Skip to main content

(पोट मागते ते - चरण्या अजून काही...)

लेखक नगरीनिरंजन यांनी मंगळवार, 30/11/2010 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: मयुरेश साने यांची शब्द मागती ते - लिहिण्या अजून शाई... ही सुंदर गझल. तोडून बंध कटीचा - केली जरी जागा ही हळूच निघून गेला - तरी शब्द दर्पवाही तोडून नळीबिळीला - मी मगज तो खाई पुन्हा कसे मिळेना - मागतो ज्याला त्यालाही चाटून ही ताटाला - आले न पोटी काही भूक अजून मजला - देतो हीच ग्वाही सांगून ही कितीदा - धुतले न हात माझे आतून भांड्यांचा ही - कितीदा आवाज होई उठवून ही मला - मी उठलो कधीच नाही पाच भाकर्‍या अन - वडे पाच खाई लाजून ही स्वतःला - उरले काहीच नाही पोट मागते ते - चरण्या अजून काही टाळून ही मला तू - मी टळलोच नाही जरी ज
काव्यरस

लिंगबदल कथा-२ (श्री.परांच्या प्रतिसादावरून)

लेखक शरद यांनी मंगळवार, 30/11/2010 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
लिंगबदल (आणखी एक गोष्ट) अर्जुनाने द्रुपदाचा पण जिंकला व द्रौपदी त्याची पत्नी झाली. पण भावाभावात तंटे उद्भवू नयेत म्हणून तिने इतर चौघा भावांचा स्विकार केला व ते नाते अतिशय समर्थपणाने सांभाळले. तिच्या बाजूने तिने स्वच्छ व्यवहार केला केवळ अर्जुन हा पती रहावा म्हणून ! तिला प्रत्येकाकडून एकएक मुलगाही झाला. तिने पत्नीधर्म सांभाळला पण पांडवांनी त्याप्रमाणे काही त्याग केला का ? तसे दिसत नाही. धर्म, भीम, नकुल व सहदेव यांनी आणखी एकएक राजकन्या पत्नी म्हणून घरात आणली व त्यांना मुलेही झाली.(हिडिंबा धरली तर) भीमाच्या बायका दोन. पण कहर केला तो अर्जुनाने.

नमस्कार समस्त मिपाकर!!!

लेखक अनिरुद्ध उर्फ अन्या यांनी मंगळवार, 30/11/2010 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार समस्त मिपाकर!!! मी अनिरुद्ध उर्फ अन्या... गेले १ वर्ष मिसळपाव चा सदस्य आहे पण फक्त वाचनापुरताच!!! ह्या मिसळपाव मुळेच वाचनाची आवड अजुन वाढली. लिखाण जमेल असे वाटत नाहि, त्या मुळे सध्या तरी एवढेच!!! सर्व मिपाकराना नविन लिखाणासाठी शुभेच्छ्या!!! लिखाणातील चुका माफ कराव्यात!!! ~अनिरुद्ध उर्फ अन्या!!!

शब्दान शब्द

लेखक यकु यांनी मंगळवार, 30/11/2010 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
कसल्याशा संशोधनासाठी आमचा एक मित्र उत्तर ध्रुवावर मुक्काम ठोकून असतो. तिथून तो मराठी अंतर्जालावर आणि त्यातील नगांवर नजर ठेऊन असतो. अंतर्जालातील काही नगांवर आजकाल त्याची विशेष नजर आहे; कारण त्याला उत्तर ध्रुवावरून आल्यानंतर मराठीत एक वेगळेच, आगळेच म्हणतात ना तसे मसं सुरू करायचे आहे. सगळंच खुल्लम खुल्ला व्हावं असं त्याचं म्हणणं आहे. जिथे कुणीही आयसोलेटेड, कंपूनिष्ठ असणार नाही. अर्थातच त्यासाठी याच नगांची गरज आहे. मिपावरील खेळीमेळीच्या वातावरणावर त्याचे विशेष प्रेम आहे. म्हणून त्याने खाली दिलेल्या नगांचे बायोडाटे (विदागार) तयार करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.

मंगळ सुत्र

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 30/11/2010 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
काहि मुली लहान पणी गंमत म्हणून आईचे मंगळ सुत्र गळ्यात घालतात..व आई त्यांना ओरडते..व मंगळ सुत्र काढायला लावते....कारण लहान पणी असे मंगळ सुत्र घातले तर मुलिंचे लग्न उशीरा होते असा समज आहे.. या वर आपणास काय वाटते........

[ज्योतिष] एबर्टीन तंत्राने जन्मपत्रिकेचे मोफत विश्लेषण

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 30/11/2010 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावच्या वाचकाना त्यांच्या जन्मपत्रिकेचे एबर्टीन तंत्राने मोफत इंग्लिश्मध्ये विश्लेषण पुढील काही दिवस नि:शुल्क करून मिळेल. इच्छुकानी खालिल माहिती मला इमेलने (upadhye.rajeev@gmail.com) कळवावी. नाव जन्म तारीख जन्मस्थळ जन्मवेळ एका इच्छुकास एकाच जन्मतारखेचे विश्लेषण करून मिळेल याची कृपया नोंद घ्यावी.

अवचट आणि मी

लेखक मिसळभोक्ता यांनी मंगळवार, 30/11/2010 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना सूचित करण्यात येते आहे की, श्री अनिल अवचट आणि आम्ही ह्यांचा काहीही संबंध नाही. आदरणीय नंदन ह्यांनी आम्हाला प्रदान केलेले एक अवचटांचे पुस्तक आम्ही वाचलेले आहे, ते आम्हाला आवडले देखील. पण त्याव्यतिरीक्त आम्ही समाजाची कुठलीही सेवा केलेली नाही. आम्ही मध्यमवर्गीय असे स्वतःला समजत असलो, तरी साबुदाण्याची खिचडी खाणे आम्हाला नेहमी जमतेच असे नाही, आणि गरम पाण्याची बादली गेली सतरा वर्षे पाहण्याची पाळी देखील आमच्यावर आलेली नाही. असो.

विकीलीक्समुळे उघडकीला आलेली खळबळजनक माहिती.

लेखक राजेश घासकडवी यांनी मंगळवार, 30/11/2010 07:15 या दिवशी प्रकाशित केले.
वॉशिंग्टन - नुकत्याच विकीलीक्सवर गोपनीय कागदपत्रांच्या प्रसिद्धीमुळे अमेरिकेत खळबळ उडालेली आहे. अमेरिकेच्या गृहखात्याने या घटनेचा धिक्कार केलेला असून राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणल्याचा दावा केला आहे. तर विकीलीक्सच्या मते अमेरिकन सरकारने महत्त्वाच्या बातम्या गोपनीयतेची सबब सांगून जनतेपासून लपवून ठेवल्या होत्या. या एकमेकांवरच्या चिखलफेकीच्या वातावरणात त्या कागदपत्रांमधून बाहेर येणाऱ्या सत्यांमुळे अमेरिकन सरकारची परिस्थिती अधिकच बिकट झालेली आहे. आमच्या वार्ताहराने या कागदपत्रांचा अभ्यास केल्यावर एक सनसनाटी बातमी हाती लागली. ती म्हणजे ३_१४ विक्षिप्त अदिती ऊर्फ श्री. श्री. सौ. सौ.