बर्याच दिवसांपासून हि गोष्ट खटकतच होती.. "माझा", "आयबीएन", "२४ तास" आदी मराठी वृत्तवाहिन्यांवर ज्या प्रकारे मराठीचे धिंडवडे काढले जात आहेत ते पाहून ऊबग आला आहे.. विशेषतः क्रिडाविषयक, त्यातही क्रिकेटविषयक बातम्या देताना या वाहिन्यांचे ईंग्रजीचे काय प्रेम ऊफाळून येते कुणास ठाऊक.. मराठीत अगदी छान प्रतिशब्द असताना यांना ईंग्रजाळलेले मराठी बोलण्यात फार मोठेपणा वाटत असावा.. पण स्वतःला 'ग्लोबल' दाखविण्याचा यांचा केविलवाणा प्रयत्न बघून हसावे कि रडावे हेही कळत नाही..
आता कालची एक बातमी पहा..वरील ऊल्लेखलेल्यापैकी एका वृत्तवाहीनीवरील ही बातमी :मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला सेंच्युरीजची हाफ सेंच्युरी करण्याची संधी अश्या हेडलाईननंतर पुढे तर कहर होता.. सचिन तेंडुलकरच्या कारकीर्दीविषयी एका बाईच्या गोड आवाजात पुढीलप्रमाणे वर्णन होते - सचिनने आतापर्यंत १७१ टेस्ट्स खेळल्या असून त्याने १४ हजार २४० रन्स केल्या आहेत. त्यात त्याने ४९ सेंच्युरीज झळकावल्यात, ६ डबल सेंच्युरीज अन ** ईतक्या हाफ सेंच्युरीजही सचिनच्या नावावर आहेत. सध्या जगातील कुठलाही बॅट्समन सचिनच्या जवळपास नाहीये, जवळपास सर्वच बोलर्सच्या नाकीनऊ आणणार्या सचिनसाठी अहमदाबादचे हे स्टेडीयम जाम लकी ठरले आहे. २००५ साली याच मैदानावर न्युझीलंड विरुद्ध सचिनने डबल सेंच्युरी झळकविली होती. या मैदानावर २१७ हा सचिनचा हाईयेस्ट स्कोर आहे
अरे काय हे ? जेवताना सारखा सारखा खडा लागावा असे काहीसे वाटते. हे लोक त्रयस्थपणे आपल्या बातम्यांचे सादरीकरण कसे होतेय हे बघतच नाही का ? क्रिकेटविषयक बातम्या बघताना अक्षरशः वीट येतो.. 'कसोटी सामना' 'गोलंदाज' 'फलंदाज' 'धावा' 'शतके' 'द्विशतके' 'अर्धशतके' 'फलदायी' 'सर्वोत्तम' 'धावसंख्या' हे शब्द मराठी बातमी ऐकताना किंवा वाचताना चांगलेच वाटतात ना ? मग हे लोक ऊथळपणाचे ईतके प्रदर्शन का करतात ? 'मनसे'सारखा मराठीप्रेमी पक्षही ईथे का गप्प आहे तेही कळत नाही.. मी ह्या वृत्तवाहिन्यांच्या वेबसाईटवरही ह्या गोष्टीकडे लक्ष वेधले, पण माझ्या भावना त्यांच्यापर्यंत पोचल्याच नाहीत असे वाटते.. मिपाकरांना याविषयी काय वाटते हे जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न, न जाणो यातून काहीतरी मार्गही निघेल व ह्या वृत्तवाहिन्या स्वत:मध्ये बदल करुन घेतील ही एक वेडी आशा ठेवून हा लेखनप्रपंच..
वाचन संख्या
2149
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहाहाहा
सहमत
कर्णा,
In reply to सहमत by आजानुकर्ण
अरेऽऽ.....
In reply to कर्णा, by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्ही
इंग्रजी नव्हे, हिंदी
मी सहमत आहे
मी ह्या वृत्तवाहिन्यांच्या
पंखजी, इतरही भाषांचे प्रवाह
वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रं
एवढे प्रामाणिक प्रयत्न ह्या