भ्रष्टाचार हाच शिष्टाचार
आपण पिळवणूकीच्या अर्थकारणात बांधलो गेलो आहोत, तेथून जेव्हा सर्वांची सुटका होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला देश स्वतंत्र होईल. पिळवणुकीचे अर्थकारण राज्यकर्त्यांपासून सुरु होते. पोलिस, आयकर, अबकारी, कर, सीमाशुल्क आदी विभागात ठराविक जागी बदली होण्यासाठी लाखॊ रूपयांची राज्यकर्त्यांना लाच दिली जाते. जो पोलिस अधिकारी अथवा आयकर आधिकारी एवढा खर्च करतो, त्याला त्याची वसुली करायची असते. त्यातूनच भ्रष्टाचाराचा उगम होतो. समाजाच्या वरच्या मजल्यावरून सुरू झालेला भ्रष्टाचार हळूहळू खाली पसरतो. जेव्हा सामान्य नागरिकांचा सरकारी यंत्रणेशी संबंध येतो तेव्हा प्रत्येक कागदासाठी त्याला किंमत मोजावी लागते. शाळा, इस्पितळे, व्यापार, अशा जीवनावश्यक सेवांमध्येही नागरिकांची पिळवणूक होते.
संदर्भ- एका दिशेचा शोध, लेखक- संदिप वासलेकर, प्रकाशक- राजहंस प्रकाशन, पुणे
वासलेकरांनी अगदी योग्य शब्दांत भारतातील भ्रष्टाचाराचे विश्लेषण केले आहे. पिळवणुकीचे अर्थकारण राज्यकर्त्यांपासून सुरु होते, हे त्यांचे वक्तव्य अचूक आहे. सध्या राज्यातच नव्हे तर अवघ्या देशात गाजत असलेला आदर्श इमारतीचा घोटाळा याचे मूर्तीमंत उदाहरण ठरावे. एक आजी, दोन माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्य मंत्री असे कितीतरी राजकीय नेते या घॊटाळ्यात अडकले आहेत. जर मंत्री एवढे खोलवर रुतले असतील तर सनदी अधिकारी व इतर वेगवेगळ्या प्रशासकीय विभागाचे कितीतरी अधिकारी अडकले असतील. राष्ट्र वा राज्य चालविणारे प्रतिनिधी जर भ्रष्टाचारी निघाले तर अधिकारी वर्ग मागे कसा राहील? हे दुष्टचक्र खूपच दुर्दैवी आहे. भ्रष्टाचारच हा जणू शिष्टाचार झाला आहे.
http://www.facebook.com/home.php?#!/pages/Eka-Dishecha-Shodh/126104087443744
याद्या
9461
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
ओ सावंत, ३/३ वेगळे धागे काढुन
भ्रष्टाचार व वर्गविग्रह हे
भ्रष्टाचार हाच शिष्टाचार प्रेषक: प्रमोद सावंत१ गुरू, 04/11/2010