सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा! :)
नुकत्याच हाती आलेल्या बातमी नुसार मंत्रिमंडळाने महिला अत्याचार विरोधी कायद्याला (Protection of Women against Sexual Harassment at Workplace Bill, 2010 ) मंजुरी दिली असुन पुढिल कारवाई लवकरच होणार आहे. अनेकदा कामाच्या ठिकाणी अनेक स्त्रियांना आपल्या पुरुष सहकार्यांकडुन अपमानास्पद वागणुक मिळते. या कायद्यामुळे त्याचे समुळ उच्चाटन झाले नाही तरी किमान पायबंद बसेल असे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे.
मनुष्य शिकला पण सुसंस्कृत झाला नाही असे आपल्याला आजुबाजुला पाहिले की दिसते. परस्त्री मातेसमान मानावी असे हिंदू धर्मातील अनेक पंथांचे म्हणणे असते. परंतु धर्माचा धाक अनेक नतद्रष्टांना नसतो त्यांना कायद्याचा धाक दाखवावा लागतो. सदर कायदा कसा आहे याविषयीची माहिती त्याचप्रमाणे सदर कायद्याचा अवलंब करुन पिडीतांना न्याय मिळवण्याची प्रक्रिया कशी आहे हे लवकरच समजेल. परंतु असा काही कायदा बनला आहे आणि आपण सदर कायद्याच्या कचाट्यात सापडु अशा भावनेने काही पिसाट मनोवृत्तीचे लोक जे बेताल वागत असतात त्याला आळा बसावा अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे.
खरोखर समाजाने आता एकजुटीने पुढे येवुन स्त्रियांवर त्या केवळ काही वैयक्तिक कारणास्तव, किंवा भीडेमुळे किंवा कोण काय म्हणेल या भावनेने आपल्यावर अत्याचार होत आहे हे लपवुन ठेवतात त्यांना मदत करणे गरजेचे आहे. अत्याचाराचे स्वरुप हे नेहमीच शारीरीकच असते असे नाही तर कित्येक वेळा जिव्हारी लागणारे शब्द, उगाचच जाता जाता केलेली कॉमेंट, अनावश्यक तर्हेने केलेला उपमर्द, वैयक्तिक टिका टिपण्णी हे सर्व मानसिक छळात येते आणि अशा प्रकारच्या छळाला कुठलाही पुरावा त्या पिडीत महिलेकडे नसतो.
अचकट विचकट कॉमेंट स्त्री सहकार्याबद्दल करुन आपल्या टवाळखोर मित्र मैत्रिणींसमवेत फिदी फिदी हसणे आणि जग हे असेच असते, जगात रहायचे तर असेच रहावे लागेल असे तोंड वर करुन बोलायचे हा बेशरमपणाचा कळस आहे आणि हे असे अनेक जण अगदी शिकले सवरलेले करत असतात ही बाब अत्यंत लांच्छनास्पद आहे. आम्ही ज्या संस्कृतीत वाढलो त्या संस्कृतीत विचार स्वातंत्र्य असले तरी काही काही बाबींमधे "कृष्णधवल असे काही नसते असतात त्या फक्त छटा" हे विचार आम्हाला मान्य नसतात. त्यामुळे काही गोष्टी या नेहमी चूकच असतात आणि काही गोष्टी या नेहमी बरोबरच असतात. त्यावर चर्चा करणे आम्हाला अजिबात पसंत नसते. अशा प्रकारे जी गोष्ट चूक आहे ती जर कुणी करत असेल तर त्या विरोधात पाठपुरावा आम्ही करत होतो, करत आहोत आणि करत राहु.
सदर कायदा काय आहे याबद्दल माहिती पुढे येईलच. त्याचबरोबर त्यात काही त्रुटी असल्यास त्या योग्य मार्गाने सरकार नामक यंत्रणेपर्यंत पोहोचवणे आम्ही आमच्या मित्रांच्या सहाय्याने करत राहुच याबद्दल शंका नाही.
सदर बातमीचा दुवा - http://www.pib.nic.in/release/release.asp?relid=66781&kwd=
मिपा ध्येयधोरणानुसार अनावश्यक मजकूर संपादीत.
पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा !
वाचन संख्या
6426
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
नान्याच्या लेखाशी
ही आनंदाची बातमी दिल्याबद्दल
>>नुकत्याच हाती आलेल्या बातमी
छान बातमी नाना ,
आतापासुनच प्रोटेक्शन ऑफ मॅन
हर्षत्सुंशी सहमत!
In reply to आतापासुनच प्रोटेक्शन ऑफ मॅन by ५० फक्त
बाळांचे पायाचे तळवे गुलाबी
हा प्रतिसाद निदान
In reply to बाळांचे पायाचे तळवे गुलाबी by शुचि
एक बनेल पुरुष
हम्म
बापरे
In reply to हम्म by मुक्तसुनीत
एक मासलेवाईक प्रतिसाद पाहा बरे :-)
In reply to बापरे by आंबोळी
कोणाची बाजू घ्यावयाची वा न
In reply to एक मासलेवाईक प्रतिसाद पाहा बरे :-) by मुक्तसुनीत
हाहाहा
In reply to कोणाची बाजू घ्यावयाची वा न by यशोधरा
रुमाल घेऊन डोळे पुसा. अजून्ही
In reply to हाहाहा by मुक्तसुनीत
धन्यवाद
In reply to रुमाल घेऊन डोळे पुसा. अजून्ही by यशोधरा
>> दूध से धुला हुवा >> सौ
In reply to धन्यवाद by मुक्तसुनीत
धन्यवाद
In reply to >> दूध से धुला हुवा >> सौ by यशोधरा
LOL! पटलं!
In reply to धन्यवाद by मुक्तसुनीत
QED.
In reply to LOL! पटलं! by यशोधरा
म्हंजे आता गप्प बसाल ना?
In reply to QED. by मुक्तसुनीत
अरे अरे अरे
In reply to म्हंजे आता गप्प बसाल ना? by यशोधरा
रेस्ट माय केस म्हणालात की
In reply to अरे अरे अरे by मुक्तसुनीत
कोण कुणाची बाजू
In reply to कोणाची बाजू घ्यावयाची वा न by यशोधरा
काही शब्द हे एका विशिष्ठ
In reply to हम्म by मुक्तसुनीत
लवकर
छान रे नान्या..
मुलींना नोकरी मिळणे कठिण
आता यात कटकट कोणती
In reply to मुलींना नोकरी मिळणे कठिण by अविनाशकुलकर्णी
असहमत!
In reply to मुलींना नोकरी मिळणे कठिण by अविनाशकुलकर्णी
अन एखाद्या उद्योगसमुहाची मुख्य व्यवस्थापक स्री असली तर ??
In reply to मुलींना नोकरी मिळणे कठिण by अविनाशकुलकर्णी