अंक तिसरा’ प्रसिद्ध झाला हे जाहीर करताना आम्हांला अतिशय आनंद होतो आहे. यंदाचा अंक तुम्हांला इथून उतरवून घेता येईल. हा अंक ब्लॉग स्वरूपातही उपलब्ध आहे. (http://reshakshare.blogspot.com/) काही बदल, सुधारणा आवश्यक वाटल्यास आवर्जून कळवा. ही दिवाळी तुम्हांला आनंदाची, समृद्धीची आणि समाधानाची जावो हीच शुभेच्छा!

मराठी वृत्तवाहिन्यांचे केविलवाणे मराठी..

लेखक पंख यांनी गुरुवार, 04/11/2010 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच दिवसांपासून हि गोष्ट खटकतच होती.. "माझा", "आयबीएन", "२४ तास" आदी मराठी वृत्तवाहिन्यांवर ज्या प्रकारे मराठीचे धिंडवडे काढले जात आहेत ते पाहून ऊबग आला आहे.. विशेषतः क्रिडाविषयक, त्यातही क्रिकेटविषयक बातम्या देताना या वाहिन्यांचे ईंग्रजीचे काय प्रेम ऊफाळून येते कुणास ठाऊक.. मराठीत अगदी छान प्रतिशब्द असताना यांना ईंग्रजाळलेले मराठी बोलण्यात फार मोठेपणा वाटत असावा..

हवाई..

लेखक गवि यांनी गुरुवार, 04/11/2010 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
3

माझे साक्षात्कारी बद्धकोष्ठ

लेखक मूकवाचक यांनी गुरुवार, 04/11/2010 04:06 या दिवशी प्रकाशित केले.
तसा मी लहानपणापासूनच वेगळा. ज्ञानमार्गी! तर्कसम्राट, पुरोगामी आणि बुद्धीनिष्ठ. खा खा खाणे आणि बसून राहणे या माझ्या सहज प्रेरणा. धोंडो म्हणतात "सहज प्रेरणांचे दमन विकृतीचे एकमेव कारण आहे". मी कधीच तसले दमन केले नाही. आमचे तात्या "हलका, सुपाच्य आहार घे. नियमित व्यायाम कर. " असे जुनाट रूढीवादी सल्ले देत. मी त्यांच्याकडे कधीच लक्ष दिले नाही. अपचनाच्या एका विलक्षण गर्तेत सापडलो. पोट सतत जड, मन सतत अस्वस्थ. आत्महत्येकडे प्रवृत्त! धोंडो म्हणतात "अनारोग्य महत्वाकांक्षेचे सुप्त कारण आहे. ते टाळण्यासाठी माणूस मोठमोठे झमेले उभे करतो, किंवा आत्मघात करतो ". मी जिवंत राहिलो.